25/07/2026
🌺🙏 आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम 🙏🌺
आज दिनांक २५ जुलै २०२६ रोजी शिवाजीनगर मनपा मराठी शाळा क्र. २ येथे आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा, दिंडी सोहळा, विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा, अभंग व भक्तिगीते यामधून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय झाले.
या सुंदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 🌿🙏