Deodhar School of Indian Music

Deodhar School of Indian Music

Share

LEARNING Prof. B. R. Deodhar

[ the following is an excerpt from "Between Two Tanpuras" by Shri Vamanrao Deshpande.]

My Friend Professor B.R. He is Deodhar. degree.

Deodhar: A Versatile Musicologist


This was way back in 1926-27. 1 had just started visiting the Trinity Club of Music. On one occasion I was surprised to see a person at the Club fully clad in Western dress. In those days one did not normally see a singer dressed like an Englishman. So I inquired in an undertone of a person sitting next to me, "Who is he?" He -whispered back sarcastically, "Oh!

01/07/2024

आज १ जुलै २०२४. ऑपेरा हाऊस येथील फ्रेंच ब्रिज कॉर्नरच्या मोदी चेंबर्समध्ये देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक ही गुरुवर्य प्रा. बा.र. देवधर यांनी उभी केलेली संस्था १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांचे गुरू पं विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या आज्ञेवरून त्यांनी १ जुलै १९२५ रोजी प्रार्थना समाजच्या जागेमध्ये विद्यालयाची स्थापना केली. प्रार्थना समाजवादी श्री कोरे यांच्याशी देवधर मास्तरांची दोस्ती झाली होती. आणि त्यांच्या विनंतीवरून मास्तरांनी प्रार्थना समाजच्या पुस्तिकेतील गीतांना चाली लावून शिकवण्यास सुरुवात केली आणि ती खूप लोकप्रिय होऊ लागली. त्या वेळी त्यांनी प्रार्थना समाजचे अध्यक्ष वासुदेवराव भांडारकर याना भेटून विद्यालय सुरू करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी संध्याकाळी पाच नंतर राममोहन हायस्कूल सुटल्यानंतर पहिल्या मजल्यावरील तीन खोल्यात संगीत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. आणि अशा रीतीने विद्यालय सुरू झाले. स्वातंत्र्य सेनानी श्रीमती सरोजिनी नायडू यांनी सुचविल्या प्रमाणे SCHOOL OF INDIAN MUSIC हे नाव विद्यालयाला देण्यात आले.आणि आपल्या गुरूंचे स्वप्न पूर्ण केले.
विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. जागा अपुरी पडू लागल्याने १९४२ साली मोदी चेंबर्समध्ये विद्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. रविवारी मोफत वर्ग, स्त्रियांसाठी स्वतंत्र वर्ग, त्यांना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिकांची नियुक्ती, पलुस्कर पुण्यतिथीचे कार्यक्रम,त्यात विद्यार्थ्यांचे जलसे तसेच या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे आशा विविध उपक्रमांमुळे विद्यालयाचे बस्तान व्यवस्थित बसले. पंडित कुमार गंधर्व यांचे मस्तरांकडे आगमन याच काळात झाले.१४ वर्षे गुरुगृही राहून त्यांनी संगीत शिक्षण घेतले. त्यांच्या सर्वांगीण विकासात या विद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे.
पंडित रवी शंकर, अली अकबर खान साहेब , खांसाहेब अल्लरखा , उस्ताद बडे गुलाम अली तसेच विविध घराण्यातील अनेक नामवंत कलाकारांचे कार्यक्रम या जागेत झाले.
१९७३ साली आलेल्या आगी सारख्या भयंकर संकटातून सावरून विद्यालय पुन्हा उभे राहिले. देवधर मास्तरांच्या निधनानंतर त्यांचे भाचे पं शाम गोगटे आणि त्यांची पत्नी रोहिणी गोगटे यांनी विद्यालय समर्थ पणे सांभाळले.त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव गिरीश गोगटे ही धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
आजही हे विद्यालय कोविड. लॉकडाऊन सारख्या भयंकर संकटाना सामना देत दिमाखात उभे आहे. राग संगीत,कथ्थक, भरतनाट्यम या सारखे नृत्यप्रकार सुगम संगीत, हार्मोनियम, तबला, व्हायोलिन, तसेच नवीन पिढीसाठी गिटार कीबोर्ड सारखी वाद्ये यांचे शिक्षण दिले जाते.
या वर्षात गायन वादनाचे कार्यक्रम तसेच दृक्श्राव्य कार्यक्रम. व्याख्याने इत्यादी कार्यक्रम सादर करण्याचा विद्यालयाच्या विश्वस्तांचा मानस आहे.

31/08/2020

Welcome to the official youtube channel of Deodhar's school of Indian Music .
This channel will be the medium of all the musical activities of the school . So please like subscribe , share and be a part of our school .
We will update regularly with rare and valuable music and music related content.

https://www.youtube.com/playlist?list=PLzgO-KyEO_AYOueg2PZmgnoXwCRtX4S34

03/06/2019

Starting Keriok and Track Singing ...
Soon ...
Will keep posting

03/06/2019

Starting Keriok classes , Track Singing , soon .....

Photos from Deodhar School of Indian Music's post 21/05/2017

Proud

04/04/2017

the famous hindustani classical singer KISHORITAI AMONKAR passed away ..it's very sad .... great loss .. RIP

21/08/2016

आज गायनाचार्य पं विष्णु दिगंबर पलुस्कर यांची पुण्यतिथी . त्या निमित्त त्यांच्याविषयी थोडेसे........




पलुस्कर, विष्णु दिगंबर


पलुस्कर, विष्णु दिगंबर : ( १८ ऑगस्ट १८७२—२१ ऑगस्ट १९३१ ). महाराष्ट्रातील एक योर संगीतप्रसारक, गायनाचार्य व गायक. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ; पण पूर्वीचे पलुसचे रहिवासी असल्याने ते पलुस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘पंडित विष्णु दिगंबर’ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील दिगंवरपंत हे चांगले कीर्तनकार होते व कुरुंद वाडच्या छोट्या पातीचे राजे दाजीसाहेब यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे राजघराण्यातच विष्णुबुवांचे शिक्षण सुरू झाले. त्यांच्या जीवनात बालपणीच एक गंभीर अपघात घडला आणि परिणामतः ते संगीताकडे वळले. एका उत्सवात मुलांचे दारू उडविण्याचे काम चालू असताना एक भुसनळा लहानग्या विष्णूच्या तोंडावर उडाला, त्याचे तोंड भाजले व डोळ्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण स्थगित करावे लागले. विष्णूला लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग असल्यामूळे मिरज येथे असलेल्या संगीताचार्य पंडीत बालकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे पाठवून संगीतविद्या शिकविण्याचे ठरविण्यात आले) कुरुंदघाडच्या राजेसाहेबांनी विष्णूला मिरज येथे पाठवले व त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम मिरजेच्या राजेसाहेबांवर सोपविले. बाळकृष्णबुवा यांच्याकडे विष्णूने नऊ वर्षे मन लवून संगीताचा अभ्यास केला. विष्णुबुवांचा आवाज मेहनतीने अत्यंत गोड, सुरीला व बुलंद झाला होता, पं. बाळकृष्णबूवांकडून त्यांनी अत्यंत शुद्ध स्वरूपात ग्वाल्हेर गायकी प्राप्त केली होती. आलाप, बोल उपज व वजनदार ताना या तिन्ही अंगांचा समतोल त्यांच्या गायकीमध्ये साधला होता. ही सर्व विद्या त्यांनी गुरुगृही संपादन केली. अशा रीतीने त्यांनी विद्यार्थिदशेतच संगीतावर खूप मेहनत केली व आता गाण्याची तयारी उत्तम झाली आहे, असे समजून १८९३ साली त्यांनी मिरज सोडले.

तत्कालीन समाजात संगीतकला व तिचे उपासक यांना मुळीच मान नव्हता. ज्यांना उपजतच संगीताची खास आवड व कलेची नैसर्गिक देणगी असे, ते दूरवर जाऊन संगीतकला शिकत व संगीताच्या सेवेत समाधान मानीत. काही संस्थानांतून काहींना थोडाफार राजाश्रय मिळे; पण बहुतेकांची सांपत्तिक स्थिती चिंताजनकच असे. ह्या सर्व परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून संगीतकलेचे पूर्वीचे वैभव व महत्त्व तिला प्राप्त करून देणे आणि समाजात कलाकाराला मानाचे स्थान मिळवून देणे, हे ध्येय गुरुगृह सोडताना विष्णुबुवांनी डोळ्यासमोर ठेवले व पुढे आयुष्यभर या ध्येयपूर्तीसाठी निष्ठापूर्वक अखंड परिश्रम केले. मिरज सोडल्यानंतर ते औंध–सातारा–पुणे–मुंबई करीत बडोदे येथे गेले. महाराणी जमनाबाईसाहेब यांना विष्णुबुवांचे गाणे खूपच आवडले आणि त्यांनी त्यांना तीन-चार महिने बडोद्यातच ठेवून घेतले. तसेच स्वतःची शिफारसपत्रे देऊन काठेवाड, सौराष्ट्र व राजस्थान येथील राजेलोकांकडे पाठवले. सर्व ठिकाणी त्यांच्या मैफली होऊन त्यांना चांगला पैसा मिळू लागला; पण पैसा मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते. संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा व कलावंतांना समाजात मानाचे स्थान मिळून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण जनतेला मुक्तहस्ते व कमी खर्चात मिळावे म्हणून ठिकठिकाणी संगीत विद्यालये स्थापन करणे, गरीब व सत्प्रवृत कुटुंबातील मुले घेऊन त्यांचे पालनपोषण करून, त्यांना संगीतकलेचे शिक्षण देणे व त्यांतून उत्तम कलाकार आणि संगीतशिक्षक तयार करणे, हे त्यांचे ध्येय होते. गिरनार पर्वतावरील एका साधूच्या उपदेशानुसार त्यांनी पंजाब हे कार्यक्षेत्र निवडले. लाहोर येथे ५ मे १९०१ रोजी त्यांनी ‘गांधर्व महाविद्यालय’ ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या विद्यालयाद्वारे त्यांनी समाजात संगीताभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पद्धतशीर अभ्यासक्रम आखून संगीत विषयाच्या निरनिराळ्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या आणि त्यायोगे संगीत विषयक पदव्या विदार्थ्यांना बहाल केल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातर्फे संगीत परिषदाही भरविल्या. विष्णुबुवांनी या विद्यालयामार्फत निवडक विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शिरावर घेऊन त्यांना गायक बनविण्याचे कार्य केले. त्यांनी संगीतकलेला शिस्तबद्ध वळण लावण्याचा प्रयत्न केला व स्त्रीवर्गतही संगीताचा प्रसार केला. मुंबईच्या शाखेत स्त्रियांना शिक्षण देण्याची खास व्यवस्था केली. त्यासाठी आपल्या पत्नी रमाबाई व भाची श्रीमती अंबूताई पटवर्धन यांना संगीताचे शिक्षण देऊन तयार केले. सुसंस्कृत व कुलीन स्त्रियांना व्यासपीठावर येण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. संगीतकारांसाठी, संगीतकारांची व संगीतकारांनी चालविलेली संगीतसंस्था, असे या विद्यालयाचे व त्याच्या इतरत्र स्थापन झालेल्या शाखांचे स्वरूप होते. सभागृहांतून संगीताचे जलसे भरविण्यासही त्यांनी चालना दिली. या जलशांचे वक्तशीरपणा हेही एक लक्षणीय वैशिष्ट्य होते. १९०८ साली ते मुंबईस आले व मुंबईत त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हे विद्यालय खूप भरभराटीस आले. सँडहर्स्ट रोडवर १९१४ साली या विद्यालयाने स्वतः च्या मालकीची इमारत बांधली. विष्णुबुवांनी आपल्या हयातीत शंभर-दीडशो विद्यार्थ्यांचे पालनपोषण करून त्यांना संगीतविद्या दिली. १९५२ सालापासून ते तुलसीदासाच्या रामायणावर प्रवचने कस लागले व त्या द्वारे त्यांनी संगीताचा समाजात प्रसार केला. संगीताची प्राचीन मौलिकता त्यांनी जतन केली. त्यांच्या संगीतविद्येच्या प्रसारला धार्मिक अधष्ठान होते. ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी जनसामान्यांत अत्यंत लोकप्रिय केले. ते जसे रामभक्त होते, ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत प्रत्येक समेत म्हण्याची प्रथा त्यांतीच रूढ केली. आपले विद्यार्थी घेऊन प्रचारासाठी ते देशभर अनेक वेळा फिरले. अशा तऱ्‍हेने संगीताचा प्रसार त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्‍यांतून केला. स्वतःची एक वेगळी अशी संगीतलेखनपद्धती यांनी निर्माण केली व या पद्धतीने सु. साठ पुस्तके लिहून प्रसिद्ध केली. त्यांत संगीत बालप्रकाश, राग प्रवेश, संगीत बालबोध, स्वल्पालाप गायन, टप्पा गायन, होरी, मृदंग – तबला पाठ्यपुस्तक, रामनामावली, रामगुणगान ( मराठी ) बंगाली गायन, कर्नाटकी संगीत, बालोदय संगीत, व्यायाम के साथ संगीत, महिला संगीत, राष्ट्र्रीय संगीत, भारतीय संगीत लेखन पद्धति , इ. हिंदी-मराठी पुस्तकांचा अंतर्भाव होतो.

पं. विष्णुबुवांचे संगीतक्षेत्रातील कार्य संगतोद्धाराचे होते. संगीतक्षेत्रात नेतृत्व करून समाजात या कलेला प्रतिष्ठा देण्याचे व त्याविषयी अभिरुची निर्माण करण्याचे, तसेव संगीतकलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे, तसेच संगीतकलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे कार्य त्यांनी केले. मिरज येथे त्यांचे निधन झाले. तेयांचा जन्मशताब्दी महोत्सव १८ ऑगस्ट १९७१ ते डिसेंबर १९७३ या कालावधीत सर्व देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यांचे सुपुत्र पंडित दत्तात्रय विष्णु पलुस्कर (१९२१–१९५५ ) हेही अत्यंत नावाजलेले गायक होते. पंडित विष्णु दिगंबरांच्या संगीतप्रसाराची व गायकीची परंपरा जतन करण्याचे आणि जोपासण्याचे कार्य त्यांच्या अनेक शिष्यांनी त्यांच्या हयातीनंतरही निष्ठेने चालू ठेवले. या त्यांच्या प्रचंड शिष्यवर्गात पं. श्रीकृष्ण हरी हिर्लेकर, पं.वामनराव पाध्ये, पं विनायकराव पटवर्धन, पं शंकरराव व्यास, पं. नारायणराव व्यास, पं. ओंकारनाथ ठाकूर, प्रा, बा.र. देवधर, सुंदरम् अय्यर, श्रीमती जानकी रघुनाथ ऊर्फ अंबूताई पटवर्धन, पं. रघुनाथराव पटवर्धन, पं नारायणराव खरे, पं.वि,अ. कशाळकर, पं. शंकरराव पाठक, पं, वामनराव ठाकर, पं शंकरराव बोडस व पं. विष्णुदास शिराली या संगीतक्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींचा अंतर्भाव होतो.

सदर्भ : प्रा. बा. र. देवधर , पं वि. रा. आठवले

Photos 24/06/2016

https://www.facebook.com/sweetynik16/posts/1036699069733295:0

How To Transpose Chords

It's useful to know how to transpose chords by hand. Here are some resources to get you started.

Instructions

Determine the number of half steps between the original key and the desired key. For instance, if you were transposing from C to E, the difference would be 4 half steps.
If the new key is higher than the old key, add the difference between the two keys to every chord in your song. If you were transposing from C to E, a G chord would become a B chord.
If the new key is lower than the old key, subtract the difference between the two keys from every chord in your song. If you were transposing from E to C, a B chord would become a G chord.

Alternatively, you may use the chord transposition chart. Each row represents a key and its scale. For instance, the first row contains the notes for the key of C. First locate the rows for your song's original key and desired key. For each chord in your song, find the chord in the row corresponding with the original key, and note what column it is in. Then find the chord in that same column in the row corresponding with the new key. Replace the original chord with that chord.
Let's say you want to transpose a song from C to G, and your song contains an F chord. F is in column 4 of the C row. Trace down to the G row, and you'd find that the C chord is in column 4. You would then replace all F chords with C chords.

Mobile uploads 24/08/2015
Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Modi Chambers, Pt. Paluskar Chowk, Opera House
Mumbai
400004