Crazy Bugs

Crazy Bugs Crazy Bugs aims to provide all the hobbies and activities under one roof that will enrich you with a Who am I ? :
-------------
Hi friends!!!!!

My name is Crazy Bug. I reside inside your brain and I make you do crazy things. My duty is to bring out other crazy bugs (Crazyness) lying inside you, to help you do something out of the box, which will give you the joy of the self creation. I am a catalyst to make your life tension free and joyful. So don't ever forget me. What I Do:
-------------
I offer you variety of courses and activities that will enrich you with abundance of knowledge, skills and fun. You will experience limitless joy and relaxed mind. I provide you number of hobby courses and activities under one roof. Our Aspirations:
--------------------
God has created wonderful world with beautiful nature and limitless other things like music, art, food, culture and lot more things . We aspire to provide you as many such things which are prevailing in this world. We want to make every human being in this world rich with knowledge, skills and joy. Our aspiration is to bring all the hobbies and activities to your doorstep under one roof. We want to make everyone happy, stress-free and full of skills. Our Motive:
--------------
It is being said that King Shajahan cut the hands of his workers after building Taj Mahal; so that no one else can build such beautiful monument. There are lot of art forms like this which vanished with time as no one taught these art forms to others. Our efforts will always be there to preserve and grow such arts.

16/01/2021

*तिची एक गोड आठवण ....* @ Ashutosh Suniti Kiran Vedak गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे... स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या ...
15/02/2020

*तिची एक गोड आठवण ....*


@ Ashutosh Suniti Kiran Vedak


गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे...

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांपैकी एक विशेष कार्यक्रम म्हणजे जव्हार भेट. गुढीपाडव्याच्या खर्चातून उरलेली रक्कम अधिक रद्दीदान सारखे उपक्रम राबवून जमा केलेली रक्कम आम्ही दरवर्षी तलासरी - वाडा स्थित आदिवासी पाड्यांना मदत करणाऱ्या प्रगती प्रतिष्टानला donate करतो.

गेल्यावर्षी त्याच निमित्ताने जव्हार ला गेलो असता तिची आणि माझी भेट झाली. आम्ही वस्ती केलेल्या कर्णबधिर मुलांच्या शाळेपासून जवळच असणाऱ्या मार्केट मध्ये आमची नजारा नजर झाली. मध्यम बांधा आणि गहू वर्णीय असणारी ती दिसायला तितकीच गोड होती. पण मी बस मध्ये असल्याने तिची नजरभेटच होऊ शकली. पण मनात कुठेतरी ठरवलेलं तिला परत गाठायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. इतर कार्यकर्ते झोपलेले आणि चहा - नाष्ट्यालाही थोडा वेळ होता. नाशिक पट्टा असल्याने हवेत गारवाही तितकाच होता. पण गुलाबी थंडी पेक्षा जरा जास्तच. मग चहा प्यायच्या निमित्ताने मी , गौरव आणि वडके काका मार्केट मध्ये गेलो. चहाच्या एका टपरीवर ती पुन्हा दिसली. पण तिच्याबरोबर लाल बुंद चेहऱ्याचा एक टोणगा तेथे बसलेला. आम्ही आपले चहा पिऊन तेथून निघून गेलो. मनात कुठेतरी खंत होती कि हि पुन्हा भेटेल कि नाही.. पण असो...

ह्या वर्षीही जव्हार भेटीचा योग पुन्हा आला... आणि तिचे चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले. बरं एक वर्ष सरल्याने भेटिचीपण अपेक्षा नव्हती. ह्यावेळेस पण तेच झाले, मी, गौरव आणि योगेश प्रभू चहाच्या निमित्ताने त्याच टपरीवर गेलो. आणि योगायोग म्हणावा कि अजून काही ती पण तिथेच होती आणि तो लाल चेहऱ्याचा टोणगाहि तिथेच होता. कुठेतरी संवाद करायचा प्रयत्न म्हणून टपरीच्या मालकाला विचारले हे इथे कसे काय... तेंव्हा तो म्हणाला माझेच मुलगा मुलगी आहेत. आम्ही इथेच राहतो. मूळचे आम्ही बनारसचे.. गेली ३ वर्ष इथे स्थायिक झालोत.

टपरीचा मालक बोलायला तसा छान होता. त्याने तिच्याशी आमची ओळख करून दिली. आम्ही तिच्याशी आणि त्या लाल तोंडाच्या टोणग्याशी मनसोक्त गप्पा मारू निघालो. तिच्यात काहीतरी वेगळं होतं जे तिला इतरांपासून वेगळं करत होतं... आमची भेट जरी काही मिनिटांची असली तरी आज तुम्हाला आणि तिला भेटवावं असं थोडं मनात आलं.

तिचं नाव होतं 'लवंग लता'. नाव थोडं वेगळंच आहे मला माहित आहे. पण शेवटी नाम मे क्या रख्खा है... आणि तिच्या गोडव्या समोर सगळंच फिकं आहे..

बर हि लवंग लता आणि तो लाल तोंडाचा टोणगा म्हणजे त्या टपरीवर विकायला ठेवलेले गोड पदार्थ. जेवढी आवड मला भटकंतीची आहे तेवढीच आवड खवय्येगिरीची आहे. भटकंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या पदार्थांची चव घेता येते. बरं हि लवंग लता म्हणजे पट्टी पॅटिस सारखी पण आतमध्ये गोड शिऱ्याचं stuffing आणि साखरेच्या पाकात घोळवलेला पदार्थ. आणि लाल तोंडाचा टोणगा म्हणजे गोड शिऱ्याचं stuffing आणि पाकात बुडवलेला समोसा. माझ्यासारख्या गोडक्यांसाठी हि मेजवानीच पण गौरवने सोबत तिखट समोसाही घेतला.


*तर मग... घुमते रहो... खाते और खिलाते रहो ... आणि सगळ्यात महत्वाचं – Don’t forget to share your experiences…*

01/01/2020

Fist time ever we ordered something in hotel...And public started staring at us....Like... 'Amiron ke shouk hai...'😅
21/12/2019

Fist time ever we ordered something in hotel...
And public started staring at us....

Like... 'Amiron ke shouk hai...'😅

Wish you all happy and naturefull weekend...Like us if you liked the quote..
13/07/2019

Wish you all happy and naturefull weekend...

Like us if you liked the quote..

Hey friends...It's lightening outside....⚡⚡⚡Rain is about to shower around you...🌧🌧Have u planned Monsoon outing with yo...
10/06/2019

Hey friends...

It's lightening outside....⚡⚡⚡

Rain is about to shower around you...🌧🌧

Have u planned Monsoon outing with your friends? 👩🏻‍🦰🧑

*Plan your customised Group Monsoon Picnic with Crazy Trekkers..*

Nature Trails, Waterfalls, Valleys, Treks, River Rafting, Team Building Activities and much more

*Ashutosh Vedak* - 8080219952
*Website* - www.crazybugs.in
*You tube Channel* - https://www.youtube.com/channel/UCBDYQCRhu0EoVT2TZonmTHg
*Instagram*- https://www.instagram.com/crazybugsss/
*page* - https://www.facebook.com/www.crazybugs.in/

10/05/2019

Looking for parents
To promote our KIDS events and activities
Among their contacts and others...
Kindly leave your contact no.

        Incredible India     Don't forget to visit memorable natures event...LIMITED SEATS Kids and women friendly...Kin...
05/05/2019

Incredible India

Don't forget to visit memorable natures event...
LIMITED SEATS
Kids and women friendly...

Kindly contact
Crazybugs
8080219952

28/04/2019

काजव्यांसोबत Time Please .....

दिवसेंदिवस आपण सगळीकडे वणवण करत असतो. खरचं वणवण म्हणायचं आहे मला. आपण फक्त जॉब करून थकत नाही पण त्यापेक्षाही जास्त थकतो ते एखाद्या काळजीने. सर्वांना खुश ठेवायचंय, कोणाला दुखवायच नाहीये, कोणाला विचारणारं कोणीच नाही तर कोणाला विचारणारी खूप माणसं आहेत म्हणून त्रास. ह्या सगळ्यात हेलकावे खाणारं मन कुठेतरी वेळोवेळी शांत झालंच पाहिजे; नाहीतर ते जगणं नव्हे.. आजच्या busy lifestyle मधून स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या वेळेत सर्वत्र शांतता असेल; विशेषतः मानसिक शांतता, कारण कदाचित तिथेच आनंद आहे.मला खूप दिवसांपासून जायचं होतं काजवे पाहायला. Fireflies festival नावाप्रमाणे मी खूप काजवे कधीच एकत्र पाहिले नव्हते. ट्रेक ऑर्गनायजर माझा मित्र असल्यामुळे मी असा ट्रेक ऑर्गनाइस करवला. भर मे महिन्यात ट्रेक होता. पण Night Trek असल्याने जास्त बरं वाटत होतं, कारण उन्हाचा त्रास होणार नव्हता.

नेहमीप्रमाणे ट्रेक च्या अगोदर Excitement Level अगदी high होती. बॅक पॅक भरून ऑफिस नंतर सगळे बदलापूर स्टेशनला भेटलो. मग एका खाजगी गाडीने आम्ही उचले नावाच्या गावापाशी उतरलो. आम्ही अंदाजे रात्री 8:30 ला चालायला सुरुवात केली.. वाटेत जाता जाता मला टॉर्चच्या लाईटमध्ये विंचू दिसला, छोटासा होता. पहिल्यांदाच पहिला मी. सरळ वाट संपून आम्ही आता Base village ला पोहोचलो. त्या घराच्या अंगणात आम्ही सगळे 20-25 ट्रेकर्स थोड्यावेळ बसलो. माझ्या ओळखीचे तसे 5-6 जण होते. आधी मला जमायचं नाही नवीन माणसात मिसळायला, बोर होईल अस वाटायचं पण आता आवडत. आम्हाला जो गावकरी वर गडावर घेऊन जाणार होता, त्याने चहाची व्यवस्था केली होती तिथे. थोडं सेटल झाल्यावर आमच्या ट्रेक ऑर्गनायजरने आम्हाला स्नॅक्सचे पॅकेट्स दिले. त्यातले आम्ही काहीतरी खायला सुरवात केली तेवढ्यात त्या गावकऱ्याने आमच्यासाठी चहा आणला. ब्लॅक टी ऐकूनच बऱ्याच जणांनी नाही सांगितलं. पहिल्या वेळेस त्याने 10-12 कप चहा आणला होता. ज्यांनी तो प्यायला त्यांनी अजून एक एक कप मागितला. आम्ही सगळे बघायला लागलो ब्लॅक टी का एवढा आवडला असेल? दुसऱ्या फेरीत त्याने जास्त कप चहा आणला होता. तेव्हा ज्यांनी आधी प्यायला न्हवता त्या आम्ही सगळ्यांनी एक-एक सीप ट्राय केला. कसला भारी होता तो चहा. आम्ही सगळ्यांनी अजून एक कप चहा मागवला.

मस्त चहा झाल्यावर आम्ही चढायला सुरुवात केली. मला वाटलं होतं night ट्रेक म्हणजे जास्त थकणार नाही; पण जसं जसं चढायला लागलो तसा दम लागत होता. ऑफिस वरून आल्यामुळे जास्त थकल्यासारखं वाटत होतं. रात्रीचा ट्रेक असून सुद्धा चक्क घाम गळायला लागला होता.अर्ध चढून झालं तरी काजवे काही दिसत नाही म्हणून आम्ही बोर होत होतो. मधे एका जागेवर आम्ही थोडं थांबलो. आम्ही बरोबर मॅग्गी आणली होती. काट्याकुट्या गोळा केल्या, दगडाची चूल बनवली. पण ती चूल काही पेटत नव्हती. प्रत्येक जण आपली हुशारी दाखवत होता, शेवटी सगळ्यांची हुशारी एकत्र करून एकदाची चूल पेटली. मस्त मॅग्गी बनवली आणि ती पण रात्री जंगलात डोंगरावर. मज्जा आली ती मॅग्गी बनवायला आणि खायला. वर चढता चढता झाडांवर काजवे दिसायला लागले होते. आम्ही मध्येच थांबलो, सगळ्यांनी टॉर्च बंद केले आणि शांत उभे राहिलो. अगदी शांतता, रातकिड्यांचा आवाज, सगळीकडे अंधार आणि मधूनच उडणारे काजवे… कधीच न अनुभवलेली ती 5-10 मिनिटं होती.. अंदाजे 2:30 - 3 ला आम्ही गडावरच्या मंदिरात पोहोचलो. सगळ्यांनी बॅग्स काढल्या, शूज काढले रिलॅक्स झाले सगळे. मंदिराच्या बाहेर बसायला बरीच जागा होती. सगळे बसलेलो. तेव्हा आशुतोष ने सांगितलं आता कोणीच टॉर्च चालू ठेवणार नाहीये, मोबाईलची लाईटपण नाही आणि कोणी बोलणारही नाही. सगळ्यांनी तस ऐकलं. 20-25 माणसात एवढी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती. डोळे उघडे ठेवून बाजूला बसलेली माझी बहीणही मला दिसत नव्हती. एवढा काळाकुट्ट अंधार. ती दहा मिनिटं मी जे अनुभवलं ते मला अजून आठवतं. ३ - ४ तासांच्या ट्रेक दरम्यान खूप असे काजवे काही दिसले नव्हते. तरीही ट्रेक पूर्ण झाल्याचं समाधान होतं. काजवा महोत्सव आता संपला असा विचार करताच, देवळाच्या मागच्या बाजूने आमच्यातली एक मुलगी ओरडली.. "अरे इकडे या सर्वांनी... काय भारी दिसतंय बघा...” तसे सर्व देवळाच्या मागच्या बाजूला गेले. टॉर्च बंद करून पाहतो तर काय एक झाड संपूर्ण काजव्यांनी लुकलुकतं होतं. संपूर्ण ट्रेक दरम्यान इतके काजवे पहिल्यांदाच बघत होतो. आमच्याबरोबर असलेला गावकरी बोल्ला "चला आता अजून काजवे बघायचेत ना..??" आम्ही विचारात पडलो, की एवढ्या वर येऊन अजून कुठे काजवे बघायला नेतोय हा.. एवढे थकूनसुध्दा काजवे बघायचे म्हटल्यावर सगळ्यांची एक्सईटमेंट परत वाढली आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही निघालो. मंदिराच्या पुढे एक छोटं पठार होतं आणि त्याच्यापुढे गाव. हो.. डोंगरावर अक्ख गाव. आम्ही त्या पठारावर आलो आणि तिथे जे पहिले ते अक्षरशः डोळे दिपवणारं होतं. लुकलूकणारे असंख्य काजवे.. जिथे पहावे तिथे काजवेच काजवे. डोळ्यात किती साठवू आणि किती नको असं होत होतं. झाडांना पानं नव्हती तेवढे त्या झाडावर काजवे होते. मी येताना एवढे काजवे दिसतील अशी अपेक्षा पण केली नव्हती. काजवे न बघितल्याची खंत, एवढे काजवे बघून अखेर पूर्ण झाली. काजवे बघत आम्ही एका झाडाखाली बसलेलो. काजवे बघत असताना त्या गावकऱ्याने आमच्यासाठी टोपली भरून बिटकू आंबे आणले ... अगदी थिएटर मध्ये बसल्या सारखं आम्हाला वाटत होतं. आम्ही आंबे खात खात काजव्यांचे ते क्षणिक जग अनुभवत होतो.. नावाप्रमाणे खरच तो fireflies festival होता. किती सुंदर होता तो क्षण.. अजून काय पाहिजे होतं..ज्यांनी कॅमेरे आणलेले ते खूप प्रयत्न करत होते व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचे. पण जे डोळ्यांच्या लेन्स मध्ये capture होत होते, ते काही कॅमेऱ्यात येत नव्हते. शेवटी निसर्गानेही काही गोष्टी राखून ठेवल्यात. माझ्यासाठी ते दृश्य फक्त डोळ्यात साठवण्यासाठीचं होतं जणू. कारण मला त्यानंतर अजून परत fireflies trek करता आला नाही. ह्या वर्षी हे पुन्हा अनुभवण्यासाठी मी वेळ काढायचा असं ठरवलंय. तुम्हाला पण जमलं तर एकदा तरी नक्की हे अनुभवा.

‘Bluemoon’

Adventurous and exciting 2019 Event Schedule.Grab your seats fast...
09/01/2019

Adventurous and exciting 2019 Event Schedule.
Grab your seats fast...

Address

Girgaum
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Crazy Bugs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category