10/05/2024
https://youtu.be/LIjqLBm0vaw
शिक्षणाची व्याख्या ही "क्षणा क्षणाला शिकणं," अशी केली जाते. पंचेंद्रिय सतत कार्यरत असतील तर बाह्य जगातील अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि त्यातूनच "माणूस "शिकत जातो , घडत जातो. परंतू हे शिक्षण झालं ते "अनौपचारिक" पद्धतीने! परंतू जर औपचारिक रित्या स्वतःची प्रगती होण्याचं महत्वाच ठिकाण म्हणजे एखादं "विद्यालय".
पुर्वी सन्यासावस्थेत असतांना विद्यार्जनासाठी मुल गुरुगृही जात असे. त्याच्या सर्वांगीण विकासाची संपूर्ण जवाबदारी त्या आश्रमातील गुरुंजींची असे. सर्वच विषयाचे शिक्षण देेत असतांना त्या विद्यार्थ्याचा कल पाहून त्या विद्यार्थ्याला गुरू एखाद्या विषयात पारंगत करत असे. आणि सुयोग्य शिक्षण पूर्ण करून दीक्षांत समारंभ झाल्यावर 'तो' प्रौढ होवून समाजात स्वतःला सिद्ध करत असे.
काळ बदलला , गरजा बदलल्या गुरूकुलाचं रुपांतर शाळांमध्ये झालं. शिक्षण क्षेत्रातही बरेच बदल होत गेले. मुळ अभ्यासक्रम जरी सर्वसाधारण सारखाच असला तरी शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रयेग होवू लागले. आणि त्यातूनच शिक्षणाचे नानाविध पर्याय उपलब्ध झाले. स्पर्धात्मक युगात टिकून रहाण्यासाठी,नव्हे यशस्वी होण्यासाठी उत्तम शिक्षण मिळणं आणि त्यासाठी योग्य शाळा प्रवेश घेणं ,ही पालकांची मानसिकता झाली, जी काही अंशी स्वाभाविक होती आणि आहेही.
'मागणी पुरवठ्याच्या' सिद्धांताच्या आधारावर अनेक शिक्षण संस्था आणि पद्धती आल्या .त्यातूनच काही नवीन प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण झाले. आपल्या मुलाला शाळेत प्रवेश घेतांना त्याच्या शिक्षणाचे माध्यम काय असावे? कोणत्या शिक्षण प्रणालीचा अवलंब करावा ? कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा.......हे आणि असे प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात येत असतांना येत असल्याने बरेचदा पालक गोंधळून जातांना पहाण्यात आले. आणि याचं प्रश्नांची योग्य पद्धतीने उकल व्हावी यासाठी "SMART" ने आपल्यासाठी हा विडीओ आणला आहे.
*VIDEO LIVE NOW !!!*
शिक्षणाची व्याख्या ही "क्षणा क्षणाला शिकणं," अशी केली जाते. पंचेंद्रिय सतत कार्यरत असतील तर बाह्य जगातील अनेक चांग...