03/10/2024
राजाकडून मोठ्या युक्तीने आपली टोपी परत मिळवणाऱ्या चतुर उंदराची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असते. शिकाऱ्यानं टाकलेलं जाळं कुरतडून सिंहाच्या उपकाराची परतफेड करणारा उंदीरही आपल्याला माहितीये. पण उंदराला ‘उंदीर’ हे नाव कसं पडलं हे माहितीये का? जाणून घेण्यासाठी पाहा -
उंदराला उंदीरमामा का म्हणतात | उंदीर मामा की जय | उंदराच्या नावाचा अर्थ | उंदीरमामा #bhashaashakasha
Why is a mouse called a Undir Mama? #मराठीकथा #मराठी #उंदीरमामा #उंदीर #शब्दार्थ #व्युत्...
27/09/2024
चंद्राची 'ही' नावं आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी पाहा -
चंद्राच्या नावांचा अर्थ | चंद्राची टोपण नावं | चंद्राच्या नावांची व्युत्पत्ती #BhashaAshaKasha
| Chandra Name Meaning in Marathi | चंद्राच्या नावाचे मूळ | चंद्राच्या नावाची व्युत्पत्ती | शब्दकोश | व्युत्पत्ती कोश | मराठी शब्द....
19/09/2024
चंद्राला 'चांदोमामा' का म्हणतात? वेगवेगळ्या भाषांमध्ये चंद्राला काय नावं आहेत? शब्दकोशामध्ये याचे काही संदर्भ सापडतात का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा -
चंद्रमामधल्या मा अक्षराचा काय अर्थ आहे? इतर भाषांमध्ये चंद्राची काय नावे आहेत?@BhashaAshaKasha
चंद्राला मामा का म्हणतात? चंद्राच्या नावाचा अर्थ | चंद्रमामधल्या मा अक्षराचा काय अर्थ आहे? | Chandra Name Meaning in Marathi | चंद्राच्....
07/09/2024
महाराष्ट्रातल्या सानथोरांमध्ये ‘बाप्पा’ म्हणून लोकप्रिय असलेलं दैवत म्हणजे गणपती. आपल्या समाजजीवनात गणपतीच्या नावाभोवती अनेक म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग गुंफलेले आहेत. या दुसऱ्या भागात गणपतीसंदर्भात असे अनेक शब्दप्रयोग सांगितले आहेत.
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग २) | गणेशाच्या नावाभोवती गुंफलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार #ganesh
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग २) | गणेशाच्या नावाभोवती गुंफलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार ...
06/09/2024
गणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा ईश्वर किंवा स्वामी हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मुळात गण म्हणजे काय, गणांचा स्वामी म्हणजे कोणाचा स्वामी, याचा कधी विचार केलाय का? तर हा व्हिडिओ गणेशाच्या नावाचा मुळातून अर्थ समजून घेण्यासाठीच आहे.
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग १) | गणेश म्हणजे काय?#ganesh #ganeshutsav #viralvideos #ganesha
बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग १) | गणेशाच्या नावाचा अर्थ | गण म्हणजे काय? ...
28/08/2024
हरितालिकेची पूजा म्हणजे हिरव्या निसर्गाचीच पूजा म्हटली पाहिजे. या अर्थानं पार्वती हे आदिम सृष्टीचं रूपच ठरतं आणि आपल्या भारतीय संस्कृतीत तसं मानलंही जातं. 'हरितालिका' शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी पाहा.
हिरवेपणाची हरितालिका - हरतालिका | हरितालिका म्हणजे काय? #मराठीकथा #etymology #शब्दार्थ #व्युत्पत्ती
हरितालिका म्हणजे काय? हिरवेपणाची हरितालिका #मराठीकथा #शब्दार्थ #व्युत्पत्ती हरितालि.....
21/08/2024
ऋषीचं कूळ अन् नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात, कारण ते सापडणं कठीण असतं. पण, शब्दांचं मूळ अन् कूळ शोधायला काय हरकत आहे! मूळ सापडो ना सापडो, पण त्या प्रक्रियेत शब्दांच्या काही गमतीजमती नक्की सापडतील.
पाहा - https://www.youtube.com/
19/08/2024
चंदनाची सँडल
चंद्र, चंदन आणि इंग्लिशमधलं सँडलवूड व पायात घालायचं सँडल यांच्यात एक परस्परसंबंध आहे. तो संबंध नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा -
चंद्र, चंदन आणि सँडल | गोष्ट चंदनाच्या सँडलची | #sandalwood #sandals #moon #chandan #etymology
चंद्र, चंदन आणि सँडल |चंद्र आणि चंदनाचा काय संबंध आहे? गोष्ट चंदनाच्या सँडलची | मराठी शब्दार्थ | शब्दकोश | व्युत्पत्.....
29/07/2024
‘चांगला’ हा शब्द आपण रोज कितीदा तरी वापरतो. पण तो मूळ कोणत्या भाषेतला आणि मराठीशिवाय तो आणखी कोणकोणत्या भाषेत वापरला जातो, याविषयीची माहिती पाहिली की आपण थक्क होतो. मराठी भाषेतल्या ‘चांगला’ या शब्दाशी साम्य असणारा संस्कृतमधला शब्द म्हणजे चंग. त्यालाच हिंदी भाषेत चाँगला हा शब्द आहे. जुन्या हिंदीत हा शब्द प्रचलित होता.
बंगालीमध्ये याच अर्थाचा 'चाना' हा शब्द आहे. याचं मराठीतल्या छान शब्दाशी जास्त साम्य दिसतं. कानडीत चांगु, गुजरातीत चांगी, सिंधीमध्ये चंगो, तर पंजाबीत चंगा, असे शब्द आहेत.
ही चंग – चंगा – चांगु – चांगी – चंगो - चाँगला – चांगला यातली गंमत जाणून घ्यायला व्हिडिओ पाहा -
26/07/2024
‘घनचक्कर’ शब्दाचा शब्दकोशातला अर्थ विपुल, दाट, गर्द असा आहे. मग मुद्द्याचं सोडून भरकटत बोलणाऱ्या मनुष्याला उद्देशून ‘घनचक्कर’ हा शब्द कसा काय वापरात आला असेल? हे आणि घन, घना या शब्दांची विविध रूपं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. लिंक कमेंटमध्ये -
24/07/2024
संत ज्ञानेश्वरांच्या 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई' या अभंगातील किठाई शब्दाचा अर्थ सांगणारा हा व्हिडिओ.
हे किटणं म्हणजे साधं मळणं नव्हे, तर खूप मळणं, इतकं की मळाचे थरावर थर बसणं. अंगाला, कपड्यांना कीट येऊ शकतो, त्याप्रमाणे तेलाची चिकटी, भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश, दातांवर जमलेला मळ यांनाही कीट किंवा किटणं म्हटलं जातं. कृ. पां. कुलकर्णींचा ‘व्युत्पत्ति कोश’ आणि डॉ. मु. ब. शहा संपादित वि. का. राजवाडे यांच ‘नामादिशब्दव्युत्पत्तिकोश’ यांच्या आधारे 'किठाई' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे.
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई | काय आहे किठाई शब्दाचा अर्थ? | #marathi #vithumauli #viralvideos
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई | काय आहे किठाई शब्दाचा अर्थ? | भाषा अशा कशा | Bhasha Asha Kasha |मराठी शब्दार्थ | व्युत्पत्ती क....