https://whatsapp.com/channel/0029Vag8kr3JUM2ULyVrgs3P
ही शाळेच्या व्हाट्सअप चैनल ची लिंक आहे follow Channel
Shree Madhavrao Bhagwat High School Marathi Medium
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Madhavrao Bhagwat High School Marathi Medium, High School, 'Mangalayatan', Paranjpe B Scheme, Hanuman Road, Vileparle East, Mumbai.
With the transcending vision of 'अग्रतः पथि सदैव गम्यताम् 'corridors filled with innocent and joyous laughter our school has been nurturing students for the past 60 years.
27/07/2024
दि.-27/07/24
शिक्षा सप्ताह दिवस सहावा
उपक्रम-Eco club for mission life day
शाळा-श्री माधवराव भागवत हायस्कूल,विलेपार्ले (म.मा)
उपक्रमाविषयी थोडक्यात-
राष्ट्रीय शिक्षा धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक 22 ते २८ जुलै 2024 या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करण्या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार या कालावधीत आमच्या शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. आजच्या सहाव्या दिवशी "श्री माधवराव भागवत हायस्कूल विलेपार्ले (मराठी माध्यम)" या ठिकाणी शाळेच्या मैदानामध्ये पर्यावरण मंडळाचे सभासद विद्यार्थी, त्यांच्या माता आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. ज्या माता ने वृक्षारोपण केले आहे त्या मातांची नावे झाडांना देण्यात आलेली आहेत.त्याचप्रमाणे त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्या माता आणि त्यांची मुले यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. साधारणपणे दहा झाडांची लागवड यावेळी करण्यात आली त्याचप्रमाणे पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी पर्यावरण मंडळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करतेवेळी पर्यावरण मंडळाच्या प्रमुख श्रीमती निशा वायंणकर आणि श्री सूर्यकांत माळी हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनाही आपापल्या घरी एक झाड लावण्यास सांगण्यात आले. झाड फक्त लावून चालणार नाही तर त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी सुद्धा घेण्याच्या सूचना देण्यात आली. यावेळी पर्यावरण मंडळातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संबंधातील स्लोगन्स मोठ्या आवाजात बोलून पर्यावरण जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धन्यवाद!!
श्री सूर्यकांत माळी
Mrs.Nisha wayangankar
सहा.शिक्षक
26/07/2024
*शिक्षण सप्ताह— कौशल्य दिवस*
*दिनांक — 26 जुलै 2024*
*वार — शुक्रवार*
*गट — सहावी ते दहावी*
*उपक्रम — शिक्षणात कौशल्य दिवस*
*शाळा — श्री माधवराव भागवत हायस्कूल (मराठी माध्यम)*
*स्थळ — विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७.*
*प्रास्ताविक* — राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत *शिक्षण सप्ताह* साजरा करण्यासंदर्भात *केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने* निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार हा कालावधी शिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शिक्षण खात्याने ठरवले आहे.
श्री माधवराव भागवत हायस्कूल (मराठी माध्यम) या शाळेत आज *शिक्षणात कौशल्य दिवस* साजरा करण्यात आला.
वर्गशिक्षक आणि विषय शिक्षकांमार्फत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांशी उपक्रमांबाबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विविध उपक्रमांनी युक्त असा *कौशल्य दिवस* साजरा करण्यात आला.
यामध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
1.एन इ पी 2020 बद्दल थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
2. घरगुती कामाच्या माध्यमातून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना बागकाम व बागेतील स्वच्छता यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला .
3. मातीकाम कौशल्य विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आणि त्यांना या संदर्भातील व्यवसायांसाठी प्रोत्साहित करण्यात आले .
4. बांबू कामा संदर्भात देखील विद्यार्थ्यांना विविध व्हिडिओज दाखवून त्या संदर्भातील माहिती करून देण्यात आली
5. पाणी परीक्षण दाखवताना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत नेऊन विद्यार्थ्यांना ते कसे केले जाते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले .
6. प्रथमोपचार पेटीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्व सांगितले गेले तसेच प्रथमोपचार संबंधी काही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्या सहभागाने करून दाखविली गेली
*निष्पत्ती — सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला गेला.*
सहभागी शिक्षक —
1. श्री. संदीप गीध
2. श्री. सचिन सोनवणे
============================
25/07/2024
*शिक्षण सप्ताह— सांस्कृतिक दिवस*
*दिनांक — 25 जुलै 2024*
*वार — गुरुवार*
*गट — पाचवी ते नववी*
*उपक्रम — सांस्कृतिक दिवस*
*शाळा — श्री माधवराव भागवत हायस्कूल (मराठी माध्यम)*
*स्थळ — विलेपार्ले (पूर्व), मुंबई.*
*प्रास्ताविक* — राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत *शिक्षण सप्ताह* साजरा करण्यासंदर्भात *केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने* निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार हा कालावधी शिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शिक्षण खात्याने ठरवले आहे.
श्री माधवराव भागवत हायस्कूल (मराठी माध्यम) या शाळेत आज *सांस्कृतिक दिवस* साजरा करण्यात आला.
वर्गशिक्षक आणि विषय शिक्षकांमार्फत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांशी ऊपक्रमांबाबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विविध उपक्रमांनी युक्त असा सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला.
यामध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी *नृत्य, गायन, चित्रकला, पाककला* या उपक्रमांचे सादरीकरण केले. प्रत्येक उपक्रमाचे वेगळेपण विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेत होते.
*निष्पत्ती — सर्व उपक्रमांमध्ये सृजनशीलता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.*
सहभागी शिक्षक —
1. श्रीम. ज्योती खांबे.
2. श्री. राजू बंडगर.
============================
25/07/2024
क्रीडा दिन दिनांक 24 जुलै 2024
दिनांक:- 24 जुलै 2024
वार:- मंगळवार
गट:- इ. सहावी ते नववी
उपक्रम: - क्रीडा दिन
स्थळ:-श्री माधवराव भागवत हायस्कूल, मराठी माध्यम, विलेपार्ले (पूर्व), मुंबई
प्रास्ताविक
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार हा कालावधी शिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शिक्षण खात्याने ठरवले आहे .
श्री माधवराव भागवत हायस्कूल मराठी माध्यम या शाळेत या सप्ताहाचा तिसरा दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला
*अहवाल*
क्रीडा शिक्षकांमार्फत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना या क्रीडा दिनामध्ये सहभागी करून घेण्यात आले. या दिवशी प्रथम विद्यार्थ्यांना देशी खेळाबद्दल माहिती देण्यात आली या खेळांचे महत्व सांगण्यात आले .या खेळातून विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक प्रगती कशी होते हे पटवून दिले तसेच शासनाने दिलेली शपथ घेण्यात आली. या उपक्रमांतर्गत तीन पायांची शर्यत, लंगडी ह्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या व लेझीमचे प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेण्यात आले.
*निष्पत्ती*
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक वृत्ती खिलाडू वृत्ती सहकार्याची भावना त्याचप्रमाणे खेळातून मानसिक आणि भावनिक विकास होतो तसेच शारीरिक सुदृढता येते ही जाणीव निर्माण झाली आणि खेळाच्या माध्यमातून आनंददायी वातावरणाची निर्मिती झाली.
25/07/2024
दिवस दुसरा
पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या उपक्रमात पाचवी ते नववी चेएकूण 90 विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांना श्रीमती जाधवर बाई व श्री शिंगाडे सरांनी सविस्तर माहिती या उपक्रमाबद्दल सांगितली या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध गणित शैक्षणिक साहित्यांचा तसेच शासनाकडून आलेल्या गणिती पेट्यांचा उपयोग केला. विद्यार्थ्यांना संख्या ओळख संख्या ज्ञान होण्यासाठी गणिती संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले तसेच गणित शिक्षकांनी बनवलेल्या विविध शैक्षणिक साहित्यांचा उपयोग करण्यात आला व हा उपक्रम पालकांच्या मदतीने साजरा करण्यात आला.
25/07/2024
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्देश दिलेले आहे, त्यानुसार श्री माधवराव भागवत हायस्कूल मराठी माध्यम या शाळेत या सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य हा उपक्रम विषय घेऊन साजरा करण्याचा आला.
वर्ग शिक्षकांमार्फत व विषय शिक्षकांमार्फत इयत्ता दहावी इयत्ता नववी या त्यांच्या विद्यार्थ्यांना उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आले विद्यार्थ्यांना विषयाशी संबंधित कोणते उपक्रम कशाप्रकारे करता येतील याबद्दल चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी मांडलेल्या कल्पनातून काही कल्पना निवडून विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले या गटांना पुरेसा कालावधी देऊन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली.
दिवस पहिला
दिनांक 22 जुलै २०२४
वार सोमवार
गट सहावी ते नववी
उपक्रम -अध्ययन अध्यापन साहित्य
शाळा- श्री माधवराव भागवत हायस्कूल
विलेपार्ले पूर्व
श्री. माधवराव भागवत हायस्कूल गणेशोत्सव २०२३-२४
16/10/2023
श्री. माधवराव भागवत हायस्कूल गणेशोत्सव २०२३-२४
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Address
'Mangalayatan', Paranjpe B Scheme, Hanuman Road, Vileparle East
Mumbai
400057