04/04/2026
अक्षरसुधा अंतर्गत " दिव्यांगधारा प्रतिष्ठान" आणि " सक्षम, कोकण प्रांत" यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे कर्णबधिर, मतिमंद, बेघर/अनाथ तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी "संवादसेतू आंतर शालेय स्पर्धा" घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, स्वातंत्र्य वीर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला. प्रमुख अतिथी,प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि क्रीडा पत्रकार श्री. सुनंदन लेले यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेऊन विविध स्पर्धांमध्ये खालीलप्रमाणे बक्षिसे पटकावली.
"टिल्लू पिल्लू स्पर्धा "
गट 1- वैयक्तिक बडबड गीत - अहमद मुल्ला - तृतीय क्रमांक.
गट 2 - समूह बडबड गीत - नौमान कुरेशी, रजाक कुरेशी, आहाद शेख - उत्तेजनार्थ पारितोषिक.
गट 3 - नृत्य व गीत गाणे - सुदर्शन बिका, अर्पिता पांडे, सिरीना दनकाई, हसनैन शेख, प्रिन्स मंडल, हुमैरा बेग - तृतीय क्रमांक.
या स्पर्धाँची तयारी वाचा तज्ञ सौ. निता धुरी व भाषा शिक्षक सौ. मानसी शिंदे यांनी करून घेतली होती.
"नागरिकशास्त्रावर आधारित नाट्य स्पर्धा"
यामध्ये "प्रकृती का उपहार" या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच कु. सबा शेख हिला वैयक्तिक अभिनयाचे बक्षीस मिळाले. याची तयारी भाषा शिक्षक श्री. नरेश सर, सौ. सुगंधा कचरे व सौ. मीनल शेट्ये यांनी करून घेतली होती.
सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दीक अभिनंदन !🏆💐
19/03/2026
दि. १८ मार्च २०२६ रोजी विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रथम विद्यार्थ्यांना या सणाची माहिती देऊन, गुढी उभारून पूजा करण्यात आली. नंतर पारंपरिक वेषात विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्तम लेझिम नृत्य सादर केले.
गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी माहितीचे सादरीकरण, गुढी उभारणे आणि शोभायात्रेची तयारी असे संपूर्ण नियोजन आणि आयोजन वाचा तज्ञ सौ. नीता धुरी आणि विशेष शिक्षक सौ. मानसी शिंदे यांनी केले होते. कला शिक्षक श्री. कांबळे सर व पिचड सर यांनी सुद्धा उत्तम सहकार्य केले.
सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
17/03/2026
शालेय विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि मूल्ये यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान तर्फे शाळांमध्ये शिक्षण उपक्रमा अंतर्गत रामायण,महाभारत, क्रांतिगाथा, संतकथा यांच्यावर आधारित परीक्षा घेतल्या जातात.
प्रगती विद्यालयातील विद्यार्थी देखील संत साहित्यावर आधारित परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यात कु, झोए कोल्लूर या विद्यार्थ्याचा आमच्या शाळेतून प्रथम क्रमांक आला. सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि विजेत्याचे अभिनंदन !
11/03/2026
३ मार्च हा जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो.विजय शिक्षण संस्थेच्या कर्णबधिर मुलांसाठी साधना विद्यालयात ३ मार्च ते ९ मार्च " जागतिक श्रवण दिन सप्ताह " म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये" कोणतेही कर्णबधिर मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचा उहापोह व संस्था परिचय करून देणारा लेख आजच्या " मुंबई तरुण भारत " या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला.
10/03/2026
दि. ८ मार्च २०२६, प्रगती विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री बाजीराव शिरसे यांनी महिला दिनाची माहिती सांगितली आणि महिला कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींचा सन्मान केला.
04/03/2026
दि. २ मार्च २०२६ रोजी प्रगती विद्यालयामध्ये होळीचा सण साजरा करण्यात आला. सौ. संघमित्रा बलांडे यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या सणाची माहिती दिली.
सौ. सुगंधा कचरे व सौ. मीनल शेट्ये यांनी विद्यार्थ्यांकडून नैसर्गिक रंग तयार करून घेतले.
होळी निमित्त Daksha Varma & group - Adore charities तर्फे श्रीमती. शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स आणि खाऊचे वाटप केले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !
04/03/2026
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रगती विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. नरेश सर व सौ. मीनल शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिनाची माहिती सांगितली व काही विद्यार्थ्यांकडून मराठी बोलून घेतले. प्रिया दास हिने मराठी कविता सादर केली. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!