Mumbai Port Trust Dock & General Employees Union

Mumbai Port Trust Dock & General Employees Union To strengthen among all sections of the working class,including rural workers.a sense of Patriotism.

कामगाराचा त्याच्या उद्योगाशी कामगार म्हणून संबंध येतो , कामगार संघटनेशी,सभासद म्हणून व समाजाचा घटक म्हणून तसेच कुटुंबाशी कुटुंब प्रमुख म्हणून किंवा सदस्य म्हणून तर नागरिक या नात्याने राष्ट्राशी संबंध येतो. ह्या सर्व क्षेत्रात वावरत असताना आणि व्यवहार करताना त्याला अनेकविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते. कामगारांना विविध स्वरूपाच्या प्रश्नांची जाणीव करून देऊन,ते सोडविण्यास समर्थ करणे व जीवनात यशस्वी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे म्हणजेच "कामगार शिक्षण" होय.

26/08/2024

गोदी कामगार संपाच्या वातावरण निर्मितीसाठी मुंबई बंदरात २६ ऑगस्ट २०२४ रोजी दिवसभर यंत्रभवन, हमालेज बिल्डींग, हेड ऑफिस, आंबेडकर भवन, एबीबीपी बिल्डिंग, ओ. एस. सी., सी. ओ. एस. जवाहर द्वीप, इंदिरा गोदी इत्यादी विविध खात्यातून गेट मिटिंग घेऊन संध्याकाळी ५ वाजता कामगार सदन येथील युनियन ऑफिसमध्ये संपाच्या तयारीसाठी आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के.शेट्ये साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये घोषणा देत एकमुखी आवाज २८ ऑगस्टपासून गोदी कामगारांचा बेमुदत संप..संप... संप.... सन्माननीय तडजोड झाल्याशिवाय आता माघार नाही. कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा विविध प्रकारच्या घोषणा कामगार कार्यकर्त्यांनी दिल्या. संप १०० टक्के यशस्वी होणार आहे. तरी गोदी कामगार व सेवानिवृत्त कामगारांनी संपात सहभागी व्हावे. शेवटी कामगारांचाच विजय होईल.

16/08/2024

*पोर्ट अँड डॉक एम्प्लॉईज पेन्शनर्स असोसिएशन (नियोजित)*
दिनांक ९ ऑगस्ट २०२४
- नोटीस -
*प्रथम सर्वसाधारण सभा*

वरील नियोजित संस्थेची प्रथम सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता कामगार सदन, नवाब टँक रोड, माझगाव, मुंबई -१० येथे आयोजित केली आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेले सर्व कामगार या संस्थेचे सदस्य होऊ शकतात. काही सेवानिवृत्त कामगार या नियोजित संस्थेचे सदस्य झालेले आहेत. ही सभा युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
सभेपुढील विषय
१) संस्थेचे नाव व नियमावली ठरविणे.
२) संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता ठरविणे.
३) संस्थेची नोंदणी करणेबाबत.
४) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या ठरविणे व त्यांची निवड करणे.
५) संस्थेच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी व खजिनदार यांच्या नावे खाते उघडणे.
६) संस्थेचे कार्यक्षेत्र ठरविणे.
७) अध्यक्षांचे परवानगीने येणारे इतर विषय.
८)आभार.
सुधाकर अपराज,
जनरल सेक्रेटरी,
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

16/08/2024
13/08/2024

Major port workers prepare for nationwide strike over pay disputes, demanding fair wage revision and settlement process.

12/08/2024
*भारत सरकारतर्फे प्रदीप नलावडे यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती* -----------------------------...
06/08/2024

*भारत सरकारतर्फे प्रदीप नलावडे यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती*
------------------------------
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधीक्षक व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप भगवंतराव नलावडे यांची यूनियनच्या शिफारशीनुसार भारत सरकारने मुंबई पोर्ट प्राधिकरणावर बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे यांच्या सेवानिवृत्तीनंतर गोदाम अधीक्षक श्री. प्रदीप नलावडे यांची युनियनच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ताबडतोब नियुक्ती केली आहे.
प्रदीप नलावडे युनियनचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते असून, गोदी विभागातील पूजा समितीचे पदाधिकारी आहेत.वनवासी कल्याण आश्रम व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य चालू असते.
प्रदीप नलावडे यांचे युनियनचे सर्व पदाधिकारी, कमिटी मेंबर, सदस्य तसेच सर्व गोदी कामगारांतर्फे हार्दिक अभिनंदन!

आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

08/05/2024

भारतातील प्रमुख बंदर व मुंबई बंदरातील सर्वात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या २५ एप्रिल २०२४ रोजी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. सभागृहाने ठराव करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांना उर्वरित पदांसाठी कार्यकारिणी निवडीचेअधिकार दिले होते. त्याप्रमाणे ६ मे २०२४ रोजी निवडलेली कार्यकारिणी २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे .

*नवीन कार्यकारिणी*

अध्यक्ष - एस. के. शेट्ये
कार्याध्यक्ष - डॉ. यतीन पटेल
जनरल सेक्रेटरी - सुधाकर अपराज

उपाध्यक्ष - अहमदअली काझी
- शीला भगत
- विष्णू पोळ
- प्रदीप नलावडे
- रमेश कुऱ्हाडे

सेक्रेटरी - विद्याधर राणे
- दत्तात्रय खेसे
- विजय रणदिवे
- मनीष पाटील

खजिनदार - विकास नलावडे

संघटक सचिव - मिर निसार युनूस
- संदीप चेरफळे
- प्रवीण काळे
- संतोष कदम
- अनंत भोसले

प्रसिद्धी प्रमुख - मारुती विश्वासराव

Address

KAMGAR SADAN , Nawab Tank Road, Mazgaon, Near Dockyard Raiway Station
Mumbai

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm

Telephone

66566487 23776320

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Port Trust Dock & General Employees Union posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category