Kumud Vidya Mandir, Deonar

Kumud Vidya Mandir, Deonar Founded on 9th June 1968 Mr C H Garge(Principal)

Well known educational institute popular for excellent administration and trustworthy for educational progress of students.The school is known for its well qualified staff and its strive for the comprehensive development of students.

27/02/2024
07/11/2023

भावपूर्ण श्रद्धांजली
कुमुद विद्यामंदिर या आपल्या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री.आर. एन.पाटील सर यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना .

गुरुवार.  दि.8/12/2022           💐💐    *दु:खद निधन* 💐💐    कुमुद मेमोरिअल फंड (रजि.) या आपल्या संस्थेचे अध्यक्ष व सर्व कौ...
08/12/2022

गुरुवार. दि.8/12/2022
💐💐 *दु:खद निधन* 💐💐
कुमुद मेमोरिअल फंड (रजि.) या आपल्या संस्थेचे अध्यक्ष व सर्व कौमुदी परिवाराचे आधारस्तंभ ,महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ञ व विद्यार्थी प्रिय शिक्षक *आदरणीय शरद नारायण पाटील सर* यांचे आज गुरूवार दि.8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी अल्पशा आजाराने *दु:खद निधन* झाले.
*ऊद्या शुक्रवार दि.9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता* कुमुद विद्यामंदिर मराठी माध्यम, देवनार गाव या शाळेतील कुमुद मेमोरिअल फंड या संस्थेच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल 🙏🙏.
एका महान पर्वाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
विश्वस्त
कुमुद मेमोरिअल फंड ( रजि.)
देवनार

आदरणीय पाटील सरांचे दुःखद निधन..भावपूर्ण श्रद्धांजली..🙏💐
08/12/2022

आदरणीय पाटील सरांचे दुःखद निधन..
भावपूर्ण श्रद्धांजली..🙏💐

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ...
23/07/2021

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻

माझी शाळा ।।
02/03/2020

माझी शाळा ।।

सर्वोत्कृष्ठ शाळा
09/12/2019

सर्वोत्कृष्ठ शाळा

07/12/2019

एम ( पूर्व ) वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनात
*कुमुद विद्यामंदिर (मराठी माध्यम)चा*
*'सर्वोत्कृष्ट शाळा' म्हणून गौरव*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग यांच्या वतीने संपन्न झालेल्या 'एम'(पूर्व) वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शन व सहशालेय उपक्रम स्पर्धेत कुमुद विद्यामंदिर ( मराठी माध्यम)च्या विद्यार्थ्यांनी *सर्वाधिक १४ पारितोषिके पटकावली असून या वर्षी शाळेस सर्वोत्कृष्ट शाळा* पुरस्काराने शिक्षण उपनिरीक्षक (एम पूर्व) माननीय श्री. प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

*वार्डस्तरीय सहशालेय उपक्रम स्पर्धेत*
*सर्वाधिक ९ पारितोषिके*
(समूहगीत, वाद्यवादन, चित्रकला, वक्तृत्व, लेझीम, लोकनृत्य, निबंध स्पर्धा)

प्रथम क्रमांक -४पारितोषिके
द्वितीय क्रमांक -२पारितोषिके
तृतीय क्रमांक -३पारितोषिके

*_एम (पूर्व)वार्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनांतर्गत स्पर्धा_*
*_सर्वाधिक ५ पारितोषिके_*

विज्ञान प्रकल्प (मोठा गट) - द्वितीय क्रमांक - मार्गदर्शक श्री सोनवणे सर.

शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य -
( लहान गट)- तृतीय क्रमांक - श्रीमती शिल्पा धनावडे मॅडम. व
( मोठा गट) -द्वितीय क्रमांक - - श्रीमती कविता पाटील मॅडम.

लोकसंख्या शिक्षण (मोठा गट) - प्रथम क्रमांक‌ - श्री सुनील साळवे सर.

निसर्ग मंडळ - तृतीय क्रमांक - श्रीमती सुनीता बडदडे मॅडम.

शाळेच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे संस्थेचे संस्थापक विश्वस्त आदरणीय श्री शरद पाटील सर व सौ.मीना पाटील मॅडम, इतर विश्वस्त श्री विलास कांबळे सर ,श्री महादेव कोळी सर ,श्रीमती पंडित मॅडम ,श्री भोईर सर यांनी विशेष कौतुक केले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

मा. मुख्याध्यापिका श्रीमती वंदना उतखेडे मॅडम यांच्या मिळालेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे व त्यांनी केलेल्या वार्षिक नियोजनामुळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या टीमवर्कमुळे शाळेला हे उज्ज्वल यश संपादन करता आले.
एम पूर्व विभागाचे *शिक्षण उपनिरीक्षक माननीय श्री. प्रकाश पाटील साहेब यांनी* शाळेच्या उज्ज्वल यशाचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
From :- उपमुख्याध्यापक - श्री विजयकुमार दिंडे सर व पर्यवेक्षिका - अनुराधा बेडसे मॅडम.
💐💐💐👏👏👏🌹

18/06/2017

शाळेचा पहिला दिवस 😊

कोण कोण या ब्याचचे आहेत?
16/01/2017

कोण कोण या ब्याचचे आहेत?

24/07/2014

परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला.. शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला... "ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन... वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन... गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान... "खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं" "ओळखल्यास का बघ ह्या, माझ्यावरच्या रेघा... भांडण करुन मिळवलेली, दोन बोट जागा... अजुनही भेटतात का रे, पक्या, मन्या, बंटी...? टाळ्या देत करत असालं, मनमोकळ्या गोष्टी... डबा रोज खाता का रे, एकमेकांचा चोरुन? निसरड्या वाटा चालता का, हाती हात धरुन..? टचकन् डोळ्यात पाणी आलं, कंठ आला भरुन... मित्र सुटले, भेटी सरल्या, सोबत गेली सरुन... धावता धावता सुखामागे, वळुन जेंव्हा पाह्यलं... एकटाचं पुढे आलो मी, आयुष्य मागे राह्यलं... त्राण गेलं, आवेश संपला, करावं तरी काय..? कोरड पडली घशाला, थरथरले तरणे पाय... तेव्हढ्यात आला शेजारी, अन् घेतलं मला कुशीत... बस म्हणाला क्षणभर जवळ, नक्की येशील खुशीत... "अरे वेड्या पैश्यापाठी, फिरतोस वणवण... कधी तरी थांबुन बघ, फिरवं मागे मन..." मित्र सगळे जमवं पुन्हा, जेव्हा येईल वीट... वंगण लागतं रे चाकांना, मग गाडी चालते नीट... शाळेतल्या त्या सोबत्याचा, खुप आधार वाटला...परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला...

Address

Deonar
Mumbai
400088

Opening Hours

Monday 5am - 8pm
Tuesday 5am - 8pm
Wednesday 5am - 8pm
Thursday 5am - 8pm
Friday 5am - 8pm
Saturday 5am - 8pm
Sunday 7am - 2pm

Telephone

+912225565651

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kumud Vidya Mandir, Deonar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category