13/05/2026
नीट-यूजी 2026 परीक्षा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी : अभाविप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नीट-यूजी 2026 परीक्षेशी संबंधित समोर आलेल्या कथित पेपर लीक, अनियमितता तसेच परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयता व विश्वासार्हतेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विविध माध्यमांमधून, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) तसेच तपास यंत्रणांकडून समोर येत असलेल्या माहितींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या मनात परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकता व विश्वासार्हतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.
अभाविपचे स्पष्ट मत आहे की, प्रवेश परीक्षांच्या पवित्रता, सुचिता व विश्वासार्हतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारार्ह नाही. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा त्यासंबंधित माहिती
काही व्यक्तींपर्यंत पोहोचली असेल, तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवरील आघात नसून वर्षभर परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला अन्याय आहे.
अभाविपने सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य व आवश्यक पाऊल असल्याचे अभाविपने म्हटले आहे. सीबीआय चौकशीत समोर येणारे पुरावे, नेटवर्क व संबंधित दोषी व्यक्तींची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय परीक्षांमध्ये सक्रिय असलेल्या शिक्षण-माफिया व भ्रष्ट साखळीचा संपूर्ण भांडाफोड होऊ शकेल.
अभाविपची मागणी आहे की, या प्रकरणात सहभागी असलेल्या परीक्षा-माफिया, संबंधित अधिकारी तसेच कोणत्याही स्तरावर सहकार्य करणाऱ्या सर्व दोषींवर कठोरतम कारवाई करण्यात यावी. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस संरक्षण मिळता कामा नये.
राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये सातत्याने समोर येणाऱ्या गोंधळांमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वारंवार अशा घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी व विश्वासघातकी आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारत NTA च्या महासंचालकांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच NTA च्या रचना व भूमिकेची व्यापक पातळीवर पुनर्रचना व पुनरावलोकन करण्यात यावे.
03/05/2026
पुण्यात ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेला बलात्कार व निर्घृण हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. तसेच राज्य सरकार व प्रशासनाकडे अशी मागणी करते की, दोषी नराधमावर तात्काळ कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
25/04/2026
अभाविपचे शिल्पकार, प्रेरणास्थान प्रा. यशवंतराव केळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻🚩
22/04/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती.मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन BAMS विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत वैद्यकीय अधिकारी गट-अ भरती प्रक्रियेत BAMS पदवीधरांना वगळण्यात आल्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला. शासनाच्या विद्यमान नियमांनुसार BAMS पदवीधरांना न्याय मिळावा व त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
19/04/2026
अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी समृद्धी, सौभाग्य आणि आनंद आपल्या जीवनात अखंड नांदो हीच शुभेच्छा! ✨🌼
अक्षय पुण्य, अक्षय संपत्ती आणि अक्षय आनंद तुमच्या घरी सदैव नांदत राहो.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
14/04/2026
कोंकण प्रांत, मुंबई महानगरातील चेंबूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी निधी संचलित अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती, सेवार्थ विद्यार्थी (SFS), मेडिव्हिजन (MeDevision), जिज्ञासा व अभाविप चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय सेवार्थ विद्यार्थी प्रमुख श्री. भवानी शंकर तसेच अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीच्या उपाध्यक्षा जयश्री ताई ओव्हाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी, सहमंत्री अभिषेक पवार, सहमंत्री प्रदीप जोशी तसेच जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरले.
14/04/2026
ज्ञान, समता आणि न्याय यांचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
11/04/2026
महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻
10/04/2026
आज महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. गीतेश चव्हाण, कोंकण प्रांत अध्यक्ष प्रा. कैलास सोनमनकर, कोंकण प्रांत मंत्री श्री. राहुल राजौरिआ तसेच अनेक पूर्वकार्यकर्ते व इतर केंद्रीय तसेच मुंबई महानगर पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत संघटनात्मक कार्य, शैक्षणिक क्षेत्रातील सध्यस्थिती आणि विद्यार्थ्यांसमोरील संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
अभाविपच्या माध्यमातून तरुणाईत राष्ट्रभक्ती आणि शिक्षणाबद्दलची जागरूकता दृढ होत असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.