28/08/2019
Whatsapp विद्यापीठाबद्दलचा हा लेख खरच खूप आवडला. Dr. चिरमुले ह्यांनी काही एकदम महत्वाच्या मुद्द्यांना चोखपणे हाथ घातलाय.
ह्याच अनुषंगाने, आपण शेळीपालन करत असताना असे बरेच अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतात. त्याबद्दल थोडेसं लिहिलंय.
अश्या Whatsapp विद्यापीठांचा प्रादुर्भाव वाढण्याचे मुख्य कारण हे काही विशिष्ट लोकांचे अत्यंत चांगले मार्केटिंग कौशल्य हे आहेच. पण प्राणी संगोपनाबद्दल, कुठेतरी पुढे जाऊन विचार करता, योग्य त्या माहितीचा अभाव आणि असलेल्या माहितीचे standardisation नसणे, हे ही तितकेच महत्वाचे आहे. Particularly शेळ्यांच्या बाबतीत. आणि त्याहून पण महत्वाचे म्हणजे वैद्यकीय services चा अभाव.
मग अश्यावेळेला, *योग्य वापर केल्यास*, असे whatsapp विद्यापीठाच कामी येतील असे मला वाटते.
नक्की कोणता सल्ला बरोबर?
प्राणी संगोपन किव्हा एकंदरीतच शेती, ह्या गोष्टी 'thumb-rule' वर होत नाहीत हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शेळ्यांच्या बाबतीत एखादा प्रॉब्लेम होणे, ह्यासाठी ती खात असलेला चारा, तिची राहायची जागा, तिचे वय, त्या जागेटले हवामान व एकंदरीत तिची ठेवण असे अनेक factors जवाबदार असतात. मग अश्या परिस्थितीत सल्ला मागणारे व देणारे ह्या दोघांचीही जवाबदारी राहते की साधारणपणे निदान एकदातरी ह्या बाबींचा विचार करावा आणि मगच निदान ठरवावे आणि त्यानुसार उपचार करावे.
एखाद्या समूहावर सल्ला मागताना काय नमूद करावे?
१) सर्वात महत्वाचे म्हणजे शेळी-बोकडाचे सध्य स्थितीतले तापमान. शेळ्यांचे normal तापमान हे 102-103 F इतके असते. आणि बऱ्याचदा होणारा त्रास हा तापमानाशी निगडित असतो.
२) प्राण्यांचा सध्या चालू असलेला चारा. चाऱ्यात अचानक किव्हा इतरवेळे सुद्धा झालेल्या बदलांमुळे काही त्रास उद्भवू शकतात.
३) प्राण्याचे वजन. (ह्याचा खुलासा पुढे केला आहे)
४) लक्षणं दाखवण्याचा कालावधी. बऱ्याचदा लक्षणांच्या तिव्रते नुसार उपचार पद्धती बदलू शकते म्हणून.
एखाद्या समूहावर सल्ला देताना घ्यावयाची काळजी.
बरेच अनुभवी शेळीपालक हे मदतीच्या भावनेने अडचणीत असलेल्या शेळीपालकला तत्परतेने मदत करतात. पण उत्साहाच्या भरात अनावधानाने समोरच्या शेळीपालकाचे नुकसान होऊ शकते हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे. १) बहुतांश वेळी आपण सल्ला देताना similar परिस्थिती मध्ये आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे सल्ला देतो. मग अश्या वेळेला वरील नमूद केलेले मुद्दे हे आपल्या अनुभवाशी किती साम्य धरून आहेत ह्याचा सारासार विचार करूनच मग उपाय सांगावा.
२) त्याच बरोबर समोरील शेतकरी ज्या भागातून आहे, तिकडच्या जनरल परिस्थिती बद्दलचा ही विचार नक्की करावा.
३) औषध सुचवताना शक्यतोवर *brand name* च्या ऐवजी *medicine name*. कारण तुम्ही वापरलेला ब्रँड हां सगळ्याच ठिकाणी उपलब्ध असेल असे नाही.
किती ml?
हा प्रश्न हमखास विचारला जातो. किती ml औषध द्यायचं?
ह्याचं उत्तरही general कधीच असू शकत नाही. करण मुख्यतः dosage प्राण्याच्या वजनावर ठरवायचं असतं. त्याचबरोबर सुचवलेल्या औषधाचं कोणतं concentration (10%, 20%, 1.5 gm, 3 gm, 4.5 gm) हे सल्ला देणाऱ्याला माहिती नसते. आणि त्यासाठी औषधाबरोबर येणारे पत्रक, किव्हा निदान बाटलीवर छापलेला मजकूर आवर्जून वाचवा आणि समजून घ्यावा. प्रत्येक वेळेला!
Feedback नक्की द्या.
सगळं करुन झाल्याच्या नंतर, तुम्हला मिळालेल्या सल्ल्याचा आधारे जो काही बरा वाईट अनुभव आला असेल तो सर्वात पहिले लिहून घ्या आणि तो त्या समूहावर नक्की नोंदीत करा. म्हणजे तुमच्यासारख्या इतर शेळीपालकांना सुद्धा त्याचा फायदा नक्की होईल.
सुमित भोसले
कॅलिफोर्निया३० फार्म्स
तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
9833654857
8378061627