जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई.

  • Home
  • India
  • Mumbai
  • जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई.

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई. मोडी लिपी हे आपले ऐतिहासिक आणी सांस्क? We intend to fill this vicious void and help bring our glorious past to people.

Modi Lipi or Script is not only our Historical and Cultural heritage, it is also the means to preserve and learn about our history and culture. Today there are millions of documents which are yet to see the light of day, all because there are no Modi Script experts. Our syllabus, developed after 15 years of scholarly study of the Modi Script, will turn you into a first rate modi expert.
मोडी लिपी हे आपले ऐतिहासिक आणी सांस्कृतिक धरोहर जाणून घेण्याचे आणी जपण्याचे साधन आहे.
आज लाखो कागद-पत्रे मोडी वाचकांची वाट पाहत आहेत, त्यांतील अज्ञात इतिहास बाहेर येण्यासाठी तळमळत आहे. त्यांना गरज आहे ती मोडी तज्ञांची.
ही उणीव भरून काढण्याचा विडा उचलला आहे जागतिक मोडी लिपी प्रसार समितीने.
१५ वर्ष मोडी लिपीचा सखोल अभ्यास करून तयार केलेला आमचा अभ्यासक्रम तुम्हाला प्रथम श्रेणीतील तज्ञ बनवण्यास मोलाचे ठरेल.
|| दृद निश्चयेन साधते ||

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्य...
02/05/2024

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या आणि मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर ह्या पाच शहरांमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपन्न झालेल्या सुंदर मोडी हस्ताक्षर आणि शीघ्र मोडी लिप्यंतर ह्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये इतिहास व सुलेखन प्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते.

काल, महाराष्ट्र दिनी ही स्पर्धा सर्वच केंद्रांवर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मुंबई केंद्रात २२, पुणे येथे १५, अहमदनगर आणि नाशिक येथे अनुक्रमे ७ व ८, तर कोल्हापूर केंद्रामध्ये १४ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व स्पर्धकांना केंद्रप्रमुख आणि केंद्र सहायकांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.

मराठा इतिहासाचा अभ्यास करताना मोडी लिपी शिकण्याचे अनन्यसाधारण महत्त्व जाणवतेच पण प्रत्यक्ष मोडी लिपीचा अभ्यास करताना आपण मोडी वाचनाचा व लेखनाचा जितका सराव करतो तितकी सहजता आपल्या लिप्यंतरात येऊ लागते आणि हस्ताक्षरमध्येही चांगले बदल जाणवतात. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे एक ऐतिहासिक पत्र लिप्यंतर करण्याचा अनुभव मिळतो, पत्रलेखनातील बारकावेही समजतात, अश्या प्रतिक्रिया सहभागी स्पर्धकांनी नोंदवल्या. ह्या वर्षीचा उन्हाळा आव्हानात्मक असूनही स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले ह्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.

अधिकाधिक इतिहास अभ्यासकांना वेळच्या वेळी मोडी लिपीचे महत्त्व लक्षात यावे ह्याकरता गेली अनेक वर्षे जागतिक मोडी लिपी प्रसारक समिती प्रयत्नशील आहे. वास्तविक मोडी लिपी ही मराठी भाषेची लिपी पण आजही अनेक मराठी भाषिकांचा मोडी लिपी ही एक भाषा आहे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही भाषा काळात वापरली जात असे असा समज आहे. हे गैरसमज दूर व्हावेत आणि मोडी लिपीविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे मोडी लिपीच्या ह्या उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.

मुंबई केंद्रावर मोडी तज्ज्ञ श्री. राजेश खिलारी ह्यांनी केंद्रप्रमुख म्हणून तर केंद्र सहाय्यक म्हणून श्रीमती नेहा खवळे, श्रीमती जयश्री पोरे आणि श्रीमती कांचन कराई ह्यांनी काम पाहिले. पुणे केंद्रावर मोडी तज्ज्ञ श्री. परेश जोशी हे केंद्रप्रमुख होते तर श्री. हेमंत गोडबोले आणि श्रीमती प्रियांका जोशी ह्यांनी केंद्रसहाय्यक होते. अहमदनगर केंद्रासाठी मोडी तज्ज्ञ श्री संतोष यादव यांनी केंद्रप्रमुख म्हणून व श्री. आनंद कल्याण, श्री. गणेश रणसिंग, श्री. संतोष दांगडे, श्री. नारायण आव्हाड, श्री. रोहित धुमाळ व श्री. बापू मोढवे ह्यांनी केंद्र सहाय्यक काम पाहिले. नाशिक केंद्रासाठी मोडी तज्ज्ञ श्री. अरविंद साने ह्यांनी केंद्रप्रमुख म्हणून धुरा सांभाळली. कोल्हापूर केंद्रासाठी मोडी तज्ज्ञ श्री. नवीनकुमार माळी ह्या केंद्रप्रमुखांना प्रा. अरूण शिंदे ह्यांचे सहाय्य लाभले.

स्पर्धकांना सुयोग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (मुंबई केंद्र), कान्हेरे कॉमर्स क्लासेस (पुणे केंद्र), अहमदनगर ऐतिहासिक वास्तु संग्रहालय (अहमदनगर केंद्र), चिंतमाणीज्‌ मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग (नाशिक केंद्र) आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (कोल्हापूर केंद्र) ह्यांचे मन:पूर्वक आभार. तसेच, सर्व केंद्रप्रमुख तथा केंद्रसहायकांचे त्यांच्या तत्पर योगदानाबद्दल मन:पूर्वक आभार. त्यांच्या सहभागामुळे हा संकल्प प्रतिवर्षी यशस्वीरित्या सिद्धीस जातो.

स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरणासंबंधीचे विवरण लवकरच कळवले जाईल. मोडी लिपीच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला आता आठ वर्षे झाली. हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे. अधिकाधिक मराठी भाषिकांनी आपली प्राचीन लिपी जाणून घेण्याकरता, आपला इतिहास समजून घेण्याकरता मोडी लिपी अवश्य शिकावी आणि प्रतिवर्षी होणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मराठी भाषा आणि मोडी लिपीशी असलेले आपले संबंध अधिकाधिक दृढ करावेत.

- जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई.
Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Rajesh Khilari, Paresh Joshi, Santosh Yadav, Arvind Sane, Navinkumar Mali, Jayshree Pore,
Neha Khavale, Kanchan Karai

आठवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा २०२४स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या ...
27/04/2024

आठवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा २०२४

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या ५ शहरांमध्ये – मुंवई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे एकाच दिवशी आणि एकाच वेळी ‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ आणि ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ भरविणार आहे.

मोडी लिपी प्रचारार्थ भव्य स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. ही स्पर्धा १ मे २०२४ या महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशी घेतली जाईल. २९ एप्रिल पर्यंत आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. सर्वच केन्द्रांवरील दोन्ही स्पर्धा गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेची ठिकाणे:
मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (श्री.राजेश खिलारी ९३२३०२२२२३/०२२-२४४६५८७७);
पुणे (श्री.परेश जोशी ९८८११०४३७९);
अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय (श्री. संतोष यादव ९३७२१५५४५५)
कोल्हापूर, नाईट कॉलेज (श्री. नवीनकुमार माळी ९४२००३९४९४)
नाशिक केंद्र (श्री. अरविंद साने ९८५०७४६१७२)

प्रवेशपत्र हे केंद्रावरच भरावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा नाही. दूर अंतरावर रहाणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी येऊन प्रवेशपत्र भरू शकतील. पुस्तक विक्रेत्यांनाही मोडी विषयक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यास आवाहन करत आहोत.

सूचना : स्पर्धकांनी स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोड रबर, फूट पट्टी आणि धरावयास पॅड आणावे. स्पर्धकांस कागद पुरवले जातील. काˆya शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे.अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद असेल. या करिता एक तास दिला जाईल. पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. स्पर्धा निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.

प्रवेश : एका स्पर्धेचे सहभाग शुल्क ₹१०० आहे तर दोन्ही स्पर्धा मिळून सहभाग शुल्क ₹१५० आहे.

अधिक माहिती करिता दिलेल्या संबंधीत क्रमांकावर संपर्क साधावा.

#मोडी_लिपी #मोडीलिपी #मोडीलिपीस्पर्धा

आपले नाव छ.शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीमध्ये Online तयार करण्यासाठी Link- http://enav.in आपले नाव तयार झाल्यावर, सदर...
26/11/2020

आपले नाव छ.शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीमध्ये Online तयार करण्यासाठी Link- http://enav.in आपले नाव तयार झाल्यावर, सदरची माहिती इतरांपर्यंत पोहचवून छ.शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीच्या प्रचारासाठी आपले योगदान द्यावे. ही विनंती! #मोडीनाव #मोडी #मोडीलिपी

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्य...
19/06/2018

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोडी लिपी स्पर्धेच्या पुणे केंद्राचा पारितोषिक वितरण सोहळा दि. १६ जून २०१८ रोजी प्रभू ज्ञान मंदिर, नवी पेठ पुणे येथे संपन्न झाला. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिके देण्यात करण्यात आली. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मोडी लिपी अभ्यासासाठी पुस्तके असे ह्या पारितोषिकांचे स्वरूप होते. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ज्येष्ठ लेखिका डॉ. सौ. मीना प्रभू ह्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

ह्याप्रसंगी आपले विचार प्रकट करताना डॉ. सौ. मीना प्रभू म्हणाल्या कि आजच्या पिढीलाही ह्या प्राचीन लिपीची ओढ आहे हे पाहून त्यांना आनंद झाला. "आपल्या संस्कृतीचे जनत होणे महत्त्वाचे आहे," असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरूंगात असताना आपल्या बंधूंना लिहिलेल्या मोडी लिपीतील पत्राचा अर्थबोध न झाल्याने ब्रिटिशांनी सावरकरांची शिक्षा अधिक कठोर केली होती, असा किस्सा त्यांना आपल्या अंदमान यात्रेमध्ये कळला तो त्यांनी उपस्थितांना सांगितला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश खिलारी म्हणाले कि "मोडी लिपी आता सर्वांना माहित झाली आहे परंतू ती प्रत्येकाला अवगत नाही. अजूनही तिचा प्रसार मात्र म्हणावा तितका झालेला नाही. यासाठी प्रतिदिन मोडी लिपीचा लेखन वाचन असा सराव करणे आवश्यक तर आहेच पण ज्यांना मोडी लिपी अवगत नाही, त्यांनाही मोडीची गोडी लागावी म्हणून त्यांना मोडी व देवनागरी लिपीतून पत्रे लिहिणे किंवा मोडी स्पर्धा यांसारखे उपक्रम वरचेवर राबवले गेले पाहिजेत तरच प्रोत्साहनामुळे अधीकाधीक चांगले मोडी वाचक तयार होऊ शकतील. संस्थेच्या मुंबई व पुणे केंद्राच्या आयोजक सह्काऱ्यांनीही आपली मते व्यक्त केली.

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी पुन्हा एकदा आपल्या खणखणीत वाणीने उपस्थितांना स्तिमित केले. जागतिक मोडी लिपी प्रसार समिती मोडी वाचक तयार करत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसोत्गार आणि शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले कि "अमूक इतिहास खरा कि खोटा ह्याची चर्चा तेव्हाच करता येते जेव्हा तो संदर्भ पडताळून पाहण्यासाठी साधनं उपलब्ध असतात. दुर्दैवाने आपल्याकडे अनेकदा साधनं पुरातन असल्यामुळे त्यांच्यकडे दुर्लक्ष केलं जातं. साधनांचं महत्त्व माहित नसल्यामुळे अज्ञानातून ती नष्ट केली जातात. पण जे काही उपलब्ध आहे, ते देखील कमी नाही. आजदेखील मोडी लिपीमधील कित्येक कागदपत्रे देशात व परदेशात आहेत, जी अद्याप वाचली गेलेली नाहीत. ती बारकाईने व तारतम्याने वाचून योग्य इतिहास सर्वांसमोर येणे आवश्यक आहे."

कार्यक्रमाच्या अंती बाबासाहेबांचे सहाय्यक व इतिहास अभ्यासक श्री. पाटील यांनी प्रतावराव गुजर यांच्या आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत बहालोलखानाच्या सैन्याविरूद्ध दिलेल्या झुंजीवर आधारित ’सात दौडती’ ही कविता सादर केली.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने झाली.

31/05/2018

जागतिक मोडी लिपीच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर ह्या पाच ठिकाणी आयोजित केलेल्या चतुर्थ मोडी लिपी सर्धा २०१८ चा निकाल जाहिर करत आहोत.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील मोडी लिपी अध्ययनासाठी शुभेच्छा! 👏 💐 👍

:::मुंबई केंद्र:::

**सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा **

वयोगट: ८ ते १५ वर्षे
प्रथम क्रमांक - जिष्णू बांदोडकर

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - सागर तोडणकर
द्वितीय क्रमांक - मोहन सराफ
तृतीय क्रमांक - नितीनराज चव्हाण
उत्तेजनार्थ: प्रसन्न खानविलकर

**शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा **

वयोगट: ८ ते १५ वर्षे
प्रथम क्रमांक - जिष्णू बांदोडकर

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - कीर्ती जाधव
द्वितीय क्रमांक - गायत्री कुलकर्णी
तृतीय क्रमांक - तृप्ती रावराणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

:::पुणे केंद्र:::

**सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - सपना क्षीरसागर
द्वितीय क्रमांक - महेश्वर चव्हाण
तृतीय क्रमांक - दीपक वाटेकर

**शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - सपना क्षीरसागर
द्वितीय क्रमांक - अनंत काकडे
तृतीय क्रमांक - महेश्वर चव्हाण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

:::नाशिक केंद्र:::

**सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - सायली सप्रे
द्वितीय क्रमांक - मधुसुदन देवस्थळी
तृतीय क्रमांक - सोहम देशपांडे

**शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - सायली सप्रे
द्वितीय क्रमांक - मधुसुदन देवस्थळी
तृतीय क्रमांक - सोहम देशपांडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

:::अहमदनगर केंद्र:::

**सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा **

वयोगट: ८ ते १५ वर्षे
प्रथम क्रमांक - मनस्वी सोनावणे
द्वितीय क्रमांक - आकांक्षा कांडगे
तृतीय क्रमांक - यशराज भगत

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - विलास बेंद्रे
द्वितीय क्रमांक - मधुकर दहातोंडे
तृतीय क्रमांक - बाबासाहेब शिंदे

**शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा **

वयोगट: ८ ते १५ वर्षे
प्रथम क्रमांक - मनस्वी सोनावणे
द्वितीय क्रमांक - आकांक्षा कांडगे
तृतीय क्रमांक - यशराज भगत

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - गोकुळदास भोर
द्वितीय क्रमांक - विलास बेंद्रे
तृतीय क्रमांक - संदीप बेंद्रे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

:::कोल्हापूर केंद्र:::

**सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - राकेश तुपारे
द्वितीय क्रमांक - स्नेहा कानिटकर
द्वितीय क्रमांक - विनायक भोसले
तृतीय क्रमांक - अर्जुन पाटील
तृतीय क्रमांक - महेबूब दरवाजकर

**शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा **

वयोगट: १६ वर्षे व त्यापुढील
प्रथम क्रमांक - संगीता साळुंखे
द्वितीय क्रमांक - अर्जुन पाटील
तृतीय क्रमांक - राकेश तुपारे
उत्तेजनार्थ - प्रा. मारूती साठे
उत्तेजनार्थ - महेबूब दरवाजकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुंबई केंद्र
04/05/2018

मुंबई केंद्र

दै.लोकमत - अहमदनगर आवृत्ती
03/05/2018

दै.लोकमत - अहमदनगर आवृत्ती

02/05/2018

अहमदनगर

Address

235/9194, Meghdoot, Kannamwar Nagar, Vikhroli East
Mumbai
400083

Telephone

+919323022223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई.:

Shortcuts

Share

Category