12/01/2020
*कायद्याचे अज्ञान हा गुन्हेगारी मधून सुटण्याचा मार्ग नाही - प्रमुख जिला न्यायाधीशांचा युवकांना इशारा*
कायद्याचे अज्ञान हा गुन्हेगारी मधून सुटण्याचा मार्ग नाही याची सर्व जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: वाहतुकीचे नियम व रैगिंग संदर्भात युवक-युवतींना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या संदर्भित गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षा तर होतेच पण संपूर्ण भविष्य देखील उध्वस्त होते त्या करिता युवकांनी कायद्याची माहिती घेऊन जबाबदारीने वागावे असे आग्रही प्रतिपादन प्रमुख जिला न्यायाधीश श्री दीपक धोलकिया यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित एक कार्यक्रमात केले.
जिला विधि सेवा प्राधिकरण नांदेड व श्री
हरिकिशनजी बजाज मेमोरियल माहेश्वरी शिक्षण विकास संस्था नांदेड़ यांचा संयुक्त विद्यमान दिनांक 12 जनवरी 2020 रोजी गोपाल एजुकेशन सेंटर नांदेड येथे युवकां साठी "वाहतुकीचे नियम रैगिंग तसेच मराठी भाषा संवर्धन" या विषयावर कायदेशीर शिविर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश श्री दीपक आर. ढोलकिया (प्रमुख जिला न्यायाधीश जिला व सत्र न्यायालय नांदेड) हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून श्री आर यस करंकाल (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नांदेड), श्री एस. बी. हिवाळे (मुख्य न्याय दंडाधिकारी नांदेड), श्री राजेंद्र यश रोटे (सचिव जिला विधि सेवा प्राधिकरण नांदेड), श्री मुदस्सर नदीम (सह दीवानी न्यायाधीश नांदेड), श्री सी.टी. चौधरी (पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा नांदेड़) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
माहेश्वरी शिक्षण विकास संस्था नांदेड चे अध्यक्ष श्री गोपाललाल लोया, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र मूंदड़ा, सचिव प्रा. किशनप्रसाद दरक, उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश इन्नानी, सह सचिव श्री रमेश डागा, संचालक श्री संजय सारडा, कैलाश राठी, एड. दीपा बियाणी, दुर्गाप्रसाद तोष्णीवाल, संस्था सदस्य श्री गोवर्धन बियाणी, गोपाल बियाणी, लक्ष्मीकांत लोया, महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर्स एसोसिएशन चे अध्यक्ष श्री आर. बी. जाधव, राठौड़ केमिस्ट्री क्लासेस चे संचालक कैलाश राठौड़, सय्यद फिजिक्स क्लासेस के संचालक श्री सय्यद, इत्यादि मान्यवरांची प्रमुख उपस्थिति होती.
या प्रसंगी राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणा च्या "नालसा गीत" व विविध विडीयो क्लिप चे सादरीकरण करण्यात आले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पालन करण्याबद्दल माननीय न्यायमूर्तिंच्या समोर शपथ दिली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतल्यावर कायद्याचे पालन करण्याची माननीय न्यायमूर्तिंना हमी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिला विधि व सेवा प्राधिकरण नांदेड चे सचिव श्री राजेंद्र एस. रोटे यांनी केले. अल्पावधि मध्ये कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केल्याबद्दल दरक कामर्स क्लासेस चे व्यवस्थापकीय संचालक प्रा. रामनारायण दरक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन एडवोकेट श्री नईम खान पठान यांनी तर आभार प्रदर्शन एडवोकेट श्री सुभाष शिंदे यांनी केले. चहापाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.