29/01/2023
आज दिनांक 29/1/2023 रविवार रोजी आपल्या शाळेतील 1998-1999 एसएससी बॅच चा स्नेह मेळावा आपल्या शाळेतील पटांगणात आयोजित करण्यात आला होता, आपल्या शाळेतील सर्व आदरणीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमा मध्ये सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवली,
स्नेह मेळावा प्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापली मनोगत व्यक्त केले तत्प्रसंगी सर्वांच्या भावना दाटून आल्या होत्या आणि सर्वांनाच आपसूक अश्रू अनावर झाले होते,
अनेक मित्र तब्बल 23/24 वर्षांनी भेटले होते, त्यामुळे सर्वच जण अत्यंत आनंदी होते, सर्वच विद्यार्थ्यांनी कौतुकाने वर्गात बसून फोटो काढले, कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित मिळून स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला आणि सरते शेवटी सर्वांनीच भाव मुद्रेने एकमेकांना निरोप दिला,
आजच्या कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी मिळून प्रयत्न केले होते, काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव हजर राहता आले नाही, त्यांनी पुढील वेळी नक्की हजर राहणार असे आश्वासन दिलेले आहे, पुढील वेळी अजुन भव्य दिव्य आयोजन करण्याचा संकल्प आहे आणि शाळेतील सर्वच बॅच ला निमंत्रित करण्यात येणार आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून हजर राहिलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार
आपला नम्र
ॲड.विकास खरात
अध्यक्ष
रत्नभुमी विद्यालय माजी विद्यार्थी संघ