Mangesh Vidya Mandir

Mangesh Vidya Mandir Mangesh Vidyamandir is a Marathi & semi English medium school. The school was founded in the year 1968. it is located in malad east

“गुरु-शिष्य नात्याचा जिव्हाळा: ठाकूर सरांसोबतची अविस्मरणीय परंपरा”मंगेश विद्या मंदिर शाळेच्या 1992 च्या बॅचमधील माजी विद...
05/04/2026

“गुरु-शिष्य नात्याचा जिव्हाळा: ठाकूर सरांसोबतची अविस्मरणीय परंपरा”

मंगेश विद्या मंदिर शाळेच्या 1992 च्या बॅचमधील माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींची एक खास परंपरा आहे. दरवर्षी किंवा किमान २-३ वर्षांतून एकदा तरी ही टीम आपल्या लाडक्या शिक्षकांना, “ठाकूर” सरांना भेटण्यासाठी एकत्र येते. यावर्षीही त्यांनी पालघर-डहाणू येथे जाऊन सरांची भेट घेतली. ही भेट केवळ एक कार्यक्रम नसून, त्यांच्या आयुष्यातील भावनिक आणि जिव्हाळ्याचा भाग बनली आहे.
सर्वजण ठरलेल्या दिवशी उत्साहाने एकत्र जमले. अनेक वर्षांनंतरही एकमेकांतील मैत्री तशीच घट्ट असल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला. प्रवासादरम्यान शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सरांचे किस्से, त्यांच्या शिकवण्याची शैली, आणि शिस्तीबरोबरच त्यांनी दिलेले प्रेम याबद्दल चर्चा रंगली.

ठाकूर सर हे शिस्तप्रिय आणि प्रेमळ शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिले नाही, तर आयुष्याची योग्य दिशा दाखवली. त्यांच्या शिकवणीमुळेच अनेक विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.

पालघर-डहाणू येथे पोहोचल्यावर सरांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. अनेक वर्षांनंतरही विद्यार्थ्यांना पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंद आणि अभिमान दिसत होता. प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांनी प्रेमाने संवाद साधला. या भेटीत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, एकत्र वेळ घालवला आणि काही छायाचित्रे काढून त्या क्षणांना कायमचे जतन केले.

ही परंपरा गुरु-शिष्य नात्याचे सुंदर उदाहरण आहे. काळ बदलला, जीवनाच्या वाटा वेगळ्या झाल्या, तरीही या नात्यातील जिव्हाळा आणि आदर कायम आहे. त्यामुळेच ही भेट दरवेळी सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरते.

🌼 नववर्षाभिनंदन 🌼🚩चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा शुभ दिवसनवीन वर्षाची सुंदर सुरुवात घेऊन आला आहे.आज उभारलेली गुढी आपल्या आयुष...
19/03/2026

🌼 नववर्षाभिनंदन 🌼🚩

चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा शुभ दिवस
नवीन वर्षाची सुंदर सुरुवात घेऊन आला आहे.

आज उभारलेली गुढी आपल्या आयुष्यात विजय, आनंद आणि यशाचे प्रतीक ठरो.

नवीन वर्षात नवे संकल्प, नवे ध्येय
आणि नव्या उत्साहाने पुढे जाण्याची
प्रेरणा प्रत्येकाला मिळो.

जुने दुःख, चिंता मागे ठेवून नव्या आशा, नव्या स्वप्नांसह हे वर्ष आनंदाने आणि समाधानाने जावो.

आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी
आणि भरभराट नांदो.

गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🌿 शुभ सकाळ! ☀️🙏

*सलग दोन विश्वचषकांवर भारताचे नाव भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट*भारतीय खेळाडूंनी सुरवातीपासूनच जिगरबाज खेळी केली....
08/03/2026

*सलग दोन विश्वचषकांवर भारताचे नाव भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट*

भारतीय खेळाडूंनी सुरवातीपासूनच जिगरबाज खेळी केली. संजू सॅमसन यांच्या सह फलंदाजांनी धुवांधार धावा काढल्या तर गोलंदाजानी कमाल दाखवली. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला गारद केले. क्षेत्ररक्षणातही ईशांत किशन, तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यासाठीची खिलाडू वृत्ती, मेहनत यांचे दर्शन भारतीय संघाने घडवले. या ऐतिहासिक विजयात संघातील सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक - मार्गदर्शक, व्यवस्थापनातील अधिकारी - कर्मचारी असे सर्वांचे निश्चितच योगदान आहे. भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाची सार्थ ओळख जगाला करून देण्याची कामगिरी आपल्या भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!,

जय शिवराय !सर्वगुणसंपन्न, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राजा म्हणजेच आपले शिवबा! स्वराज्याची भक्कम पायाभरणी करून रयतेला स्व...
19/02/2026

जय शिवराय !

सर्वगुणसंपन्न, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राजा म्हणजेच आपले शिवबा! स्वराज्याची भक्कम पायाभरणी करून रयतेला स्वाभिमान, सुरक्षितता आणि न्याय देणारे, शौर्य, धैर्य आणि कर्तृत्वाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांच्या पराक्रमाच्या गाथा अनेक शतके आणि पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणादायी ठरत आहेत.
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩

#राजा_छत्रपती_शिवाजी_महाराज #जयंती #मानाचा_मुजरा
#स्वराज्य #रयतेचा_राजा ​

Best Of Luck !
17/02/2026

Best Of Luck !

मंगेश विद्यामंदिर,  मालाड (पूर्व)प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्नदिनांक 26 जानेवारी 2026
26/01/2026

मंगेश विद्यामंदिर, मालाड (पूर्व)
प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न
दिनांक 26 जानेवारी 2026

🏏🇮🇳 भारतीय महिला क्रिकेट संघाला मनःपूर्वक सलाम! 🇮🇳🏏महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ...
03/11/2025

🏏🇮🇳 भारतीय महिला क्रिकेट संघाला मनःपूर्वक सलाम! 🇮🇳🏏

महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन! 💐

आम्हाला अभिमान आहे ! ❤️🇮🇳

|| सेवागौरव समारंभ ||आज दि. 16 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी आपल्या मंगेश विद्या मंदिर, मालाड (पूर्व) शाळेतील सर्वांगीण विक...
16/10/2025

|| सेवागौरव समारंभ ||

आज दि. 16 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी आपल्या मंगेश विद्या मंदिर, मालाड (पूर्व) शाळेतील सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. मोक्षदा शाहूराव साबळे मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण आणि श्रद्धेने आयोजित करण्यात आला होता.

सौ. साबळे मॅडम यांचं प्रेम, मार्गदर्शन आणि प्रेरणा आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि कर्मचाऱ्याचा मनापासून विकास होण्याचा मार्ग सुकर झाला. आज सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी यांच्यातर्फे त्यांना भावी आयुष्याच्या सुखसमृद्धी व आरोग्याच्या मंगलकामना शुभेच्छा देण्यात आल्या.

आपल्या साबळे मॅडम यांनी दिलेल्या अथांग प्रेम आणि समर्पणाला कोट्यवधी धन्यवाद!

💐🙏 आपली शिकवण आम्हा सर्वांसाठी चिरंतन प्रेरणादेत राहील!

कार्यक्रमातील टिपलेले क्षण पाहण्यासाठी क्लिक करा
👇

https://www.facebook.com/share/p/1A16YpnkXp/
---------

आपल्या सुखाचे गोडवे सगळ्यांना पटतीलच असं नाही, हि शिकवण कदाचित कळत नकळत पाटीवर आपण कोरलेल्या‘श्री गणेशानं’दिली असावी.. म...
05/09/2025

आपल्या सुखाचे गोडवे सगळ्यांना पटतीलच असं नाही, हि शिकवण कदाचित कळत नकळत पाटीवर आपण कोरलेल्या‘श्री गणेशानं’दिली असावी.. म्हणूनच आयुष्याच्या शाळेत शिकताना कधी? कोण? कुठे? काय? शिकवेल हे कटाक्षाने आपण शिकत पुढं जातो.

शाळेतल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात, कारण “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” याची सुरुवात शाळेतून झालेली असते, हे नक्की..

आपल्यातलं कौशल्य वाढवणाऱ्या आणि विचारांना योग्य आकार देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा..!

#शिक्षक_दिन📚

Big shout out to my newest top fans! 💎 Vikas ShirkeDrop a comment to welcome them to our community,
16/08/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Vikas Shirke

Drop a comment to welcome them to our community,

वसुदेव सुंत देवं कंस चाणूर मर्दनं |देवकी परमानंद कृष्ण वंदे जगतगुरूं ||गोपाळकाला व दहीहंडी म्हणजे उत्साह व ऊर्जेने ओसंडू...
16/08/2025

वसुदेव सुंत देवं कंस चाणूर मर्दनं |
देवकी परमानंद कृष्ण वंदे जगतगुरूं ||

गोपाळकाला व दहीहंडी म्हणजे उत्साह व ऊर्जेने ओसंडून वाहणारा उत्सव! आज अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करूया, पण सोबतच सुरक्षिततेची देखील काळजी घेऊया. एक थर जबाबदारीचा रचूया!
सर्वांना गोपाळकाला व दहीहंडी उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा...!

गोविंदा आला रे आला!
#गोपाळकाला #दहीहंडी

Address

Kokani Pada Kurar Village
Mumbai
400097

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangesh Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category