Kalangan

Kalangan

Share

This page will connect all music lovers and children learning in Kalangan to all Kalangan alumni. A

23/04/2025

चुकवू नये असा आनंददायी कार्यक्रम!
*प्रथा*
कलांगण प्रस्तुत या शास्त्रीय मैफिलीत आज पर्यंत गुरू वर्षा भावे यांच्या केतकी भावे जोशी, अवंती पटेल, चिन्मय लेले, आदिती आमोणकर, आर्या खाडिलकर, स्वागता पोतनीस या शिष्यांनी आपले पहिले शास्त्रीय गायनाचे मंच प्रदर्शन केले. याच मंचावर डॉ. अलका देव मारुलकर, मंजिरी असनारे केळकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे ही सादरीकरण झाले. या वर्षी कलांगण मधे सुमारे १५ वर्षे तालीम घेतलेल्या रोहन देशमुख या नव्या कलाकाराचा पहिला शास्त्रीय गायन मंच प्रवेश आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि गुरू संगीताचार्य रूपाली देसाई यांच्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने या मैफलीचे समापन होणार आहे.
सर्वांना मुक्त प्रवेश असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि नव्या कलाकाराला प्रोत्साहन द्यावे ही विनंती. 🙏

21/04/2025

*12 वर्षावरील सर्वांसाठी गायनाची दृष्टी, सहज प्रयोगातून शिक्षण आणि आनंद देणारा एक सुरेल गुरुकुल गायन कॅम्प!
* 3 ते 9 मे 2025.
कलांगण गुरुकुल अनिवासी शिबिर!
* ऑडिशन आवश्यक. प्रश्नावली वरील पत्रकात पान नंबर 5 वर.
* *प्रवेशाची अंतिम तारीख दिनांक 25 एप्रिल 2025*
अतिशय गुणी मुलांच्या पर्यंत आमच्या कॅम्प ची माहिती जरूर पोहोचवावी. मुलांना खूप आनंद, भरपूर ज्ञान, आणि एकंदरीतच सामाजिक भान देणारा संस्कार करणारा असा हा कॅम्प आहे. गाणे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या पर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती.अधिक माहिती सोबतच्या फ्लायर मध्ये....

28/02/2025

उत्सव गाण्यांचा हा कलांगणचा वार्षिक आनंद सोहळा! या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलांगणच्या दादर प्रमाणेच ठाणे, बोरिवली, पुणे तसेच ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या आणि इतरही सर्व शाखांमध्ये शिकणारी मुले या कार्यक्रमात स्वतःचे गाणे सादर करतात. या कार्यक्रमाचे वातावरण छान असते. शिक्षक आणि मुले खूप आधीपासून स्वतःच्या गाण्याची तयारी करतात. वादकांच्या सह मुलांना छान तालीम मिळते. आणि अगदी वाजत गाजत, सुंदर... रंगीबेरंगी वातावरणात एकमेकांचे गाणे ऐकत, एकमेकांना दाद देत हा कार्यक्रम साजरा होतो. उद्या दिनांक एक मार्च आणि परवा दिनांक दोन मार्च २०२५ या दोन्ही दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात हा कार्यक्रम साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे, आणि मनापासून निमंत्रण ही... आपली उपस्थिती हाच आमचा सन्मान!

JAYOSTUTE BY VARSHA BHAVE | AARYA AMBEKAR | SWATANTRAVEER SAVARKAR | 2021 | KAMLESH BHADKAMKAR 15/08/2024

https://youtu.be/BrCkDDlzR6s?si=BZq2dZshIw4E3f4-
जयहिंद 🇮🇳
भारत माता की जय!
आज स्वातंत्र्य दिन त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर रचित जयोस्तुते ऐका!
भावानुवाद : रणजित सावरकर
संगीत : वर्षा भावे
गायिका : आर्या
आंबेकर
जरूर ऐका, आस्वाद घ्या आणि अग्रेषित करा. आणि सदस्यत्व घ्या.( सबस्क्राईब करा)

स्वतंत्रता दिवसाच्या अनंत शुभेच्छा!!!🇮🇳

JAYOSTUTE BY VARSHA BHAVE | AARYA AMBEKAR | SWATANTRAVEER SAVARKAR | 2021 | KAMLESH BHADKAMKAR जयोस्तुते श्री महन्मंगले....ही आहे एका स्फूर्ती गीताची गोष्ट! ही गोष्ट अशी कदाचित घडली नसती... म्हणजे आत्ता जो सहज स्....

17/07/2024

GURUPOURNIMA-KIDS-REPRISED.mp4

धर्मवीर २ या चित्रपटासाठी कलांगणच्या २० गुणवंत मुलांनी समूह सहभाग घेऊन उत्तम गायन केले. श्लोक, हार्मनी आणि मुख्य गीतातील भावपूर्ण कोरस! यासाठी कलांगणची समन्वयक आणि मार्गदर्शक दीप्ती आंबेकर, शिक्षिका विद्या कंठी आणि पालक सहाय्यक सत्येन धुरु यांचे मोलाचे सहकार्य झाले. ठाणे केंद्राची शिक्षिका अवंती बपोरीकर आणि तिच्या विद्यार्थ्यांचा ही सहभाग होता.
सर्व मुलांचे संगीत दिग्दर्शकांनी कौतुक केले. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! सर्वांनी जरूर ऐकावे असे भावपूर्ण गीत!

20/05/2024

*नमस्कार*🙏🌷
*आता आमचे कलांगण संवर्धिनी चे "रंजन संगीत" वयोगट ३ पूर्ण ते १०

आणि "अध्ययन संगीत" शास्त्रीय गायनाची वाटचाल हे कोर्सेस*
*दादर प्रमाणेच पुणे, ठाणे, बोरिवली येथे ही हे कोर्सेस सुरू आहेत.*
🎤🎹
*महिलांच्या साठी व पुरुषांच्या साठी स्वतंत्र सुगमा हा शॉर्ट कोर्स आहे. ऑनलाइन व ऑफलाईन ही!*
🎤🎹
*वरील सर्व कोर्सेस ऑनलाइन ही घेतले जाणार आहेत.*
🎤🎹
*इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर whatsapp वर आमच्याशी संपर्क साधावा.*
🎤🎹
*प्रत्यक्ष ऑडिशन्स जून च्या पहिल्या आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजीपार्क, कलांगण, दादर प येथे होतील.*
🎤🎹
*संपर्क:*
*9594962587/88/90*

🎻🎻🎻🎻🎻

09/05/2024

डॉ मृदुला दाढे जोशी यांनी मुलांना सुगम संगीतातील आवाजाचा लगाव आणि त्यासाठीच्या exersizes बद्दल छान मार्गदर्शन केले.

Photos from Kalangan's post 09/05/2024

चित्रमय संगीत... प्रीती कदम (अस्मि क्रिएशन) यांनी मुलांना रंगात गुंतवले आणि त्यांना अधिकच टवटवीत केले.

08/05/2024

राग वृंदावनी सारंग मधला एक चतरंग...
आणि प्रणव दादा आणि सौरभ दादाने त्याला दिलेला लयकारीचा नवा रंग!सोबत प्रशांत दादा. आहेच! आम्ही सगळे जण पूर्ण दिवस या नादरंगात रंगून जातो. आज आमची संध्याकाळी ही कमलेश दादाने हार्मनी च्या लोलकांनी रंगीत करून टाकली.

06/05/2024
Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Swantryaveer Sawarkar Rashtriya Smarak, Shivaji Park, Dadar (W)
Mumbai
400028