01/04/2024
*जेव्हा माजी विद्यार्थी पुन्हा 20 वर्षे मागे जाऊन आपल्या 10 वी ब च्या वर्गात जाऊन बसतात*
आजचा 30 मार्च 2024 चा दिवस खरेच आठवणीतला ठरला.कारण 2003 साली घरट्यातून उडून गेलेली पाखरे पुनः एकदा घरट्याकडे परतली होती.
आज माजी विद्यार्थी भेटायला येणार असा निरोप मुख्याध्यापिका श्रीम रामटेके बाईंनी दिला होता. म्हणून उत्सुकता होतीच,नि ते आल्यावर वातावरणच बदलून गेले.आणि 10 वी ब चा वर्ग सुरू झाला.जवळजवळ 20 वर्षांनी शाळेत आलेले हे विद्यार्थी मनसोक्त आठवणी,मनोगत मांडत होते.आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचे बारकावे अगदी बेमालूमपणे मांडत होते नि आम्हा शिक्षकांच्या चेहऱ्यावर ही हास्याची लकेर उमटवून गेले. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेला ऐकून आनंद झाला. शिक्षक ही पुनः एकदा 20 वर्षे तरुण झाले.
आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांनाच नव्हे तर जुने,नवे शिक्षक, शाळेचे इतर कर्मचारी ह्यांनाही ह्या विद्यार्थ्यांना सामील करून सर्वानाच छान अल्पाहार व भेटवस्तू दिल्या.विद्यार्थ्यांची ही आपल्या शाळेत जाऊन पुन्हा सर्वाना भेटून, त्यांच्यात असलेली कृतज्ञतेची भावना व प्रेम आणि सर्वात महत्वाचे त्यांचे यश व प्रगती ह्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला.सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद.तो पाहून व त्यांच्या बद्दल ऐकून आम्हा शिक्षकांना खूप समाधान वाटले.अशीच प्रगती उत्तरोत्तर आमच्या सर्वच विद्यार्थ्यांनी करावी हीच मनापासून सदिच्छा व शुभेच्छा!