New addition friends
Hardware & Software BOYZ
Sale and Servicing of computer Hardware and software
p.c hardware and software solutions
World's engineering days
Welcome boys
Good night g**s
G.n friends
16/11/2013
हाताने लिहा आणि जीमेल करा
इमेल पाठवण्यासाठी अनेक पर्याय हल्ली उपलब्द झालेत. वाढलेल्या स्पर्धेमुळे मग वेगवेगळ्या थीम्स, मोठी स्टोरेज स्पेस अशा विवीध सोयी देऊन कंपन्यांनी युझर्सना आकर्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र प्रत्येक वेळा इमेल पाठवताना तो ‘टाईप’ करावा लागतो. मात्र आत्ता गूगल ने इमेल ‘लिहून’ पाठवण्याची सुविधा सुरु केली आहे.
वेगवेगळ्या भाषांमध्ये इमेल करण्याची सोय गूगलने काही वर्षपासून सुरु केली आहे. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर उजव्या हाताला असलेल्या सेटिंग्ज बटनावर क्लिक करून जनरल टॅबमध्ये ‘एनेबल इनपुट टूल्स’वर क्लीक केल्यावर येणार्या यादीतील शेकडो भाषांमध्ये हव्यात्या भाषा सिलेक्ट करा. त्या भाषेत तुम्ही मेल करू शकता.
त्यामध्ये उर्दुपासून, हिन्दीसंस्कुत, गुजराती, पंजाबी, यासारख्या वेगवेगळ्या भाषा आहेत. आत्तापर्यंत या भाषामध्ये मेल पाठवण्यासाठी तो त्या भाषेत टाईप करावा लागत होता. पण आत्ता ती गरज संपली आहे. गूगल ने ठराविक भाषांमध्ये मेल लिहून पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ‘एनेबल इनपुट टूल्स’वर क्लीक केल्यावर येणार्या भाषांच्या यादी मध्ये काही भाषांसमोर केवळ कि-बोर्डचे चिन्ह येते, तर काहीसमोर कि-बोर्डचे आणि पेन्सिल अशी दोन चिन्हे असतात. कि-बोर्डचे असलेला ओप्शेन अॅड़ केला तर संबंधित भाषेत टाईप करता येते आणि पेन्सिल असलेले ओप्शेन निवडला तर त्या भाषेत लिहता येते. सध्या या मध्ये इंग्रजी, देवनागरी, (हिन्दी) फ्रेंच, इटालियन, रोमन, रशिया, थाई या सारख्या काही भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
इमेल लिहण्यासाठी नेहमीप्रमाणे ‘कम्पोझ’ वर क्लिक केल्यावर जीमेलच्या स्क्रीन वर उजव्या बाजूला सेटिंग च्या बाजूला इनपुट टूल्सच्या टॅबमध्ये तुम्ही अॅङ केलेल्या सर्व भाषा दिसतील. उदा. हिन्दी मध्ये लिहण्यसाठी तुम्ही पेन्सिल असलेला ऑप्शन निवडला आहे तर इमेल करण्यापूर्वी इनपुट टूल्स मधून तो सिलेक्ट करा. त्या नंतर एक नोटीस बोर्ड ओपेन होईल. त्यावर माउस च्या सहायाने तुम्हाला हवा तो शब्द लिहा. त्या शब्दाचे पर्याय खाली दिसतील. त्यातून अपेक्षिक शब्द निवडून अॅङ केला कि तो इमेल मध्ये अॅङ होईल. त्यापूर्वी तो शब्द कुठे तुम्हाला अॅङ करायचा उदा. इमेल चा सब्जेक्ट किवा ते बॉडी टे सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला हवे टे शब्द लिहून मेलमध्ये अॅङ करून नेहमीप्रमाणे इमेल पाठउ शकता. गूगल डॉकमध्येही सुविधा उपलब्ध आहे.
08/11/2013
********कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स*********
@@@सर्वसामान्य शॉर्टकट्स@@@
CTRL+C : कॉपी
CTRL+X : कट
CTRL+V : पेस्ट
CTRL+Z : अनडू
DELETE : डिलिट
SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी
F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी
SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी
CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी
F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी
ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी
CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी
ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी
ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी
SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट
CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी
F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी
F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी
ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी
CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी
*****कि-बोर्ड वरील विंडोज बटणातील शॉर्टकट्स******
Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी
Windows Logo + BREAK : 'System Properties' सुरु करण्यासाठी
Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी
Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी
Windows Logo + E : 'My Computer' सुरु करण्यासाठी
Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी
Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी
Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी
Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी
Windows Logo + U : 'Utility Manager' सुरु करण्यासाठी
**********विंडोज एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स************
END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी
HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी
NUM LOCK + Asterisk sign (*) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी
NUM LOCK + Plus sign (+) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी
NUM LOCK + Minus sign (-) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी
LEFT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला उघडण्यासाठी
RIGHT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी
***********इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स**********
CTRL + B : 'Organize Favorites' चालू करण्यासाठी
CTRL + E : 'Search bar' चालू करण्यासाठी
CTRL + F : ' Find ' : शोधण्यासाठी
CTRL + H : ' History ' : आधी पाहीलेल्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी
CTRL + I : 'Favorites' आवडत्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी
CTRL + L : नविन वेबसाईट उघडण्यासाठी
CTRL + O : नविन वेबसाईट उघडण्यासाठी
CTRL + N : नविन पानामध्ये चालू असलेली वेबसाईट पून्हा उघडण्यासाठी
CTRL + P : प्रिंट करण्यासाठी
CTRL + R : ' Refresh ' : चालू वेबसाईटचे पान अद्ययावत ( रिफ्रेश ) करण्यासाठी
**********इतर वेगळी शॉर्टकट्स************
Right SHIFT आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी
Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
SHIFT सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
टिप : नक्कीच तुम्हाला वर सांगितलेल्या काही गोष्टी कळल्या नसतील, पण तुम्ही वापरुत तर बघा. बहूतेक तुमच्या उपयोगाच्या असू शकतात.
05/11/2013
*******अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर********
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरची मेमरी आणि कॉम्प्युटरमधिल संपूर्ण हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क यामध्ये व्हायरस शोधण्याचे काम करतो. या शोधण्यामध्ये त्याला व्हायरस सापडल्यास तो साफ (Clean), नष्ट (Delete), बंदिस्थ (Quarantine) करण्याची सुविधा अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये असते. सध्या बरेच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत तरीही त्यातील नॉर्टन (Norton) आणि मॅकॅफी (McAfee) हे दोन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
**********कॉम्प्युटर व्हायरस**********
व्हायरस म्हणजे विषाणू. ज्याप्रमाणे हानिकारक डासांद्वारे आपल्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रसार होवून एखादी व्यक्ती आजारी पडते त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये असलेल्या हानिकारक/अनावश्यक प्रोग्राममूळे कॉम्प्युटरमधिल व्यवस्थित चालणार्या प्रोग्राम्सना आणि कॉम्प्युटरच्या स्वतःच्या फाईली जाणूनबुजून खराब केल्या जातात. परिणामी चांगला चालणारा कॉम्प्युटर बिघडतो.
कॉम्प्युटर व्हायरस बनविणारी व्यक्ती नक्किच विकृत बुद्धिची असते, यात वाद नाही. कारण मुळात इतरांना त्रास देवून आनंदी होणारी व्यक्ती चांगली असूच शकत नाही.
सर्वच व्हायरस आपला कॉम्प्युटर बिघडवितात असे नाही. तर प्रत्येक व्हायरस हा तो बनविणार्या (विकृत बुद्धिच्या) प्रोग्रामरने सांगितलेल्या सुचनेप्रमाणे काम करतो. एकेकाळी व्हायरस म्हणजे कॉम्प्युटर बिघडविणारा प्रोग्राम असा समज होता. सध्याच्या काळातील व्हायरस हा निरनिराळ्या प्रकारे काम करतो. फक्त इतरांचे कॉम्प्युटर बिघडविणे या व्यतिरीक्त त्यांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरणे, एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करणे, क्रेडीट कार्डची माहिती शोधून ती पाठविणे, पासवर्ड शोधणे. इ. अशा प्रकारे इतरांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरुन तो व्हायरस बनविणारा प्रोग्रामर त्याचा काय उपयोग करीत असेल हे सांगण्याची गरज नाही.
कॉम्प्युटर व्हायरस हा तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागला जातो.
१. व्हायरस (Viruses)
२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses)
३. वर्म (Worms)
१. व्हायरस (Viruses) : म्हणजे एखाद्या प्रोग्रामरने बनविलेला असा एखादा छोटासा प्रोग्राम अथवा प्रोग्रामचा छोटासा भाग ज्याचा उद्देश दुसर्याच्या कॉम्प्युटरमधिल फाईली खराब करुन कॉम्प्युटरला बिघडविणे हा असतो.
२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरमधिल एखाद्या अथवा सर्वच सॉफ्टवेअर तसेच इतर ऍप्लिकेशन्सना इजा पोहचविणे या विध्वंसक उद्देशाने बनविला जातो.
३. वर्म (Worms) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरच्या मेमरीला इजा पोहचविण्याचे तसेच कॉम्प्युटरमधिल गोष्टींची/फाईलींची स्वतःहून अनावश्यक अनेक डुप्लीकेट फाईलींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने बनविला जातो.
सध्या प्रामुख्याने एखाद्या गोष्टीच्या (एखाद्य सोफ्टवेअरच्या, वेबसाईटच्या, वस्तुच्या, औषधाच्या) जाहिरातीसाठी या वरील तीन व्हायरसच्या प्रकारांचा उपयोग केला जातो.
**********अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर**********
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरची मेमरी आणि कॉम्प्युटरमधिल संपूर्ण हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क यामध्ये व्हायरस शोधण्याचे काम करतो. या शोधण्यामध्ये त्याला व्हायरस सापडल्यास तो साफ (Clean), नष्ट (Delete), बंदिस्थ (Quarantine) करण्याची सुविधा अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये असते. सध्या बरेच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत तरीही त्यातील नॉर्टन (Norton) आणि मॅकॅफी (McAfee) हे दोन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
*****अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काम कसे करते ?*****
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल सर्व फाईल्समधिल प्रोग्राम चाळून त्यामध्ये इतर फाईलींना खराब करणारा अथवा आपणहून इतर फाईलींमध्ये शिरणारा प्रोग्राम असल्याची सुचना असलेल्या फाईली शोधण्याचे काम करते. एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शोधण्याच्या प्रकारामध्ये दोन विभाग पडतात. १) तंतोतंत नावाने शोध २) व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध. या दोन प्रकारातील व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध हा प्रकार जास्त प्रभावशाली असतो कारण मुळात एखाद्या फाईलचे नाव आणि स्वरुप काहीही असो त्यातील प्रोग्राममधिल कृती व्हायरसप्रमाणे आहे का या गोष्टीचा शोध या प्रकारामध्ये घेतला जातो.
एखादे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्यात कितीही कार्यक्षम आणि प्रभावी असले तरी व्हायरस बनविणारे देखिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा अभ्यास करत असतात आणि कुठल्याही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येणार नाही नविन वेगळा आणि
05/11/2013
फोटो ट्रान्सफर एका टचवर
मोबाईलवरून होणारे शेअरिंग हे केवळ आता केवळ मेसेजेसपुरते मर्यादित राहिलेले नाही. गाणी, विडीओस, फोटो हेसुद्धा या शेअरिंगचे महत्वाचे घटक आहेत. अत्तापर्यंत फोटो तसेच विडीओस शेअर करण्यासाठी Blue-tooth, mms, infrad, wi-fi. इत्यादींचा वापर करावा लागायचा. पण मोबाईल क्षेत्रामध्ये सातत्याने आणि झपाट्याने होणार्या सन्शोधणामुळे आत्ता याहून वेगवान पर्याय आत्ता उपलब्ध झाला आहे. नव्या सन्शोधनानुसार आत्ता एका स्मार्ट फोने वरील फोटो किवा विडीओस एका स्पर्शाद्वारे दुसर्या मोबईलवर ट्रान्स्फर होऊ शकतात.
फिनलंडनमधील V.T.T. टेक्निकल रिसर्च सेंटर मधील शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या या नव्या तन्त्रज्ञानमध्ये युजर इंटरफेस म्हणून ‘रिंग’, ‘व्रीस्ट ब्यंड’, इत्यादींचा वापर करता येऊ शकतो व त्याआधारे केवळ एका टचच्या मदतीने एका फोनवरील फोटो व विडीओस दुसर्या फोने वर ट्रान्स्फर होऊ शकतात. उदा. एखाद्या व्यक्तीने ती रिंग घालून एका मोबईलच्या स्क्रीनवरील फाइल टच करून नंतर ती रिंग तसीच ठेउन दुसर्या मोबईल अथवा टेब्लेट स्क्रीनला टच केल्यास सन्भधित फाईल ट्रान्स्फर होऊ शकतील.
30/10/2013
आपके पेन ड्राइव को भी आप पासवर्ड सेट कर सकते है!
this is only windows 7
step
*attech u r pen drive
*click on start button
*select control panel
*go on BitLocker Drive Encryption
*select your pen drive
*Turn On BitLocker
*tick mark on use a password to unlock the drive
*type your password two times
*select save the recovery key to a file
*select your path and save
*next
started the encryption
after the complited, remove your pen drive
and attech ones again.
pen drive asked your password
30/10/2013
कॉम्प्युटरमध्ये आपल्या सर्व फाईल्स निरनिराळ्या फोल्डर्समध्ये ठेवलेल्या असतात. तसेच आपल्या फाईल्स व्यवस्थित रहाव्यात व लवकर मिळाव्यात म्हणून आपण त्या निरनिराळ्या फोल्डर्समध्ये आणि कॉम्प्युटरमधल्या निरनिराळ्या ड्राईव्ह मध्ये ठेवतो. उदा. (C:) , (D:) , (E:) इ.
मग एखादी फाईल आपणास उघडायची असल्यास आपण ती फाईल जेथे ठेवलेली असेल तेथे जावून त्यावर डबल क्लिक ( Double Click ) करुन ती फाईल उघडतो. बर्याच वेळा आपणास हवी असलेली आवश्यक फाईल आपण कुठे ठेवली आहे ते आठवत नाही आणि शोधण्यात विनाकारण वेळ वाया जातो. हा वेळ वाचविण्यासाठी त्या फाईलची शॉर्टकट जर डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) ठेवली तर नेहमी ती फाईल उघडण्यासाठी शोधाशोध करण्यापेक्षा त्या शॉर्टकटवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास ती फाईल लगेच सापडेल व उघडली जाईल.
शॉर्टकट करण्यासाठी खालिल क्रिया करा.
१ ) आपणास ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीथे जा.
२) ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीला माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करा.
३) आता बाजूला येणार्या चौकोनातील ' Send To ' विभागातील ' Desktop (create shortcut) ' वर क्लिक करा.
४) असे केल्याने डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) त्या फाईलची शॉर्टकट बनेल.
तसेच
५ ) त्याच चौकोनातील ' Create Shortcut ' वर क्लिक केल्यास त्या फाईलची शॉर्टकट तिथेच तयार होईल मग ती शॉर्टकटची फाईल तूम्ही जीथे न्याल तेथून ती मूळ फाईल उघडता येईल.
टिप : लक्ष्यात असू द्या की शॉर्टकटची फाईल ही खरंतर मुख्य फाईल उघडण्याची सोय असते, या शॉर्टकट फाईलवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास मुख्य फाईल उघडते. तुम्ही फाईलमध्ये केलेले सर्व बदल मुख्य फाईल होतात, म्हणून जर एखाद्याला/दुसरीकडे जर ही फाईल द्यायची असेल तर शॉर्टकट फाईल देवू नका, त्यांच्याकडे ती उघडणार नाही. कारण तुम्ही केलेली शॉर्टकट फाईल ही फक्त शॉर्टकट बनविलेल्याच कॉम्प्युटरवरच चालेल.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
LALBAUG
Mumbai
400033