15/06/2026
https://youtube.com/shorts/F-GQ4wjEoOU?si=-EHIMnimXl-t0tdw
BMC Poisar Hindi School No 1/ प्रवेशोत्सव 2026
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
10/12/2025
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*
📣📣📣🏆🏆🥁🥁📣📣📣
बुधवार दिनांक 10/ 012/ 2025 रोजी झालेल्या कार्यानुभव मध्यवर्ती स्पर्धेमध्ये आर विभागातून *मुंबई पब्लिक पोयसर हिंदी क्रमांक 1 सुमेर नगर शाळेचे* *8 पैकी 8 विद्यार्थी यशस्वी झाले*.
1. जय उदयराज तिवारी .*द्वितीय* कागदी गोळे कलाकृती
2. नेहा संतोष प्रसाद. *तृतीय* माती काम
3. नेहा हरकित यादव *द्वितीय* शोभेची फ्रेम
4. . करुणा महेंद्र निषाद *द्वितीय* कागदी पिशवी
5. . विद्या सुरेश राम. *द्वितीय* बॉक्स मेकिंग
6. अमन राजेश कनोजिया . *द्वितीय* कागदी तोरण
7. रितेश रवींद्र पासवान *द्वितीय* वॉलपीस
8. राजन धर्मेंद्र निषाद. *प्रथम* पुष्परचना
🥇🥇🏆🏆🏆🏆🥇🥇
यशस्वी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व मार्गदर्शक शिक्षक *श्री कुशल जगदिश वर्तक*. शाळेच्या मुख्याध्यापिका *श्रीम. गीता कनवजे* ह्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
17/08/2025
आज दिनांक 15/8/2025 रोजी
*पोईसर हिंदी शाळा क्र.1 सुमेरनगर, बोरिवली (प) आर/ मध्य* विभाग येथे ७९ वा भारतीय *स्वातंत्र्य दिवस* साजरा करण्यात आला . *आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच सन्मा. श्रीम. आरती बारी * यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत,ध्वजगीत आणि समूहगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर समूह नृत्य तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त वक्तृत्व सादर केले. विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा व देशभक्तीपर गीतांवर सुंदर कवायत प्रकार सादर केले. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या पालकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,शिक्षक पालक वर्ग, परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. *शाळेच्या मुख्या. श्रीम गीता कनवजे* यांनी प्रमुख अतिथी आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
जय हिंद !🇮🇳🇮🇳
जय महाराष्ट्र !🇮🇳🇮🇳
22/07/2025
आज दिनांक 22/07/2025 रोजी सहकारनगर शाळा वडाळा येथे झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका *अंतिम योगासन* स्पर्धेमध्ये *पोईसर हिंदी शाळा क्र.01* चा विद्यार्थी *कु. रवीकिशन गणेश मंडल 09 ते 12 वर्षे वयोगटांमध्ये *गोल्ड मेडल*🥇🥇 मिळवून यशस्वी झाला आहे. रवीकिशन मंडल , मार्गदर्शक शारीरिक शिक्षण शिक्षिका श्रीम धनश्री सावे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. गीता कनवजे तसेच कनिष्ठ पर्यवेक्षक शारीरिक शिक्षण विभाग क्रमांक 11 श्री ललित पाटील सर यांचे खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹🌹
06/07/2025
मुंबई - पोयसर मनपा सेमी इंग्लिश शाळा क्रमांक 1 मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत दिंडी काढून विठ्ठल नामाचा गजर करीत सोबत पर्यावरण विषयक संदेश दिला. तसेच विविध माऊलीच्या जीवनावर आधारित नाटिका तसेच आपले पारंपरिक नृत्य प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली इको फ्रेंडली पालखी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.