26/11/2025
*जिल्हा: उत्तर मुंबई उपनगर मालाड - संविधान दिन उत्साहात साजरा*
शिक्षण निरीक्षक, कार्यालय बृहन्मुंबई पश्चिम विभाग, कार्यालय व
उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट्स आणि गाईडस् जिल्हा संस्था मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षण निरीक्षक कार्यालय बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी पूर्व कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मालार्पण करून व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यांत आला. यावेळी माननीय श्री संजय जावीर साहेब, शिक्षण निरीक्षक तथा जिल्हा मुख्य आयुक्त ,मा. नाईक सर उपशिक्षण निरीक्षक तथा जिल्हा आयुक्त स्काऊट, कार्यालयाचे अधीक्षक श्री. छडीदार साहेब व शिक्षण निरीक्षक कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच श्रमिक विद्यालय जोगेश्वरी पूर्व या शाळेतील 30 स्काउट गाईड व स्काऊटर गाईडर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अमिता कोंबाडे जिल्हा संघटक यांनी केले. गाईडने संविधान दिनाचे महत्त्व याविषयी आपले विचार व्यक्त केले. शिक्षण निरीक्षक साहेबांनी मार्गदर्शन केले व सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अमिता कोंबाडे, जिल्हा संघटक यांनी केले. अशाप्रकारे संविधान दिन साजरा करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे...