14/05/2026
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांबाबत समाजात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. पालिका शाळांमध्ये केवळ आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात, हा जुना समज आता मागे पडत असून, नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
Only Manini चॅनलच्या ‘नॉलेज कट्टा’ या पॉडकास्टमध्ये शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी महानगरपालिका शाळांमधील बदलती शैक्षणिक प्रणाली, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील हा सकारात्मक बदल आणि विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे.