Coaching Classes Sanchalak Welfare Associations -CCPA

Coaching Classes Sanchalak Welfare Associations -CCPA

Share

सर्वसामान्य क्लासेस संचालकांचा एकमेव आधार असलेली संघटना. कोचिंग क्लासेस संचालक संघटना, (रजि.) महाराष्ट्र राज्य

23/01/2026

ठाण्यात खळबळ! गुन्हे शाखेचा मोठा अ‍ॅक्शन — दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त
ठाणे | प्रतिनिधी
ठाणे शहरात अवैध शस्त्र विक्रीचा धंदा उघडकीस आणत ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खंडणीविरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत दोन गावठी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर २०२५ रोजी वागळे इस्टेट परिसरातील सुमरास साई पान शॉपजवळ, इंटरसिटी मॉलच्या बाजूला सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची अंदाजे किंमत २ लाख ९८ हजार रुपये इतकी असून, आरोपीविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई ठाणे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. शहरात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा कडक वचक कायम असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


Thane Police Commissionerate

22/01/2026

ठाणे महानगरपालिका- महापौर
sc राखीव महापौर बौद्ध समाजाचा असावा ,महापलिकेत घुमणार
जय भीम चा आवाज ..

14/01/2026

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
*मकरसंक्रातिनिमित्त गोड गोड शुभेच्छा*
*तीळगुळ घ्या गोड गोड बोला….*

-टिम मास मिडिया (CCPA)

01/01/2026

आपल्या सर्व कोचिंग क्लासेस संचालक बंधू-भगिनींच्या सहकार्याने सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण सर्व नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत.
आतापर्यंत जसे आपण संघटनेच्या सर्व उपक्रमांत हिरीरीने सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केलेत त्याच प्रकारे यापुढील उपक्रमांना आपला सक्रिय सहभाग राहील यात तिळमात्र शंका नाही.
संघटना सदैव आपल्या संचालक बंधू-भगिनींच्या सुख-दुःखात, अडीअडचणीच्या काळात सदैव तत्पर राहील.
येणारे नाविन वर्ष आपणांस सुख समाधनाचे, भरभराटीचे जावो हीच सदिच्छा.
*कोचिंग क्लासेस संचालक संघटना (रजि.) महाराष्ट्र राज्य*
*संस्थापक अध्यक्ष - श्री. सतीश देशमुख सर*

*- टीम मास मिडिया (CCPA)*

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mumbai