फेसबुक बंद असतांनाचा अनुभव.... अतिशय चांगलं काम होतं. उत्पन्न वाढतं. प्रत्येकाने हा अनुभव घेऊन बघावा. फेसबुकावरील अमर्याद वावर तुम्हांला तुमच्या मूळ धंदा, पेशा, व्यवसायापासून दूर नेतो. कारण लोक काय लिहितात त्यावर रिऍक्ट करण्यात तुम्ही गुंतलेले असता.
फेसबुकाचा दुसरा एक तोटा म्हणजे, ज्यांची आपल्या पायाशी उभं राहण्याचीही लायकी नाही, ते लोक आपले मित्र म्हणून सामावले जातात.
आपला,
(आपला) धोंडोपंत आपटे!
रत्नागिरी टाईम्स / कोकण टुडे
1031, Narayan Leela, Jaysthambh, Ratnagiri, Maharashtra, India. Fax : (02352) 222861, Mob. 9422052508. i
राजापूरची गंगामाई अवतरली
राजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या गंगामाईच्या प्रवाहात वाढ झाली आहे. राजापूरच्या गंगेचे आगमन झाले असून, इतर कुंडांमधील पाणीसाठ्यातसुध्दा वाढ झाली आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गंगामाईचे गेल्या वेळी ११ एप्रिल २०१२ रोजी आगमन होऊन सुमारे ११ महिन्यांच्या वास्तव्यानंतर २३ मार्च २०१३ रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. यापूर्वी तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर गंगामाई निर्गमन होत असे. परंतु गेल्या वेळी ११ महिने वास्तव्याचे कोडे कोणालाही सुटलेले नाही.
यंदा जून महिन्यातील मान्सूनपूर्व पावसामुळे गंगामाईच्या पाण्याच्या प्रवाहात काहीशी वाढ झाली होती. गायमुखातून अल्पसा प्रवाह वाहत होता. २३ जुलैच्या पहाटेपासून मात्र मूळ प्रवाहात वाढ झाली आहे. आता तर अन्य कुंडांतील पाण्याच्या पातळीतसुध्दा वाढ झाल्याने गंगामाई अवतरल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे भाविक आणि स्थानिक ग्रामस्थ उन्हाळे तीर्थक्षेत्री धाव घेऊ लागलेआहेत.
15/06/2014
गुहागरमध्ये अजस्त्र लाटांनी जेटी खचली, लाखो रुपये पाण्यात
गुहागर (प्रतिनिधी) - गुहागरच्या पर्यटन वाढीसाठी येथील समुद्रावर चौपाटीपासून ते समुद्राच्या पाण्यापर्यंत उभारण्यात आलेल्या कॉंक्रीटची सॉलिड जेटी पावसाला सुरुवात होण्याअगोदरच अजस्त्र लाटांनी पाच फुटापर्यंत खचली असून, उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्यासारखेच आहेत.
गुहागर समुद्रकिनारी रत्नागिरी येथील पतन अभियंता विभाग पर्यटन महामंडळ अंतर्गत बारावा वित्त आयोग सागरी किनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत आमदार भास्कर जाधव यांनी येथे ही सॉलिड जेटी मंजूर करुन आणली. सुमारे ९६ लाख रुपये खर्च करुन या जेटीची उभारणी होऊन आम. जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही करण्यात आले. या जेटीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्टील वापरण्यात आलेले नाही. समुद्रातील अशा प्रकारच्या जेटीमध्ये स्टील वापरले जात नाही, असे पत्तन अभियंत्यांनी जेटीचे बांधकाम सुरु असताना उत्तर दिले होते. त्यामुळे जेटीच्या पायाखाली काळ्या दगडाचा वापर करुन कॉंक्रीट जेटी उभारण्यात आली. परंतु पावसाला सुरुवात होताना उधाणाच्या आलेल्या भरतीने या जेटीचे वास्तव रुप समोर आणले आहे.
फॅशन वर्ल्डमध्ये रत्नागिरीची कस्तुरी चमकली
गोवा येथील सुप्रसिद्ध चंदन ग्रुपच्या आत्मा या गोव्यातील पहिल्याच फॅशन कॅलेंडरमध्ये रत्नागिरीची नवी मॉडेल कस्तुरी रेडीज ही चमकली आहे. रत्नागिरीचे रहिवासी फॅशन फोटोग्राफर संजीव साळवी व रत्नागिरीच्या इन होग ब्युटीकच्या संचालिका शलाका संधु यांनी नुकतेच गोव्यातील फॅशन कॅलेंडर काढले. त्याचे प्रकाशन गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर, गोवा कला ऍकॅडमीचे विष्णू वाघ, कर्नल आशिष देव, कर्नल संदीपकुमार यांच्या व मान्यवरांच्या तसेच मॉडेल्स व फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. फोटोग्राफर संजीव साळवी यांनी मुंबई, पुणे, गोवा येथे फॅशन फोटोग्राफी जगतात नाव केले असून फॅशन डिझायनर शलाका संधु यांनी सुद्धा मुंबई व गोवा येथे फॅशन डिझाईनचे काम केले आहे. या दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून या कॅलेंडरची निर्मिती झाली आहे. त्याला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या फॅशन कॅलेंडरमध्ये रत्नागिरीच्या कस्तुरी राजन रेडीज या तरूणीचा मॉडेल म्हणून समावेश झाला आहे. याबाबत कोकण टुडेशी बोलताना कस्तुरी हिने आपला मॉडेल क्षेत्रातला हा पहिलाच अनुभव असून या क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती. ही संधी मला फोटोग्राफर संजीव साळवी आणि डिझायनर शलाका संधु यांनी उपलब्ध करून दिली.
या कॅलेंडरचा इव्हेंटचा कार्यक्रम गोवा कला अकादमीत पार पडला. यावेळी अनेक नामवंत या ठिकाणी उपस्थित होते. अशा मोठ्या कार्यक्रमातून मला संधी मिळाल्याने माझे बरोबरच रत्नागिरीचे नावही या जगतात पुढे आले आहे. आई -बाबांचा पाठिंबा तसेच हितचिंतकांचे सहकार्य यामुळेच मी या फॅशन डिझाईनच्या जगतात पाय रोवला असल्याचे कस्तुरी हिने सांगितले.
कस्तुरीबरोबरच या कॅलेंडरमध्ये कोकण सुंदरी शितल पाठक हिच्यासह जर्मनी, गोवा, बंगळूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणच्या मॉडेलचा समावेश आहे. कस्तुरीच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.
400 टन हापूस कुठे न्यावा हे कोडे सुटेना!
रत्नागिरी - हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते. कुटुंबाच्या तिस-या पिढीचे प्रतिनिधी असलेले शेतात राबत आहेत. त्यांचे आजोबा आंब्याचे पीक घेत होते... हापूसला जगभरातील दरवाजे बंद झाले आहेत. हे केवळ व्यावसायिक नुकसान नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे,
1932 मध्ये 200 एकरात आंब्याची लागवड केली. यावर्षी 400 टन हापूस पिकल्याने ते आनंदात होते. कराचीत दुकान सुरू केले होते, मात्र ताळमेळ जमला नाही. नागपूरनंतर त्यांनी पुण्यात व्यवसाय थाटला. हापूसच्या आर्थिक उत्पन्नावर विश्वास बसल्याने त्यांनी दोन्ही मुलांना या व्यवसायात गुंतवले.
तीन पिढ्यांच्या कष्टातून आंब्याची शेती बहरली. सध्या 2 हजार एकरावर 12 हजार झाडांची मालकी या कुटुंबाकडे आहे. या भागातील अनेक शेतक-यांचे नशीब पालटले आहे. येथे कोणी शेतकरी तर कोणी व्यावसायिक. त्यामुळे मजुरांची वानवा आहे. 5000 लोकसंख्येच्या मध्ये एक हजार ट्रक, टेम्पो, कार व जीप आहेत.
आंबा फळांचा राजा आहे. त्यात हापूसची स्थिती महाराजाप्रमाणे आहे. त्याची राजधानी रत्नागिरी आहे. मात्र, युरोपीय देशांनी हापूसवर घातलेला बंदीचा निर्णय उत्पादकांसाठी अडसर ठरला आहे. आंब्याच्या किमती निम्म्यापेक्षा घसरल्या आहेत. पाच डझन आंब्याची दीड ते दोन हजार रुपयांना मिळणारी पेटी आठशेवर आली आहे.
आंबे विदेशात पाठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया रत्नागिरीऐवजी सहाशे कि.मी. अंतरावरील लासलगाव येथे आहे. या ठिकाणी लखनऊच्या राष्टÑीय संशोधन केंद्राची शाखा असावी, अशी आंबा व्यावसायिकांची मागणी आहे. येथील लोक स्वत:ला शेतकरी नव्हे, तर फळांच्या राजाचा दूत असल्याचा अभिमान बाळगतात. सरकारने आंब्याकडे केलेले दुर्लक्ष त्यांना सहन होत नाही.
मुंबईत ट्रक उभे करण्यास जागा मिळत नव्हती. जिथे एका दिवसात 80 हजार पेट्या पोहोचत होत्या तिथे दोन लाख पेट्यांची रांग आहे. राजाची अशी अवस्था याआधी कधी झाली नव्हती.
- XYZ , हापूस उत्पादक
ना. नारायण राणे राहणार कॉंग्रेसमध्येच
SATURDAY, 07 JUNE 2014 सिंधुदुर्गनगरी -
कॉंग्रेस नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुकीनंतर अस्वस्थ असून, ते कॉंग्रेस पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सुरु असतानाच राणे आता कॉंग्रेसमध्येच थांबण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी राणे यांनी मुंबईत ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी यासंदर्भात चर्चा केली असून, बहुतांशी पदाधिकार्यांनी आपण कॉंग्रेसमध्येच राहून निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देऊ, अशी मते मांडल्याची जोरदार चर्चा सिंधुदुर्गात सुरु आहे. राणेंसोबत शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या निष्ठावंत राणे समर्थकांनी ‘तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य’ असल्याचे मत व्यक्त केले. तरीही काही राणे समर्थक कॉंग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. कॉंग्रेस सोडून भाजप किंवा इतर पक्षात गेल्यास जनाधार आणखी घटण्याची भीती काहीजण खासगीत व्यक्त करीत आहेत.
10/06/2014
पर्यावरण समृद्ध योजनेत कोकण अव्वल
TUESDAY, 10 JUNE 2014 खेड, ( प्रतिनिधी) ः
कोकण म्हणजे समृद्धी.. कोकण म्हणजेच निसर्ग जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणजेच कोकण! या कोकणाला राज्य सरकारने राबवलेल्या पर्यावरण समृद्ध ग्रामयोजनेंतर्गत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. नवे वृक्ष, नवी झाडे यांची लागवड करताना निसर्गनिर्मित पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असे धोरण राबवून गावागावात केलेली विकासकामे हे या प्रगतीचे नवे पाऊल आहे.
कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी या योजनेंतर्गत पर्यावरण विकास पुरस्कार प्राप्त केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींना असे पुरस्कार मिळाले आहेत. यातूनच नैसर्गिकदृष्टया समृद्धी जपणारा कोकण असल्याचे सिद्ध झाले.
पर्यावरण समृद्ध ग्राम पुरस्कार योजना २०१० साली सरकारने सुरू केली. पर्यावरणाचा र्हास होऊ नये, लोकांना वृक्षारोपणासंदर्भात आवड निर्माण व्हावी आणि फलोत्पादनाचाही फायदा शेतक-यांनी व्हावा, अशा दुहेरी हेतूने ही पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अस्तित्वात आली. ज्या पद्धतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले गेले, त्याच धर्तीवर ही योजना अस्तित्वात आली.
बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती, सामुदायिक स्वयंपाकगृह, निर्धूर चुली, पशुपालन, बायोगॅस सयंत्र, कच-यापासून कोळसा कांडी तयार करण्याचा प्रयत्न जैववैविधता उद्यानांची निर्मिती आणि पावसाळ्यात पाण्याचे संकलन ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून व्यक्तिगत पातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे पर्यावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे लाभार्थ्यांना मिळणा-या फायद्यामुळे नैसर्गिक उत्पादनांवर ग्रामस्थांनी दिलेला भर अशा समन्वयातून ही योजना यशस्वी होत असताना पावसाळयाच्या सुरुवातीला वृक्ष लागवड करणे, या वृक्षात फळ झाडांचा समावेश असल्याने एकीकडे उजाड जमिनीवरही वृक्ष लागवड झाली तर दुसरीकडे शेतक-यांनाही त्याचा फायदा झाला.
काजू, आंबे, फणस, कोकम, नारळ, चिकू, आवळा, अशा फळ झाडांची लागवड करून या योजनेतूनही ‘कृषी ग्राम’ ही संकल्पना उदयास आणली. या सर्व कामात कोकणातील अनेक गावांनी पुढाकार घेतला आणि विकास रत्न पुरस्कारही प्राप्त केला. या पुरस्कारात जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायती अग्रेसर आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यामधून असे काम झाले असले तरी ते फारच नगण्य आहे. अमरावती जिल्ह्यातून ७, नागपूर जिल्ह्यातून ९ अशा किरकोळ ग्रामपंचायतींना विकासरत्न पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आणि कोकण या पुरस्कारात आघाडीवर आहे. औरगांबाद आणि नाशिक विभागातून फक्त १० पुरस्कार मिळाले असून पुणे विभागात ४२३ पुरस्कार मिळाले असल्याची माहिती उपलब्ध आहे.
http://www.konkantoday.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=37&Itemid=615
रत्नागिरी KONKAN TODAY | MARATHI BREAKING NEWS
सॅफरॉनविरुध्द फसवणुकीचा गुन्हा
रत्नागिरी (प्रतिनिधी) - दुबई सफरीचे आयोजन करुन १ लाख ५४ हजार रुपये घेऊन ती टूर आयोजितच न करणार्या सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रा.लि.चे शशिकांत राणे, त्यांचे सहकारी प्रतिक्षा पार्टे, ऐश्वर्या जावकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कंपनी एक सो डबल योजना राबवत होती. रत्नागिरीमध्ये या योजनेंतर्गत अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडवले गेले. रत्नागिरीकर मात्र याबाबतची तक्रार करण्यास धजावले नाहीत. कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील महेश विराजीराव सासने यांनी कोल्हापुरात पोलिसांकडे तक्रार केली. शून्य नंबरने ही तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग झाली आहे.
कोल्हापुरातील महेश सासने यांच्या तक्रारीनुसार दुबई सफरसाठी १ लाख ५४ हजार रुपये भरण्यात आले. २ मार्च २०१३ रोजी हे पैसे देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ही टुरच आयोजित केली गेली नाही. यामध्ये कोल्हापुरात राहणारे सागर पिसाळ, सुचेता सासने, आनंदराव माने, मीना माने, इंद्रजित माने, सुभाष पिसाळ, शकुंतला पिसाळ, संजीवनी पिसाळ यांचीही फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Ratnagiri
Mumbai
415612