09/05/2023
आज कर्मवीर अण्णांचा स्मृतिदिन...
कर्मवीर भाऊराव पाटील ...
माझ्या शाळेचे नाव ही हेच आणि मला त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख ही तिथेच झाली. कदाचित आज काही जो सामाजिक वारसा आणि शिक्षणाचे महत्त्व आणि ताकद जी कळली ती त्यांच्यामुळेच असावी... अजूनही आठवतं त्या वक्तृत्त्वाच्या स्पर्धा आणि अण्णांबद्दल भाषण करण्यासाठी वाचलेली माहिती... खरंच धन्य मी की मला वाचायला मिळाले तुमच्या बद्दल...
तसेच शाळेचे दिवस ही आठवले...