10/07/2025
🙏 गुरुपौर्णिमा विशेष 🙏
आज दिनांक १० जुलै २०२५, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे अभिव्यक्ती कट्टा लोकार्पण सोहळा मा. श्री. श्रीकांत भारतीय (सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद) यांच्या शुभहस्ते आणि Hon'ble कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमेय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
🔸 श्रीकांत भारतीय यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले, "गुरू माणसाच्या आत असतो, फक्त दिसतो बाहेर."
🔸 त्यांनी 'Just Feel it and Express it Completely' या भावनेवर भर दिला व ही संकल्पना भारतासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
🌼 Hon'ble प्रा. उज्वला चक्रदेव यांनी सांगितले की "अभिव्यक्ती कट्टा" ही संकल्पना श्रीकांत भारतीय यांची असून पुणे विद्यापीठात याचे पहिले रूप साकार झाले.
✳️ अभिव्यक्ती मंच, अभिव्यक्ती सखी (१३ सख्या) आणि अभिव्यक्ती कट्टा – या तिन्ही घटकांद्वारे विद्यार्थिनींना केवळ स्वतःला व्यक्त करणेच नाही तर मार्गदर्शन घेणे आणि मन मोकळे करणे शक्य होईल.
🏛️ या कट्ट्याचे डिझाईन विद्यापीठातील आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्सनी केले आहे.
🙏 Hon'ble VC Madam यांनी महर्षी कर्वे व ठाकरसीजी यांचे स्मरण करत, सर्व शिक्षक, विभागप्रमुख व कर्मचारी यांचे आभार मानले.
📢 विद्यार्थिनींना आवाहन — "या कट्ट्यावर सख्या सख्या मध्ये आपले विचार मोकळेपणाने मांडा."
\ #अभिव्यक्तीकट्टा #गुरुपौर्णिमा२०२५ #श्रीकांतभारतीय ्वलाचक्रदेव #अमेयदेसाई