Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya

Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya
रा. सो. ट. माध्यमिक विद्यालय , गोवंडी-८८

आठवतो का रे १३ जून चा दिवस ?झिरमिर पावसात नव्या रेनकोट मध्ये आपलं जुनंच दप्तर कोंबून , चिखल तुडवत आज च्या दिवशी नव्या गण...
13/06/2021

आठवतो का रे १३ जून चा दिवस ?

झिरमिर पावसात नव्या रेनकोट मध्ये आपलं जुनंच दप्तर कोंबून , चिखल तुडवत आज च्या दिवशी नव्या गणवेशात शाळेत जायचो आपण आठवतंय का ?
नवा वर्ग , नवी रांग , नवा बेंच आणि नवे मित्र आठवतंय का ?
" एक साथ नमस्ते आम्ही आपले स्वागत करतो " ह्या वाक्याने नव्या शिक्षकांचं स्वागत करायचो आपण आठवतंय का ?
नवा हजेरी पट आणि त्यावर आपलं नाव चुकून जर का आलं नाही तर वाटणारी भीती आठवते का ?
नव्या वह्या पुस्तकांचा वास आज ही नाकात तसाच आहे ,
सगळ्या वाह्यांच ब्राऊन कव्हर आणि त्यावर मारलेल्या स्तेपलर च्या पिना आठवतायत का ?
मधल्या सुट्टी त मुतारी बाहेरची रांग , हाथ धुवायची लगबग आणि नव्या डब्यातल्या जाम चपाती ची चव आठवते का ?
वर्ग विसरून चुकून दुसऱ्याच वर्गात जाऊन बसल्यावर होणारी फजिती आठवते का ?
आपल्या वर्गाला जेव्हा मैदानावर जायला मिळायचं तेव्हा बाकीच्या वर्गातल्या पोरांना दाखवलेल्या जिभा , खेळताना फुटलेलं ढोपर आणि त्यावर डेटॉल चा कापूस लावल्यावर होणारी आग आठवते का ?
शाळा सुटताना होणारं वंदे मातरम् आणि " जय हे , जय हे " यायच्या आधीच दप्तरात अडकवलेले हाथ , उद्या लवकर ये रे अशी मित्राला घातलेली साद , मुख्याध्यापिकांनी वटारलेले डोळे आणि छडीचा मार आठवतोय का ?
काहीसा असा असायचा आपला शाळेचा पहिला दिवस आठवतंय का ?
१३ जुन ही तारीख आठवतेय का ????
जर का आठवले असतील ते दिवस तर आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रीणीना टॅग करा जरा ❣️

22/09/2020
आठवणी ❤😘✌👇
30/08/2020

आठवणी ❤😘✌👇

आठवणी ❤😘✌👇                                               मधलीसुट्टी आणि डब्बा 👇
19/07/2020

आठवणी ❤😘✌👇 मधलीसुट्टी आणि डब्बा 👇

Address

GOVANDI
Mumbai
400088

Telephone

+919768380995

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Radhibai Sobharaj Tahiliani Madhyamik Vidyalaya:

Shortcuts

Share

Category