नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो!!!
आज मराठी माणुस जगात वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहे. परंतु भाग भांडवल बाजार म्हणजेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला अजून आपण मागेच आहोत. इथे आपण मराठी माणसासाठी मदत उभी करणार आहोत. जेणे करून मराठी माणुस ह्याही क्षेत्रात पुढे जाईल. "मराठी माणसांचे, मराठी माणसांसाठी"!
मराठी माणसाने विठ्ठलाची पुजा केली, विठ्ठल प्रसन्न झाला,
आणि मराठी माणुस थोर झाला....ज्ञानेश्वर, तुकाराम.....
मराठी माणसाने गणपतीची पुजा केली, बुद्धीची देवता... गणपती प्रसन्न झाला...
आणि मराठी माणुस थोर झाला...स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक.....
मराठी माणसाने सरस्वतीची उपासना केली .....कलेची देवता प्रसन्न झाली....
आणि मराठी माणुस थोर झाला....लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर
परंतु ,
मराठी माणसाने कधीच लक्ष्मीची पुजा नाही केली कि उपासना नाही केली
म्हणून मराठी माणुस अजूनही इतरांच्या मागेच राहिला.....
आता वेळ आली आहे लक्ष्मीची उपासना करायची....
घेऊन आलो आहे आपल्यासाठी
"मराठी" स्टॉक मार्केट .....आत्ता शेअर मार्केटची माहिती...मराठीत...
मराठी माणसासाठी आता सहज आणि सोप्प शेअर मार्केट...मराठीत...
आपले जे काही प्रश्न असतील ते विचार आपल्या भाषेत....मराठीत..
महत्वाची सूचना
इथे देण्यात येणारी माहिती हि वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळवलेली आहे...तसेच ज्या काही टिप्स दिल्या जातील त्या तांत्रिक विश्लेषणावर आधारित तसेच अवलंबून असतील...ट्रेड करणार्यांनी स्वताच्या जवाबदारीवर ट्रेड करावा...होणाऱ्या फायद्याला किंवा तोट्याला मराठी स्टोक मार्केट किंवा इतर कोणीही जवाबदार राहणार नाही.