13/04/2026
*पत्रकारितेचे अद्ययावत आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची सुसंधी...*
प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक *अर्हता* - कोणत्याही शाखेची पदवी
*कालावधी** - एक वर्ष (शनिवार
आणि रविवार)
*प्रवेश क्षमता* - ३० विद्यार्थी..
*स्थळ* - गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था , मुंबई विद्यापीठ - कलिना, सांताक्रूझ..
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था या अग्रगण्य शिक्षण संस्थेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम( पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट - मराठी) गेल्या २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. मुद्रित, दृक श्राव्य तसेच वेब प्रसारमाध्यम क्षेत्रात वार्ताहर, उपसंपादक, संपादक, भाषांतरकार, वृत्त निवेदक, कंटेंट रायटर्स , ब्लॉग रायटर्स, जनसंपर्क अधिकारी, इव्हेंट मॅनेजर अशा नानाविध करिअरच्या संधी देणारा हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जातो. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करत आहेत. पदवी नंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. पत्रकारिता क्षेत्रातील अध्यायावत संकल्पनांचा समावेश असणारा अभ्यासक्रम, इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या संधी त्याचबरोबर या क्षेत्रात नोकरीसाठी केले जाणारे सहाय्य ही या वर्गाची वैशिष्ट्ये आहेत.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. यावर्षी ही प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आली आहे.. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेचे स्वरूप प्रत्येकी २ गुणांचे १५ बहुपर्यायी प्रश्न आणि प्रत्येकी १० गुणांचे २ लेखी प्रश्न या स्वरूपाचे असेल.या परीक्षेनंतर त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी कौशल्य विकासाच्या दृष्टीने आणि माध्यम क्षेत्रातील उपलब्ध अनेक व्यावसायिक संधी मिळविण्याच्या दृष्टीने या पत्रकारिता वर्गाला जरूर प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षा आणि वर्गाची माहिती देण्यासाठी प्रवेश परीक्षेआधी एक ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात येईल. त्याबद्दल सूचना कळवण्यात येईल.त्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती. 🙏
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या https://enrollonline.co.in/Registration/Apply/GICED या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध असणारा अर्ज भरणे बंधकारक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीमती नम्रता कडू, वर्ग समन्वयक, मराठी पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट ७९७७४८९०७६, [email protected]