Dnyansagar Vidyalaya

Dnyansagar Vidyalaya

Share

school जोगेश्वरी पश्चिम विभागातील एकमेव मराठी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा म्हणून सुरुवात झालेली. आता त्याचा विस्तार सेमी-इंग्रजी माध्यमापर्यंत झाला आहे.

Operating as usual

12/10/2024
10/10/2024

एक अनमोल 'रतन' हरवले...
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 02/10/2024

महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त केलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत काही क्षणचित्रे.

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 05/09/2024

शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे

05/09/2024

शिक्षक दिनानिमित्त सर्व ज्ञात-अज्ञात गुरुवर्यांना विनयपूर्वक अभिवादन !

कुंभारासारिखा गुरु
नाही रे जगात |
वर घालितो धपाटे,
आत आधाराला हात ॥धृ॥

आधी तुडवी तुडवी,
मग हातें कुरवाळी |
ओल्या मातीच्या गोळ्याला
येते रूपाची नव्हाळी |
घडे जाती थोराघरी
घट जाती राउळांत ॥१॥
कुंभारासारिखा........

कुणी पूजेचा कलश,
कुणी गोरसाचा माठ |
हात धरितां गुरूने
ज्याची त्याला लाभे वाट |
शिष्य पावतो प्रतिष्ठा,
गुरु राहतो अज्ञात ॥२॥
कुंभारासारिखा........

- ग.दि.मा.

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे.

21/08/2024

शिक्षणाचं महत्त्व

प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. हे आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. संपूर्ण शिक्षण प्रणाली प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना आपल्या सर्वांना पहायचे आहे, जे केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे.

प्रत्येकासाठी जीवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जीवनातील कठीण काळात आव्हानांचा सामना करण्यास मदत करते.उच्च स्तरावरील शिक्षणामुळे लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि वेगळी ओळख मिळण्यास मदत होते.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. सध्याच्या काळात संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदलली आहे. आता आपण बारावीनंतर दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाद्वारे नोकरीसोबतच अभ्यास करू शकतो. शिक्षण फार महाग नाही, कोणीही थोडे पैसे असूनही शिक्षण चालू ठेवू शकतो. दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपण कोणत्याही मोठ्या आणि प्रसिद्ध विद्यापीठात अगदी कमी फीमध्ये सहज प्रवेश घेऊ शकतो. इतर लहान संस्था देखील विशिष्ट क्षेत्रातील कौशल्यांना चालना देण्यासाठी शिक्षण देत आहेत.

शिक्षण स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तितकेच आवश्यक आहे, उज्वल भविष्यासाठी आवश्यक साधन असण्यासोबतच देशाच्या विकासात आणि प्रगतीतही ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. अशाप्रकारे योग्य शिक्षण दोघांचे उज्ज्वल भविष्य घडवते. सुशिक्षित नेतेच राष्ट्र घडवतात आणि त्याला यश आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात.चांगले शिक्षण जीवनात अनेक उद्देश पूर्ण करते जसे; वैयक्तिक उन्नती, सामाजिक स्थिती वाढवणे, सामाजिक आरोग्य सुधारणे, आर्थिक प्रगती, राष्ट्राचे यश, जीवनातील ध्येय निश्चित करणे, सामाजिक समस्यांची जाणीव करून देणे आणि पर्यावरणीय समस्या आणि इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपाय प्रदान करते.

ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती कोणी चोरू शकत नाही आणि कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. ही एकमेव संपत्ती आहे जी वाटली तरी कमी होत नाही, उलट वाढतच जाते. आपल्या समाजातील सुशिक्षितांना वेगळा मान असतो आणि लोकही त्यांचा आदर करतात हे आपण पाहिलेच असेल. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपण साक्षर व्हावे, प्रशिक्षित व्हावे असे वाटते, म्हणूनच आजच्या काळात आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती कोणी चोरू शकत नाही आणि कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. ही एकमेव संपत्ती आहे जी वाटली तरी कमी होत नाही, उलट वाढतच जाते. आपल्या समाजातील सुशिक्षितांना वेगळा मान असतो आणि लोकही त्यांचा आदर करतात हे आपण पाहिलेच असेल. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपण साक्षर व्हावे, प्रशिक्षित व्हावे असे वाटते, म्हणूनच आजच्या काळात आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.

शिक्षण हे सकारात्मक विचार आणून लोकांच्या विचारात बदल घडवून आणते आणि नकारात्मक विचार दूर करते. आपल्या बालपणात आपल्या मनाला शिक्षणाकडे नेण्यात आपले पालक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आम्हाला नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये दाखल करून चांगले शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. हे आम्हाला तांत्रिक आणि अत्यंत कुशल ज्ञान देते तसेच जगभरात आमच्या कल्पना विकसित करण्याची क्षमता देते. शिक्षण आपल्याला अधिक सुसंस्कृत आणि चांगले शिक्षित बनवते. हे आपल्याला समाजात एक चांगले स्थान आणि नोकरीमध्ये अपेक्षित स्थान प्राप्त करण्यास मदत करते.

हे आपल्याला चांगले डॉक्टर, अभियंता, पायलट, शिक्षक इत्यादी बनण्यास सक्षम करते जे आपल्याला जीवनात बनायचे आहे. नियमित आणि योग्य शिक्षण आपल्याला जीवनाचे ध्येय बनवून यशाकडे घेऊन जाते. पूर्वीच्या काळातील शिक्षणपद्धती आजच्या तुलनेत खूपच कठीण होती. सर्व जातींना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण मिळू शकले नाही. भरमसाठ फी असल्याने प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळणेही अवघड होते. पण आता दूरशिक्षणातून शिक्षण घेऊन पुढे जाणे खूप सोपे आणि सोपे झाले आहे.

शिक्षण कोणत्याही मोठ्या कौटुंबिक, सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्याची क्षमता प्रदान करते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व आपल्यापैकी कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. शिक्षणाचे आपले आयुष्य घडवण्यासाठी खूप महत्त्व आहे. शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवते.

19/08/2024

१० वी/१२ वी नंतर कुठल्या मार्गाने जायचे त्यासाठी उत्तम चार्ट आहे.
आपल्या घरातील/ओळखीतील शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा.

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 15/08/2024

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे

15/08/2024

सर्व देशबांधवांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

02/08/2024

मित्र आणि मैत्रिणींनो, ऑगस्ट महिना आलेला आहे. दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा होतो.

आपल्या चालू आयुष्यात आपले बरेच जण मित्र मैत्रिणीच्या यादीत असले तरी, शाळेतली मैत्री जरा खासच असते कि नाही...

बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या प्रवासात खूप मित्र मैत्रिणी जमतात तर कुणी एक खास शेवटपर्यंत राहतो. शाळा संपल्यानंतरही मैत्री संपत नाही.

पण या प्रवासात काही मित्र दुरावतातही. आईवडिलांच्या नोकरीमुळे, घर-शाळा बदलल्यामुळे काही जण दूर झालेले असतात. त्यांचा संपर्क तुटतो.

चला तर मग या फ्रेंडशिप डे दिवशी आपल्या जुन्या, पहिल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या नावे हा दिवस साजरा करूया.

21/07/2024

सर्व शिक्षकरुपी गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार 🙏

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 20/07/2024

गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे
२०२३

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 17/07/2024

आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 15/07/2024

सर्व आजी माजी विद्यार्थ्यांकडून सौ. चव्हाण मॅडमना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎉🎊

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 29/06/2024

आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ. चव्हाण मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत.

आजी-माजी, प्रत्येक विद्यार्थ्याची चव्हाण मॅडमशी निगडित एक तरी आठवण असेलच. गुरुपौर्णिमेला गुरु मानून नुसतं वंदनच नाही तर खरोखरच वंदनीय असणाऱ्या चव्हाण मॅडम.

त्या आपल्या शाळेत मागच्या तीस वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यात आपले पूर्ण आयुष्य खर्ची केले. शिक्षकी पेशात त्या नेहमीच प्रामाणिक, जबाबदार, आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि आपण सर्वच नेहमी मानतो की त्या एक कर्तृत्ववान, उदार, विनम्र आणि मुक्त मनाच्या शिक्षिका आहेत.
चव्हाण मॅडमनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली आहे. किंबहुना काही विद्यार्थ्यांसाठी त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या त्यांच्या आईसुद्धा होत्या.

आज त्यांच्या निवृत्तीनिमित्त आनंदही होत आहे कि आता एका जबाबदारीतून मुक्त होत आहेत पण दुःख ही आहे कि आता शाळेत गेल्यावर हव्या तेव्हा त्या समोर दिसणार नाहीत. पण खात्री आहे कि एक आवाज दिला कि त्या लगेच आपल्या विद्यार्थ्यांसाठी हजर होतील.

संपूर्ण ज्ञानसागर विद्यालय कुटुंब, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आजी माजी विद्यार्थी सर्वांकडून पुढील जीवनास खूप खूप शुभेच्छा!!

15/06/2024

नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

13/06/2024

सस्नेह निमंत्रण 🙏

31/05/2024

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
🌹🌹 *सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा*🌹🌹
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आ.श्री.संजय सं. मोरे सर

आपण अत्यंत गरीबीच्या व कठीण परिस्थितीतून मार्ग काढत बी.एस.सी बी.एड. चे शिक्षण पूर्ण केलेत आणि आपली एकूण ३३ वर्षे ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय,बेहराम बाग,गणेश नगर, जोगेश्वरी (प) या शाळेला देऊन , या शाळेतून प्रदिर्घ सेवेनंतर अभिमानाने, सफलतापूर्ण, गौरवपूर्ण, निष्कलंक सेवा देऊन , गोरगरिबांच्या मुलामुलींना विज्ञानासारखा कठीण विषय सोपा करून शिकवला. असे ज्ञान दानाचे पवित्र कार्य करून, अनेक विद्यार्थी घडवून, त्यांना भविष्याची नवनवीन दालने दाखविलीत,विज्ञान प्रदर्शनात नानाविध पक्षिसे, पुरस्कार प्राप्त केलेत🌹
काही काळ मुख्याध्यापक🌹 पदही भुषविले आम्हाला आमचे आतेभाऊ म्हणून आपला सार्थ अभिमान वाटतो.
नियतवयोमानानुसार व शासन निर्णयानुसार आपण आज दि.३१-मे-२०२४ ला सेवानिृवृत्त होत आहात. शिक्षणक्षेत्रातील आपले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. आपण मितभाषी,विनम्र,हजरजबाबी, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध, निष्कलंक, विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे कार्य पार पाडलेत.
आपण आज जरी नियमानुसार निवृत्त झालेला असलात,तरी आपण मनाने/शरीराने निवृत्त झालेले नाहीत याची मला खात्री आहे. आपणास पुढील आयुष्य सुखाचे,समृध्दिचे,भरभराटीचे व आरोग्यदायी जावो, आपणास उदंड आयुष्य लाभो ,अशी माता बिजासनी मातेच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या हातून यापुढेही असेच शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्य घडो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. आपणांस माझ्याकडून व समस्त खोंडे परिवार (रिंगणगाव) यांचेकडून,सेवानिवृत्तीच्या कोटी,कोटी शुभेच्छा.*
*Be happy, Be healthy, Be strong, Be enthusiastic*. 🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🪷 *शुभेच्छुक - सौ.सुहासिनी @ श्री.रवींद्र खोंडे (डोंबिवली) आणि समस्त खोंडे परीवार (रिंगणगाव)*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

27/04/2024

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वार्षिक निकाल
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🎊🎉💐

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 16/03/2024

वार्षिक बक्षीस समारंभ

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 08/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला शिक्षक वर्गाला खूप खूप शुभेच्छा🎉💐💐

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 31/01/2024

नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन 🎊🎉

Photos from Dnyansagar Vidyalaya's post 05/09/2021
Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

फोटो/विडिओ चॅलेंज निमित्त आलेला एकमेव विडिओ. *अभिनंदन दहावी २००० अ बॅच*सहभागी:Aparna Govekar-Malgaonkar Ashwini Mohite प...
काय करायचंय??* पाच किंवा अधिक जणांचा एकत्र ग्रुप फोटो अथवा ३० ते ६० सेकंदाचा विडिओ इनबॉक्स मध्ये पाठवायचा आहे.* भारताचा ...
आज शुक्रवार दिनांक २३/६/२३ रोजी दुपारी १.०० वाजता पहा महाराष्ट्राची किचन क्वीन झी मराठी वर व शनिवार २४/६/२३ रोजी दुपारी ...
मातोश्रीवर पारंपारीक वेशभूषासौ. कासकर मॅडम
Happy Ganesh Chaturthi.....

Location

Category

Website

Address


Ganesh Nagar Behram Baug. Jogeshwari (W)
Mumbai
400102
Other Schools in Mumbai (show all)
Bal Bharati Bal Bharati
Swami Vivekanand Marg, Kandivali West
Mumbai, 400067

BalBharati is a prominent educational​ institution of Mumbai, India. Primarily a children and yout

REDO.aaa REDO.aaa
Prabhadevi
Mumbai

The Official Rachana Sansad Applied Art Alumni Network!www.redodotaaa.wordpress.com

American School of Bombay American School of Bombay
American School Of Bombay, SF2, G Block, BKC
Mumbai, 400098

We inspire all of our students to continuous inquiry, empowering them with the skills, courage, optimism, and integrity to pursue their dreams and enhance the lives of others.

Our system will automatically block page, You can see it issues. Our system will automatically block page, You can see it issues.
MG Road Behind New India Bank, Goregaon West
Mumbai, 400104

Jawahar Vidyalaya High School

I Hate St.Andrews College Bandra I Hate St.Andrews College Bandra
St. Dominic Road
Mumbai, 400050

The Official Page for St.Andrew's College Haters

Matushri Kashiben Vrajlal Valia International Vidyalaya Matushri Kashiben Vrajlal Valia International Vidyalaya
Sheth MK Complex, Factory Lane, Borivali West
Mumbai, 400092

This page is for all the current and ex-students of MKVVIV(formerly known as BES International Vidyalaya)

NAFDI School of Fashion Design NAFDI School of Fashion Design
NAFDI/SSD, CPG, Shantivan Road, Oshiwara, Andheri West
Mumbai, 400053

Make a statement with NAFDI's innovative fashion design program Let's shape the future of style together. Master, Bachelor & Diploma courses.

A***n High School, Girgaon A***n High School, Girgaon
75 Jagannath Shankarsheth Road, Girgaum
Mumbai, 400004

This page is specially meant for the people who were a part of A***n. Here they can share their points of view,regarding the school days,their experiences during school days...etc....enjoy the re-union....

St. blaise high school St. blaise high school
Mumbai, 400058

Sujaya Foundation Sujaya Foundation
401 Lotus House, New Marine Lines
Mumbai, 400020

We give underprivileged and differently abled children and youth an opportunity to launch them into the dignified and bright future they deserve.

IPSC & Indian Top Schools Alumni - IITSA IPSC & Indian Top Schools Alumni - IITSA
Mumbai

IPSC & Indian Top Schools Alumni, includes Alumni from Daly College, Mayo College, Doon School, Raj Kumar College, Scindia School, Lawrence School, Birla Public School, DPS RK Puram, The Mann School, PPS Nabha, Military Schools and Sainik Schools

Mallika Purohit Makeup & Hair Academy Mallika Purohit Makeup & Hair Academy
Thakur Complex, Kandivali East
Mumbai, 400101

Turn your passion for Makeup into your profession.