R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh

R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh, High School, Gokhale Society Lane, Mumbai.

Majhi Guru Dakshina is a community born from an initiative by Exstudents of R.M.Bhatt High School & Jr College, Parel (Mumbai)
We connect learning with giving back, nurturing knowledge, values, and humanity.
“देणाऱ्यानें देत जावें; घेणाऱ्यानें घेत जावें.”

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 31/05/2026

नमस्कार,
आपल्या शाळेत "Cadet to Commander" या विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्तींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
गुरुदक्षिणा संघाने आयोजित केलेल्या NDA Visit मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात NCC Cadets तसेच विद्यार्थ्यांना खालील मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले:
🔹 Nand Kishore Bhatt
CPP, CFE – Head Hotline & Investigation, Nayara Energy
विषय: Career Guidance and Governance
🔹 Akshat Ojha
CEO, Procon Media
विषय: Fitness and Martial Arts
🔹 Aruna Jain
PoSH Trainer
विषय: Women Empowerment and Courage
🔹 Roycin Miranda
M-SeET, UGC NET (PhD), CTET, MAHATET, M.A., B.Ed.
विषय: Career in Civil Services
कार्यक्रमातील प्रमाणपत्रांचे वितरण Godfrey Lobo यांच्या हस्ते करण्यात आले.Director, World Environmental Council या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचे कौतुक केले.
कॉर्पोरेट क्षेत्रातील या मान्यवरांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, करिअर नियोजनासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मोलाचे ठरेल.
गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. तसेच आपल्या शाळेच्या संत मॅडम, प्राचार्य महाले सर आणि डिसले सर यांचेही विशेष सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार.
धन्यवाद!
गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ 🙏🏻📚🇮🇳
====================================
Greetings,

A special program titled "Cadet to Commander" was successfully organized at our school by the Gurudakshina Alumni Association. Distinguished professionals from the corporate world were invited to interact with and inspire the students.
Students who had participated in the NDA Visit organized by the Gurudakshina Alumni Association were honored with certificates in recognition of their participation and achievements.
During the program, NCC Cadets and other students received valuable guidance from the following eminent speakers on various topics:
🔹 Nand Kishore Bhatt
CPP, CFE – Head Hotline & Investigation, Nayara Energy
Topic: Career Guidance and Governance
🔹 Akshat Ojha
CEO, Procon Media
Topic: Fitness and Martial Arts
🔹 Aruna Jain
PoSH Trainer
Topic: Women Empowerment and Courage
🔹 Roycin Miranda
M-SeET, UGC NET (PhD), CTET, MAHATET, M.A., B.Ed.
Topic: Career in Civil Services
The certificates were presented by Godfrey Lobo. In his capacity as Director, World Environmental Council, he congratulated and encouraged the students while distributing the certificates.
The guidance provided by these distinguished professionals from the corporate sector will undoubtedly contribute to the students’ personality development, career planning, and future success.
On behalf of the Gurudakshina Alumni Association, we express our heartfelt gratitude to all the esteemed guests who graced the occasion. We also sincerely thank Sant Madam, Principal Mahale Sir, and Disale Sir for their invaluable support and guidance in making this program a success.
Thank You!
Gurudakshina Maji Vidhayarthi Sangh R. M. Bhat High School🙏🏻📚🇮🇳


















27/05/2026

प्रिय मित्रमैत्रिणींनो,

आर. एम. भट्ट हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपला “गुरुदक्षिणा संघ” सामाजिक कार्याची यशस्वी १० वर्षे पूर्ण करत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

या दहा वर्षांत आपण अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेने, समर्पणाने आणि प्रेमाने पूर्ण केले.
आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी “तेजोमय आरोग्यम” या उपक्रमाअंतर्गत करत आहोत.

आपल्या पहिला प्रकल्प आहे "रोटी मेकर" यंत्र.
यासाठी आवश्यक निधी आपण लायन्स क्लब व काही माजी विद्यार्थी यांच्या मदतीने आधीच उभारला असून, वाकी आणि कोसबाड येथील आश्रमशाळांना प्रत्येकी एक रोटी मेकर मशीन भेट देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा पुढील ५ वर्षांत २००० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असून, त्यांना पौष्टिक अन्न मिळण्यास मदत होईल.
आपला दुसरा प्रकल्प अत्यंत महत्त्वाच्या आहे. कोसबाड आणि तलासरी येथील आश्रमशाळांच्या अधीक्षकांनी तेथील ६ ते १६ वयोगटातील मुलींसाठी काही विशिष्ठ कपड्यांची आवश्यकता व्यक्त केली आहे.
योग्य कपड्यांच्या अभावामुळे अनेक मुलींना स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आपण या दोन आश्रमशाळांमधील आपल्या ६५० लहान बहिणींसाठी या आवश्यक कपड्यांची व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे. प्रति विद्यार्थिनी अंदाजे खर्च रु. २५० इतका आहे. आपण आपल्या इच्छेनुसार एक किंवा अधिक विद्यार्थिनींसाठी योगदान देऊ शकता.

आपली छोटीशी मदत या निरागस मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवेल आणि त्यांना स्वच्छ, निरोगी व सन्मानपूर्ण जीवन जगण्यास मदत करेल.

चला, सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा मानवतेचा हात पुढे करूया.

Special Note: please mention "Project Tanisi" in remarks while contributing.

Account Name - GURUDAKSHINA MAJI VIDYARTHI SANGH R M BHATT HIGH SCHOOL PAREL.
Bank Name - Bank Of Baroda
Branch - Lalbaug Branch
Account No - 33380100025212
IFSC Code - BARB0LALBAU ( fifth character is zero)

धन्यवाद!

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ आर. एम. भट्ट हायस्कूल

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 22/03/2026

🇮🇳 एनडीए क्षेत्रभेट — यशस्वी संपन्न!
दिनांक: रविवार, २२ मार्च २०२६
आयोजन: माजी विद्यार्थी गुरुदक्षिणा संघ आणि आर. एम. भट्ट शाळा

आज दिनांक २२ मार्च २०२६ रोजी माजी विद्यार्थी गुरुदक्षिणा संघ व आर. एम. भट्ट शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एनडीए क्षेत्रभेट अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाली. शाळेतील ४१ एनसीसी कॅडेट विद्यार्थी-विद्यार्थिनी, दोन शिक्षक व एक माजी विद्यार्थी असे एकूण ४४ जण या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार ठरले.
या क्षेत्रभेटीचे खरे शिल्पकार म्हणजे माजी विद्यार्थी Yogesh Kokatay, Swapnil Pingulkar , Samir Phatak होत. सुरुवातीच्या ईमेल पाठवण्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत — परवानग्या मिळवणे, कागदपत्रांचा पाठपुरावा करणे, नियोजन आखणे — प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या निःस्वार्थ व समर्पित प्रयत्नांमुळेच आज ही भेट प्रत्यक्षात साकार होऊ शकली. योगेश कोकाटे हे योगदान खऱ्या अर्थाने अतुलनीय व प्रेरणादायी आहे. Sushama Bandchhode मॅडम डिसले सर हे दोघांनी सुद्धा गुरुदक्षिणा संघाला सर्व कामात मदत करून स्वतः सर्व मुलाबरोबर NDA ला visit केली, त्यांच्ये आणी प्रिंसिपल महाले सर ह्याच्ये विशेष आभार.
शाळेचे मा. प्राचार्य, उप-प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. "एनडीए इफेक्ट" या संकल्पनेतून प्रेरित होऊन, माजी विद्यार्थ्यांनी आताच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात देशाचे कर्तव्यदक्ष अधिकारी घडावेत या उदात्त ध्येयाने हे आयोजन केले होते.
एनडीएच्या भव्य परिसरात, तेथील शिस्त, देशभक्ती व सैनिकी जीवनशैली अनुभवल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन चेतना व जिद्द निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी "आम्हीही एनडीएत जाऊ आणि देशाची सेवा करू" असा दृढ निर्धार व्यक्त केला — हेच या क्षेत्रभेटीचे खरे यश आहे!
"आजचे स्वप्न, उद्याची वास्तवता — देशासाठी झिजण्याची तयारी हीच खरी गुरुदक्षिणा!" 🎖️

गुरुदक्षिणा माजी विध्यार्थी संघ

19/03/2026

🎉पालवी चैत्राची, अथांग स्नेहाची, जपणूक परंपरेची, ऊंच ऊंच जाऊ दे गुढी आदर्शाची, संपन्नतेची, उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची…🎉

🤗!! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!😍

05/02/2026

प्रिय मित्र मैत्रिणींनो,

दिनांक ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली जाणारी आर. एम. भट जत्रा काही अपरिहार्य कारणामुळे स्थगित करण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी.

-- गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 15/01/2026

नमस्कार,

दुःखद बातमी

अनिता अजित सावंत.
गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या टीमची लाडकी वहिनी. खरं तर ती आणि अजित दादा दोघेही आपल्या आर. एम. हायस्कूलचेच विद्यार्थी. अनिता वहिनी पूर्वाश्रमीची नीता मराठे. दोघांची प्रेमकहाणी शाळेतच सुरू झाली आणि पुढे विवाह बंधनात अडकून ते परस्परांचे जिवलग सहचर झाले. नीताची अनिता झाली. गुरुदक्षिणा संघाच्या स्थापनेत अजित दादाचा सिंहाचा वाटा. तो सगळ्या टीमचा दादा म्हणून अनिता वहिनी!
अतिशय मनमिळाऊ, हसरी आणि सतत कोणाच्या ना कोणाच्या उपयोगी पडणारी अनिता वहिनी म्हणजे गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाची ऊर्जा होती. कोणत्याही कामाची जबाबदारी घेणारी, छोट्यातील छोटे काम करण्यातही तिला कधी कमीपणा वाटला नाही. कधीही कुठल्या मीटिंगला, कार्यक्रमाला ती कधी रिकाम्या हाताने आलीच नाही, काही न काही खाऊ स्वतःच्या हाताने बनवून समोरच्याला आनंदी बघणे हे तिचे खास वैशिष्ट्य.
मार्च २०१९ मध्ये अजित दादाच्या निधनाचा धक्का पचवत ती उभी राहिली. त्याच्या आजारपणात तिने जी शुश्रुषा केली त्याला तोड नाही. घरदार, कुटुंब यांची जबाबदारी तिने कर्तव्यभावनेने पार पाडली आणि तीच भावना तिने सामाजिक कार्यातही जपली. अनेक शैक्षणिक / सामाजिक संस्थांशी असलेली बांधिलकी तिने मनापासून जपली. कालच्या १४ जानेवारीला तिचे अकस्मात आपल्या सगळ्यांना सोडून जाणे हा मोठा धक्काच आहे. एक मोठा आधार तुटल्यासारखे वाटत आहे. तिच्या स्मृती आमच्या मनात कायम राहतील. तिला आदरांजली 🙏

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

17/12/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Prashant Talekar, Ujwala Shinde, Samir Phatak, Vaibhv Mokal, Vinod Bhosale, DrSneha Hande, Shubhangi Tryambake, Aadesh Jadhav, Samir Bhatte, Yugendra Mayekar, Santosh Parab, G Bhalchandra, Sudhir Tayde, Nitesh Gholap, Kasturi Kirve, Nilesh Kadam, Manali Patil, Durgesh Mankar, Megha Patkar, गणेश गुरूनाथ मुडये, Priti Rawool Jadhav, Sukanya Jadhav, Sanket Gawade

Drop a comment to welcome them to our community,

15/12/2025

Ex Student : Adv. Sampada Purekar

15/12/2025

माजी विध्यार्थी प्रवीण कालेकर

15/12/2025

माजी विध्यार्थिनी सुवर्णा राणे 1980 बॅच

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Gokhale Society Lane
Mumbai
400012