चित्रपतंग कलाजत्रा

चित्रपतंग कलाजत्रा

Share

csks trust

23/12/2024
07/03/2023

ग्रामीण भागातील मुलांसाठी कायमच चित्रकला शिक्षणाचा दुष्काळ आहेच.
यांच्यासाठी चित्रपतंग कलाजत्रा म्हणजे आनंदाचा टँकरच.

काय होतं कलाजत्रेत?
●कल्पकता आणि निरीक्षणक्षमता वाढवणारे अनेक उपक्रम असतात
●विविध माध्यमातून परिसराचे दृश्यसंवर्धन होतं
●जगभऱ्यातल्या प्रसिद्ध चित्रपुस्तकांचा आस्वाद घेता येतो
● केवळ जि. प. मराठी शाळां/आश्रम संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव व पूर्ण मोफत असतो.

कुठे?
रायगड-रत्नागिरी येथील दुर्गम भागातील जि. प. मराठी शाळांमध्ये कलासाक्षरतेचा उपक्रम पोहचवायचाय.

या प्रकारे सहभागी व्हा
● तुमच्या परिचयाच्या शाळेसाठी प्रायोजकत्व मिळवून चित्रपतंग कलाजत्रा आयोजित करा.
● आम्ही नमूद केलेले रंगसाहित्य देऊ शकता
●आम्हाला आर्थिक मदत देता येईल.
..

ऑनलाइन पेमेंटसाठी व अधिक माहितीसाठी व्हाट्स ऍप क्र. ९०२९९२९५७५.

संस्थेचा खाते तपशील पोस्टरमध्ये दिला आहे.
चित्रपतंग कलाजत्रा
चित्रपतंग : मराठी शाळा टिकवा

27/01/2023

वेळास जि. प. च्या इ.५,६,७ च्या मुलांना गावातील चार-पाच समस्या जाणवल्या. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे समुद्राने वाहून आणलेला कचरा आणि लाटांमुळे तुटणारा रस्ता. ही समस्या समुद्र किनारी राहणाऱ्या प्रत्येक शहराला असते. आता समुद्राला भिडायचा वेडेपणा करणं म्हणजे उत्तरंही वेडेपणाकडे जाणारीच हवी.
मुद्दाम इयत्तेनुसार केलेल्या गटामधून समस्येवर उत्तरे थोडी फार सारखीच आली. ते म्हणजे सुरू,खारफुटीसारखी झाडे लावणे किंवा भिंत, बांध घालणे. खारफुटी वाढण्यापर्यन्त वेळ नाहीये. त्यामुळे उपक्रमाशेवटी बांध घालण्याचा निर्णय अंतिम झाला. प्रत्येक गट उद्या घरून लाटांना थोपवणारा बांध घालणारेत. आज थिअरी पण तो कशाचा असेल ? किती काळ टिकेल? हे उद्या प्रत्यक्षच पाहुयात. चित्रपतंग कलाजत्रा

24/04/2022

चित्रकला दृष्टीच्या सर्व १० गुणधर्मांशी संबंधित आहे;
जे आहेत: अंधार, प्रकाश, घनता, रंग, स्वरूप, स्थान, अंतर, निकटता, गती आणि विश्रांती.
-लिओनार्डो दा विंची

www.csks.in
चित्रपतंग कलाजत्रा

14/03/2022

पुढली ७९ सेकंद... स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी!

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mumbai
400067

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm