Sunday Sessions at ABGES

Sunday Sessions at ABGES We meet up on Sundays in A B Goregaokar English School, Goregaon to discuss about a range of topics from science to psychology.

20/11/2022

आपल्या शरीरात अनेक वेगवेगळे molecules असतात. ह्या Molecules ची उपस्थिती, प्रमाण आपल्याला वेगवेगळ्या रोगांची माहिती देत असते.

Detectives जसे गुन्हेगारांना समाजातून जसे हुडकून काढतात, तसेच biosenors हे molecules ना आपल्या रक्तातून हुडकून काढतात आणि त्यांचे प्रमाण सांगतात.

मध्यंतरी मल्लिका ताईने तिच्या टीम बरोबर एका international competition साठी biosensor बनवला.

त्या निमित्ताने biosensor म्हणजे काय, त्याचे उपयोग , त्यांनी हा biosensor कसा बनवला अशा अनेक गोष्टींबाबत ताईने या सेशन मध्ये गप्पा मारल्या आहेत

10/05/2022

हे सेशन एलेना कॅम्पो हिने घेतले.
एलेना आहे स्पॅनिश. म्हणजे युरोप खंडाच्या दक्षिणेला असलेल्या स्पेन देशाची नागरिक!
एलेना सध्या स्वीडन मधल्या Uppsala University मध्ये International Relations शिकतेय.
एलेनाच्या स्पेन मधल्या गावाची लोकसंख्या काय असेल? तर फक्त 12! तिच्या गावात 12 लोक राहतात! आणि तिच्या गावाला महापौर आहे!!
तिचे 12 लोकांचे गाव, स्पेन मधले आयुष्य, तिचं दैनंदिन जीवन, स्पॅनिश संस्कृती याबद्दल एलेना ताई गप्पा मारणार आहे.

20/12/2021

हे सेशन सोहन सारंगी ह्याने घेतले आहे. सोहन मूळचा ओरिसा राज्यातला! त्याने IISER पुणे या भारतातल्या विज्ञानासाठी प्रतिष्ठित Institute मधून bachelors-masters physics (भौतिकशास्त्रात) केले . आता तो biophysics विषयात Uppsala University Sweden मध्ये PhD करत आहे. तर ह्या सेशनमध्ये तो आपल्याशी वेगवेगळ्या भाषांच्या जडणघडणीवर गप्पा मारणार आहे. भाषा उदयाला का आली ? वेगवेगळ्या भाषा कशा घडल्या?
language tree म्हणजे काय ? भाषा आणि संस्कृती यांचे काही नाते आहे का ? अशा अनेक प्रश्नची उत्तरे सोहन दादा ह्या सेशन मध्ये देणार आहे.

22/11/2021

हे सेशन मल्लिका चौकर हिने घेतले आहे. ती सध्या शिक्षणासाठी युरोप मधल्या स्वीडन देशात राहते. गेल्या महिन्यात इथे एक गम्मत घडली. 30 आणि 31 ऑक्टोबर मधल्या रात्री 2 वाजता स्वीडन सकट युरोप मधल्या बहुतांश देशानी आपली घड्याळं उलटी फिरवली. म्हणजेच रात्री 3 वाजल्या नंतर 03.01 न वाजता, 02.01 वाजले. याला daylight Saving म्हणतात. जगातले अनेक देश हा प्रकार वर्षातून दोन वेळा करतात. असे का केले जाते ?
जगात वेगवेगळ्या देशात एकाच क्षणी घड्याळ वेगवेगळी वेळ दाखवत असते. असे का?
Timezone म्हणजे काय? हे कसे ठरवले जातात?
तुमचं घड्याळ वेळेवर सुरु आहे, पाठी पडलाय की जोरदार धावतंय हे तुम्ही कसे ठरवता?
तुम्हाला काय वाटतं, वेळ आणि घड्याळ ही नैसर्गिक घटना आहे की मानवनिर्मित संकल्पना आहे?
अशा अनेक प्रश्नांवर मल्लिका ताई ही तुमच्याशी ह्या सेशनमध्ये गप्पा मारणार आहे.

21/11/2021

हे सेशन मल्लिका चौकर हिने घेतले आहे. ती सध्या शिक्षणासाठी युरोप मधल्या स्वीडन देशात राहते. गेल्या महिन्यात इथे एक गम्मत घडली. 30 आणि 31 ऑक्टोबर मधल्या रात्री 2 वाजता स्वीडन सकट युरोप मधल्या बहुतांश देशानी आपली घड्याळं उलटी फिरवली. म्हणजेच रात्री 3 वाजल्या नंतर 03.01 न वाजता, 02.01 वाजले. याला daylight Saving म्हणतात. जगातले अनेक देश हा प्रकार वर्षातून दोन वेळा करतात. असे का केले जाते ?
जगात वेगवेगळ्या देशात एकाच क्षणी घड्याळ वेगवेगळी वेळ दाखवत असते. असे का?
Timezone म्हणजे काय? हे कसे ठरवले जातात?
तुमचं घड्याळ वेळेवर सुरु आहे, पाठी पडलाय की जोरदार धावतंय हे तुम्ही कसे ठरवता?
तुम्हाला काय वाटतं, वेळ आणि घड्याळ ही नैसर्गिक घटना आहे की मानवनिर्मित संकल्पना आहे?
अशा अनेक प्रश्नांवर मल्लिका ताई ही तुमच्याशी ह्या सेशनमध्ये गप्पा मारणार आहे.

25/10/2021

हे सेशन प्रार्थना राऊत हिने घेतले आहे. प्रार्थना ताई ही आपल्याच शाळेची माजी विद्यार्थिनी असून ती सध्या रामनारायण रुईया महाविद्यालयात, कला शाखेतून द्वितीय वर्षाचे शिक्षण पूर्ण करत आहे. तिचे स्वतःचे 'Prarthana Raut' या नावाचे YouTube Channel देखील आहे. त्यावर ती 'शिक्षण, जीवनकौशल्ये, फावल्या वेळातील आमचे उद्योग' अशा वेगवेगळ्या विषयांवर video upload करते. आपण दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी किंवा कृती करतो. त्या सर्व कृती किंवा गोष्टी करताना आपण आपल्यातल्या विविध कौशल्यांचा वापर करत असतो. त्यापैकीच एक आणि सर्वात आवश्यक कौशल्य म्हणजे संभाषण कौशल्य ( Communication Skill ). बोलीभाषेत बघायला गेलं तर संवाद साधणं किंवा एकमेकांशी बोलणं. आपण एकमेकांशी बोलतो म्हणजे नक्की काय बरं करतो? त्यावेळी फक्त 'बोलणं' आणि 'ऐकणं याशिवाय आणखी काय बरं घडत असतं? संवाद साधणं ही प्रत्येकाला जन्मतः मिळालेली कला असली तरी ती अजून छान कशी करता येईल, या आणि अशा अनेक गोष्टींवर माहिती प्रार्थना ताईने ह्या सेशनमध्ये दिली आहे.

29/08/2021

हे सेशन चैतन्य जोगळेकर ह्याने घेतले आहे. चैतन्य दादा Chemical Engineer आहे. त्याने graduation मुंबईतील Institute of Chemical Technology (UDCT) मधून केले. नंतर Masters त्याने Netherlands देशातील Delft Technical University मधून केले . आता तो Shell या प्रतिष्ठित कंपनी मध्ये काम करत आहे.
त्याला ओरिगामी या हस्तकलेच्या प्रकाराची पण आवड आहे . ओरिगामी ही फक्त एक कलाच नसून त्याचे आणि विज्ञानाचे घनिष्ठ नाते आहे. या रविवारी तो आपल्याशी ओरिगामी वर गप्पा मारणार आहे.

08/08/2021

यावर्षी भरपूर पाऊस पडला. कोकणात पावसाचा रुद्रावतारपण आपण पाहिला. आता आल्हाददायक श्रावणसरी पडू लागल्यात! तर या रविवारी पावसाळी गप्पा मारायला भेटूया!

पाऊस कसा बनतो?

पाऊस पडल्यानंतर मृदगंध का दरवळतो?

रानहळद , आघाडा यासारख्या अनेक वनस्पती फक्त पावसाळ्यातच का उगवतात?
वर्षभर त्या कुठे लपतात?

पावसाच्या थेंबाचा आकार कसा असतो?

विषववृत्तीय प्रदेशातच पाऊस भरपूर का कोसळतो?

अशा अनेक प्रश्नांवर मल्लिका आपल्याशी गप्पा मारणार आहे.

27/06/2021

तुम्ही सगळे मल्लिका ताईला नक्कीच ओळखत असालं. म्हणजे निदान थोडफार तरी. Sunday Session च्या माध्यमातून तुमच्यापैकी काही जण तिला भेटले असतील किंवा तिच्याशी गप्पा मारल्या असतील.
तर आपली ही मल्लिका ताई पुढच्या शिक्षणासाठी परदेशात म्हणजेच Sweden ला जाणार आहे.मस्त ना! आपल्याच शाळेत शिकलेली, आपल्यासोबत गप्पा मारणारी, Sunday Session च्या साहाय्याने नवीन ताई-दादांशी आणि त्यांनी सोबत आणलेल्या विषयांशी आपली ओळख घडवून देणारी ताई, आता तिचा आवडीचा विषय शिकण्यासाठी Sweden ला चालली आहे. तिने हे कसं बरं ठरवलं असेल?
तिने Dye Stuff Engineering ह्या विषयात BTech केलं आहे. हा विषय निवडताना तिने काय बरं विचार केला असेल? आपल्याला माहित असलेल्या आणि नसलेल्या अशा असंख्य विषयांमधील तिने हाच विषय का बरं निवडला असेल? मला तर फार उत्सुकता आहे हे जाणून घ्यायची.
अभ्यासाव्यतिरिक्त वाचन,लिखाण, ओरिगामी असे अनेक छंद तिने जोपासले आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तिने 'शाळेच्या आठवणी' अशी एक series सुद्धा लिहायला सुरुवात केलेली. अभ्यासाच्या वेळांतून वेळ काढत तिने तिचे छंद कसे जोपासले बरं? या आणि संबंधीत अशा अनेक प्रश्नची उत्तरे मल्लिकताई ह्या सेशन मध्ये देणार आहे.

Address

Mumbai

Opening Hours

9am - 10am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunday Sessions at ABGES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category