SSM Shivaji Vidyalaya & MCM Girls Highschool.

SSM Shivaji Vidyalaya & MCM Girls Highschool.

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SSM Shivaji Vidyalaya & MCM Girls Highschool., High School, abhudaya nagar, bhagatsing park kalacohweki mum/33, Mumbai.

23/03/2020

सातघरे बाई कन्याशाला bldg no 17 यांचे दुखद निधन 🙏🙏💐💐

27/11/2019

Seminar on
STUDY ABROAD PROCESS

🇺🇸 🇩🇪 🇮🇪🇬🇧 🇳🇱 🇵🇱 🇸🇬 🇦🇺
# Plan your higher education in USA 🇺🇸 UK🇬🇧 GERMANY 🇩🇪 AUSTRALIA 🇦🇺 NEW ZEALAND AND Russia 🇷🇺
# know the complete study abroad process
# Study abroad with financial aid and scholarships
# know ‘do’s and Don’t s’ in Study Abroad process
# Special guidance for students willing to persue MBBS abroad



Date :
Venue:

For registration
Call :
Step Up +91 9324025490/ 9324448627

🇺🇸 🇩🇪 🇮🇪🇬🇧 🇳🇱 🇵🇱 🇸🇬 🇦🇺

27/11/2019
25/07/2019

*हरवले सापडले....*

परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ... फिरता फिरता एका कोपर्‍यात अचानक लक्षं गेलं.... एक जुनं कपाट नजरेस पडलं...... वर लिहिलं होतं ..

*“हरवले सापडले विभाग”*

..... तीच पूर्वीची
जागा .... कपाटही तेच असावं बहुधा .... पण आज ते खूपच *खिन्न* वाटत होतं .... *सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे* असेल ... पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची *उद्विग्नता* नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ... आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , Branded पेनं , Key chains, महागड्या कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ....... शाळेतल्या बाईंना ....साॅरी मॅडमना.. विचारलं तर त्या म्हणाल्या, *आज काल मुलं आपली वस्तू हरवली की बहुदा विचारतच नाहीत.*
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात.

*कदाचित घरी गेल्यावर काही वेळातच त्यांच्या हातात नवीन वस्तु येऊन पडते.*

याला कारणं अनेक असतील.

उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना सहज मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी,

कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं .... ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही.......पण ....

पूर्वी आमचा साधा *Eraser* (ज्याला त्या काळी आम्ही *“खोड रबर “* म्हणायचो) जरी शाळेत विसरला, तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात *‘याची देही याची डोळा’* बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल, मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर *पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड ....* त्यासाठी वेळप्रसंगी *वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार ....* आणि शेवटी ती *हरवलेली* वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे *समाधान ....* अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये.
आम्ही एका वेळेस *१-२* पेन्सिल्स घ्यायचो, आता अख्खा *Box* घेतो ....

*आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदाने वापरायचो* आता वेगवेगळ्या *Designer Series* च्या वह्या घेतो ......

*जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर* म्हणून घालायचो आता *Plastic Coated* वगैरे वगैरे ... एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये....

*अप्रूप ...........* खरंच... सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता ...... पण या घटनेनी मला मात्र *Flashback* मध्ये नेलं...

खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप .....
तो *रंगीत खडूंचा* असेल तर जरा जास्तंच अप्रूप......
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी लपवुन ठेवलेला एक खडू किंवा तुकडा सगळ्या वर्गाला *World Cup* जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप.....

धडपडल्यावर *गुलाबी-लाल* रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप.....

Lab मधल्या काकांना मस्का मारून *Litmus Paper* मिळवण्याचं अप्रूप....

हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून *वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे* काढण्याचं अप्रूप......

स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव *ग्लुकॉन डी* दिलं कि त्याचं अप्रूप....

*Gathering च्या practice साठी एखाद्याचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप....* आणि बरंच काही...

आजच्या जमान्यात *“फालतू”* वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप *ENJOY* केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या *“हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी....माझं बालपण सापडलं” ...*

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं ... मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो ...

बाहेर शाळेजवळच राहणारा एक मित्र भेटला .... घाईतचं होता ....त्याचा मुलगाही त्यासोबत होता....मुलगा काल शाळेत *Color Box* हरवून आला होता....
*त्यामुळे तो नवीन *Color Box घ्यायला चालला होता .....*

...हरवलेलं बालपणं😓

SENATE 24/06/2017

प्रिय 'पदवीधर' मित्र-मैत्रिणींनो,

मुंबई विद्यापीठाची 'अधिसभा सदस्य' (सिनेट मेंबर) निवडणूक (2017) लवकरच होणार आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विद्यापीठाचा संपूर्ण प्रशासकीय-शैक्षणिक-आर्थिक कारभार, शैक्षणिक धोरण, शैक्षणिक शुल्क, विद्यार्थ्यांचे हक्क आदी सर्वच महत्वाच्या विषयांवर विद्यापीठाच्या अधिसभेत महत्वाचे निर्णय घेतले जात असतात. देशपातळीवर लोकसभेचं किंवा राज्य पातळीवर विधानसभेचं जे महत्व आहे, तेच विद्यापीठ पातळीवर अधिसभेचं (सिनेट) महत्व आहे.

तुम्ही स्वत: पदवीधर विद्यार्थी असा वा नोकरदार वा व्यावसायिक, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या सर्वच्या सर्व महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचं किंवा न्याय मागण्याचं सर्वोच्च स्थान म्हणजे विद्यापीठाची अधिसभा.

तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी असा, वा तुमचा मुलगा किंवा मुलगी विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेत असू दे, अधिसभा सदस्य (सिनेट सदस्य) हेच एक माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा आवाज विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत खणखणीतपणे पोहोचवू शकता.

म्हणूनच तुम्ही जर 'पदवीधर' असाल तर या निवडणुकीत तुम्ही सहभागी व्हायलाच हवं! मतदान करायलाच हवं!

तुम्ही फक्त एवढंच करायचं की, पदवीधर मतदार म्हणून स्वत:ची नोंदणी करुन घ्यायची. यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतील-

1. पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
2. एक फोटो
3. निवासाचा पुरावा (आधारकार्ड किंवा मतदार ओळख पत्र किंवा वाहन परवाना किंवा पासपोर्ट)

या कागदपत्रांची छायांकित प्रत सेल्फ अटेस्ट करुन फक्त आमच्याशी संपर्क साधा.

किंवा आॅफलाईन अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही www.musenate.in या संस्थळाला भेट द्या.

कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा की, 'पदवीधर मतदार' म्हणून नोंदणी करण्याचा 30 जून हा शेवटचा दिवस आहे. म्हणून आता आणखी उशीर नको. आजच 'पदवीधर मतदार' म्हणून नोंदणी करुन घ्या.
तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला आम्ही आहोतच.

*धन्यवाद.*
आपला नम्र डॉ. निनाद साठे 9820274619 संग्राम करांडे 8097375115 अशोक थोरात 8850647793 शानिदास शिरतोडे 7977934930

Candidate
Mr.Rushikesh Pol.

SENATE महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम क्र्मंक २९/२०१५, शासनाच्या असाधरण राजपत्र भाग क्र. ८ मध्ये दिनांक १७.०८.२०१५ रोजी प्रसूत केला असून,  सादर अधिनिमान्वे सर्व अकृषी विद्यापिठ्तील विविध प्राधिकरणे व इ...

Photos 19/01/2017

कोण कोण येणार २६ जानेवारी ला शाळेत ?

Photos 13/10/2016

RIP Tulaskar Madam

12/10/2016

कन्याशाळेच्या क्रिडा शिक्षिका श्रीमती तुळसकर मॅडम यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले त्याना भावपूर्ण श्रद्धांजली💐

Mobile uploads 16/03/2015
Photos from SSM Shivaji Vidyalaya & MCM Girls Highschool.'s post 15/03/2015
Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Abhudaya Nagar, Bhagatsing Park Kalacohweki Mum/33
Mumbai
400033