A. B. Goregaokar English School

A. B. Goregaokar English School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from A. B. Goregaokar English School, School, Aarey Road, Goregaon (West), Mumbai.

01/05/2026
01/05/2026

विद्यार्थ्यांसोबत इंग्रजीतून सहज गप्पा...
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

शालेय परिपाठ...Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala
07/03/2026

शालेय परिपाठ...
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

28/02/2026

अंकुर हस्तलिखित

आपल्या शाळेत दरवर्षी इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी हस्तलिखित तयार करतात. या हस्तलिखिताचे 27 फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने प्रकाशन केले जाते. या वर्षी सुद्धा अंकुर हस्तलिखित तयार झालेले आहे.
यावर्षीच्या हस्तलिखिताचे खास वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकतेचे पुढचे पाउल ओलांडत *डिजिटल रूपात PDF स्वरूपात* यावर्षीचे हस्तलिखित तयार केले आहे. तसेच त्यात दिलेल्या QR कोड द्वारे शाळेत झालेल्या काव्यवाचन स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आपण पाहू शकतो.

प्रमुख मार्गदर्शन - श्रीमती मेघना वेरलकर
विशेष मार्गदर्शन -
श्रीमती वैशाली रोडे निगुडकर
श्रीमती आसावरी पवार
श्रीमती आरती रसाळ
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

आपल्या शाळेत बसवलेले सोलार पॅनल -  शाळेत चालू असलेल्या सोलार पॅनल च्या कामाची माहिती समजून घेताना शिक्षक व विद्यार्थी......
23/02/2026

आपल्या शाळेत बसवलेले सोलार पॅनल - शाळेत चालू असलेल्या सोलार पॅनल च्या कामाची माहिती समजून घेताना शिक्षक व विद्यार्थी...
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

खरंच मनात साठवून ठेवावा असा दिवस… 💖आपल्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचा रंगतदार आणि आन...
16/02/2026

खरंच मनात साठवून ठेवावा असा दिवस… 💖

आपल्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचा रंगतदार आणि आनंदमय कार्यक्रम पार पडला. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात उत्साह, आनंद आणि टाळ्यांचा कडकडाट घुमत होता. आपल्या विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन आत्मविश्वासाने गाणी, नृत्य आणि विविध कला सादर केल्या.

प्रत्येक सादरीकरणामागे त्यांच्या मेहनतीचे व सरावाचे सुंदर प्रतिबिंब दिसत होते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सांस्कृतिक विभागाचे नियोजन यामुळे हा सोहळा सुरेख रंगला.

आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यांतील अभिमान आणि सगळ्यांच्या मनातली समाधानाची भावना – हेच या स्नेहसंमेलनाचे खरे यश आहे.

हा सोहळा केवळ मनोरंजन नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा उजाळा देणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

आपल्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक! 🌟
आणि हा सुंदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मनापासून मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार! 🙏✨
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

नवदिशा हे Navneet Education Limited यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी तयार केलेले समृद्ध ऑनलाइन व्यासपीठ आहे.या प...
10/02/2026

नवदिशा हे Navneet Education Limited यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी तयार केलेले समृद्ध ऑनलाइन व्यासपीठ आहे.
या प्लॅटफॉर्मवर NEP-२०२० नुसार तयार केलेले विविध शैक्षणिक साहित्य मराठी व इंग्रजी भाषेत शिक्षकांसाठी उपलब्ध आहे.

आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती संखे यांचा लेख जरूर वाचा -
https://navdisha.navneet.com/article/337/रोचक-परिपाठाचा-प्रेरक-अनुभव-

इंग्रजी लेखासाठी -
https://navdisha.navneet.com/article/338/school-assembly--inspiring-initiative-

शाळेतील परिपाठ हा केवळ रोजचा उपक्रम नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा आधार असतो. योग्य नियोजन आणि उद्देशपूर्ण मांडणी केल्यास परिपाठ विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव निर्माण करू शकतो.
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

सध्या शाळेत सुरू असलेल्या कलाप्रदर्शनातली चित्रं  शाळेतल्या मुलांनी काढलेली असली तरी ती शाळकरी दिसणारी चित्रं नाहीत, कार...
29/01/2026

सध्या शाळेत सुरू असलेल्या कलाप्रदर्शनातली चित्रं शाळेतल्या मुलांनी काढलेली असली तरी ती शाळकरी दिसणारी चित्रं नाहीत, कारण मुलांबरोबर प्रत्येक चित्रासाठी टप्प्याटप्प्यानी काम झालेलं आहे.
इथे वेगवेगळ्या माध्यमांतून रंग- रेषा- आकार या चित्रघटकांबरोबर, मुलं अक्षरशः खेळतात. कधी एखाद्या घटकाचा तपशिलात निरीक्षण करून अभ्यास करतात. त्यातून यांची समज तयार होते आणि ती समज वापरून ते चित्र काढतात. ही प्रक्रिया अगदी बालवाडीपासून सुरू असते.
शाळेत कलामहोत्सव गेली अनेक वर्ष होतो आहे. दरवर्षीचं एकेक वैशिष्ट्य असतं. यावर्षी मुलांच्या कामात निसर्गला धरून केलेली चित्रं, क्रिएटिव्ह पोर्ट्रेट्स हे प्रामुख्यानी दिसतं. क्रिएटिव्ह पोर्ट्रेट्स फोटोग्राफीतूनही साकारलीयत ती भन्नाट आहेत. प्रदर्शनाच्या शेवटी निसर्गातल्या वस्तू घेऊन तोल आणि कलात्मकता यांचा मेळ घालून केलेलं मांडणीशिल्पही उभारलं आहे.
याशिवाय यावेळेचं वैशिष्ट्य असं की प्रदर्शनाची सुरुवात बालवाडीतल्या मुलांच्या चित्रापासून होते. त्यामुळे बालवाडी - प्राथमिक - माध्यमिक यातून होत जाणारा मुलांच्या रंग, रेषा, आकारांचा प्रवास आपल्याला पहायला मिळतो.
येत्या 31 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आमच्या माध्यामिक शाळेत पाहता येईल.
पत्ता - अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल
आरे रोड, गोरेगाव (पश्चिम)
वेळ - सकाळी 10 ते संध्याकाळी 5
Dosibai Jeejeebhoy Balvihar & Prathamik Shala

Address

Aarey Road, Goregaon (West)
Mumbai
400104

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 1pm

Telephone

+912228721771

Alerts

Be the first to know and let us send you an email when A. B. Goregaokar English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to A. B. Goregaokar English School:

Shortcuts

Share

Category