Mindsetalchemist

Mindsetalchemist Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mindsetalchemist, Education, Mumbai.

Pratidnya-Mindset Alchemist, Speaker, Author
Emotional PAIN to Emotional POWER
Author: Belief to Relief, Rebuild Yourself

From students to corporates, homemakers to entrepreneurs,farmers to police & beyond
Invite for Keynotes, Workshop contact on email

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही  🇮🇳१५ ऑगस्ट आला की आपण तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशभक्तीची गाणी ऐकतो आणि अभिम...
14/08/2026

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही 🇮🇳

१५ ऑगस्ट आला की आपण तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशभक्तीची गाणी ऐकतो आणि अभिमानाने म्हणतो "आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत!” पण यावर्षी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय… पण आपण त्याचा खरा अर्थ समजून घेतलाय का?

स्वातंत्र्य म्हणजे “मला वाटेल ते मी करेन”याचे लायसेन्स नाही. आपलं मत ठामपणे मांडणं म्हणजे मोठ्याने बोलणं नाही. दुसऱ्याचा अपमान करणं, सोशल मीडियावर कोणालाही शिवीगाळ करणं, ट्रोलिंग करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. रस्त्यावर नियम तोडणं, रांगेत घुसणं म्हणजे हुशारी नाही. ती दुसऱ्याच्या हक्काची चोरी आहे.

तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहेच; पण तुमच्या जगण्यामुळे वागण्यामुळे दुसऱ्याचं जगणं त्रासदायक मुश्किल होत असेल, तर तो स्वातंत्र्याचा वापर नाही, तो स्वैराचार आहे, उन्मादपणा आहे.. कारण माझं स्वातंत्र्य तिथेच संपतं, जिथून दुसऱ्याच्या अधिकाराचा खून होतो..

स्वातंत्र्यासोबत जसे अधिकार येतात तसेच जबाबदाऱ्या सुद्धा येतातच..

आता 🇮🇳 देशप्रेमाची व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे…

देशप्रेम देशभक्ती म्हणजे फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकवणं, WhatsApp वर “Proud to be Indian” लिहिणं, गाडीवर तिरंगा लावून मिरवणूक काढणं नाही.... देशभक्तीचं गाणं ऐकून काही क्षण रोमांचित होणं साहजिकच आहे पण ते नुसत सुद्धा देशप्रेम नाहीच... देशप्रेम आपल्या रोजच्या वागण्यात दिसलं पाहिजे, आपल्या सवयींमधून झळकले पाहिजे

सिग्नल लाल असताना पोलीस दिसत नसला तरी थांबणं म्हणजे देशप्रेम आहे. रस्त्यावर कचरा न टाकणं म्हणजे देशप्रेम आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं म्हणजे देशप्रेम आहे. पाणी, वीज आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय न करणं म्हणजे देशप्रेम आहे. देशातील प्रत्येक प्रांताचा, भाषेचा, संस्कृतीचा, जातीचा आदर करण (नकोत्या सहन करण नाही), रांगेचे पालन करणं नियम पाळण म्हणजे देशप्रेम. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना प्राधान्य देणं म्हणजे देशप्रेम आहे. व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी सोशल मीडिया ची खोटी माहिती तपासल्याशिवाय पुढे न पाठवणं म्हणजे देशप्रेम आहे. लाच न देणं आणि न घेणं म्हणजे देशप्रेम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं काम प्रामाणिकपणे करणं हीसुद्धा देशभक्तीच आहे. कारण देशप्रेम नुसते घोषणा अन् दिखावा करण्यात नसत ना हो, काहीतरी सिविक सेन्स असले पाहिजेत आपल्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात, विचार करण्यात..

Civic Sense म्हणजे फक्त मोठमोठे शब्द नाही.
“कोणी पाहतंय का?” याऐवजी “हे योग्य आहे का?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय म्हणजे Civic Sense. ही एका जबाबदार नागरिकाची ओळख आहे. आणि Civic Sense म्हणजे फक्त सामान्य नागरिकांनी नियम पाळणं नाही. सत्तेत असणारे, प्रभावशाली लोक, लोकप्रतिनिधी आणि VIP म्हणून वावरणारे लोकही त्याच नियमांच्या चौकटीत असले पाहिजेत.

आपण अनेकदा पाहतो एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या दौऱ्यासाठी रस्ते बंद होतात, वाहतूक थांबते, सामान्य माणूस तासन्‌तास अडकतो, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही कधी कधी अडथळे येतात. सुरक्षा आवश्यक आहे; पण सुरक्षेच्या नावाखाली सामान्य नागरिकाच्या वेळेला, हक्काला आणि गरजेला कायम दुय्यम स्थान मिळणं ही Civic Sense चीच कमतरता असल्याचे लक्षण आहे.

लोकशाहीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांपेक्षा, सुरक्षेपेक्षा कोणताही नेता, पद, खुर्ची मोठं असू शकत नाही.. ते लोकांचे मालक नाहीत तर लोकांनी, लोकांसाठी निवडून दिलेले लोकांचे प्रतिनिधी आहेत. म्हणूनच राजकारण म्हणजे लोकांना एकमेकांविरुद्ध उभं करणं, द्वेष वाढवणं, जात-धर्म-भाषेच्या नावावर मतांचं गणित मांडणं किंवा सत्तेसाठी कुठलीही मर्यादा ओलांडणं नव्हे. राजकारणाचं अंतिम उद्दिष्ट सत्ता नसून समाजसेवा असायला हवं. आताच्या घडीला राजकारणात मतभेद असणं स्वाभाविक आहे; पण मतभेदांचं रूपांतर वैरात, टीकेचं रूपांतर द्वेषात आणि राजकीय स्पर्धेचं रूपांतर समाजाच्या फाटाफुटीत होणं ही लोकशाहीची ताकद नाही तर कमजोरी आहे.

नागरिकांनीही यामध्ये आपली जबाबदारी ओळखायला हवी. कोणत्याही नेत्याला, पक्षाला किंवा विचारधारेतील व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा अधिकार जसा आपल्याला आहे, तसाच आपल्या आवडत्या नेत्याची चुकीची गोष्ट चुकीची म्हणण्याचाही विवेक आपल्यात असला पाहिजे.

देशाचा विकास म्हणजे फक्त मोठे रस्ते, उंच इमारती, भव्य प्रकल्प, नवीन तंत्रज्ञान किंवा जगाला दिसणारी प्रगती एवढाच नाही. मंदिरं, स्मारकं, महामार्ग आणि मोठे प्रकल्प देशाच्या विकासाचा भाग आहेतच; पण त्या विकासाच्या सावलीत सामान्य माणसाचं आयुष्यही सुरक्षित, सन्मानाचं आणि आनंदी झालं पाहिजे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे; प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि परवडणारं आरोग्य मिळालं पाहिजे; तरुणाला केवळ पदवी नाही, तर कौशल्याला साजरी संधी, रोजगार आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. महिलेला केवळ सुरक्षिततेची आश्वासनं नाही, तर शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, समान संधी, सन्मान आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला केवळ कर्जमाफीची किंवा मदतीची गरज नसते; त्याला हमीची बाजारपेठ, योग्य मोबदला, आधुनिक तंत्रज्ञान, पाण्याची उपलब्धता आणि आपल्या श्रमाचा सन्मान हवा असतो. पोलीस आपली सुरक्षा करत असतील, तर त्यांच्या कामाचा ताण, अपुरा मनुष्यबळ, दीर्घ ड्युटी आणि मानसिक थकवा यांचाही विचार झाला पाहिजे. न्यायव्यवस्था सक्षम असण्याइतकंच महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाला न्याय वेळेत, परवडणाऱ्या पद्धतीने आणि कोणत्याही दबावाशिवाय मिळण्याचा विश्वास असणं. ज्येष्ठ नागरिकांना आधार, दिव्यांगांना सुलभ सुविधा, कामगारांना सन्मान, उद्योजकांना संधी आणि प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समान वागणूक मिळणं हे ही विकसित राष्ट्राचंच लक्षण आहे.

कारण विकासाची खरी व्याख्या शहर किती सुंदर दिसतं यात नाही; तर त्या शहरात राहणारा सामान्यातला सामान्य माणूस किती सुरक्षित, सक्षम, निरोगी, समाधानी आणि आत्मविश्वासाने जगतो यात आहे. देश बाहेरून कितीही विकसित झाला, पण एखादा तरुण बेरोजगारीमुळे नैराश्यात असेल, एखादी महिला असुरक्षिततेमुळे स्वतःला मर्यादित करत असेल, एखादा शेतकरी कर्जापायी शेवटचा श्वास घेत असेल, एखादा पोलीस सततच्या कामाच्या ताणाखाली जगत असेल किंवा एखाद्या सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत असेल, तर आपला विकास अजून पूर्ण झालेला नाही. आपण अजूनही विकसनशील या रांगेत आहोत...

सरकार कोणतेही असो, विचारधारा कोणतीही असो आणि काळ कोणताही असो पण विकासाच्या केंद्रस्थानी शेवटी “तळागाळातला samanya माणूसच” असला पाहिजे. कारण Viksit Bharat म्हणजे फक्त जगाच्या नकाशावर आर्थिक किंवा तांत्रिकदृष्ट्या पुढे गेलेला भारत नाही; तर प्रत्येक तळागाळातला सामान्य भारतीयाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, न्याय, सुरक्षितता, सन्मान आणि मानसिक शांततेसह आत्मविश्वासाने जगता येणारा देश, माझा देश... भारत...

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देश बदलण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी परिस्थितीसाठी सरकारकडे बोट दाखवण्याआधी, एकदा स्वतःला सुद्धा विचारा “मी काय करतोय / करतेय?"

कारण सरकार रस्ते बनवू शकतं; पण प्रत्येक वाहनामागे शिस्त लावण्यासाठी पोलीस उभा करू शकत नाही, ट्रॅफिक ची शिस्त आपणच पाळली पाहिजे.

महापालिका कचरापेट्या ठेवू शकते; पण प्रत्येक नागरिकाच्या हाताला कचरा कचरापेटी मध्ये टाकण्याची सवय लावू शकत नाही.

शाळा शिक्षण देऊ शकते; पण नागरिकत्वाची जाणीव रोजच्या वागण्यातूनच तयार होते.

दवाखाने आरोग्य सेवा देऊ शकतात पण सकस आहार, योग्य व्यायाम याची सवय आपणच आपल्याला लावू शकतो.

यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यांची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपली सुद्धा आहे.

आणि ही जबाबदारी फक्त मोठ्यांची नाही… एका मुलाने कचरा कचरापेटीत टाकणं, शाळेची भिंत खराब न करणं, रांगेत उभं राहणं, दुसऱ्याच्या वस्तूला परवानगीशिवाय हात न लावणं, ही देखील देश घडवण्याची सुरुवात आहे. पण मुलांना शिकवताना मोठ्यांनी स्वतःकडेही पाहायला हवं.

मुलाला सांगायचं “खोटं बोलू नकोस,” आणि स्वतः फोनवर म्हणायचं “सांग, बाबा घरी नाहीत.”

मुलाला सांगायचं “रस्त्याचे नियम पाळ,” आणि स्वतः लाल सिग्नल तोडायचा.

मुलाला सांगायचं “कचरा टाकू नकोस,” आणि स्वतः गाडीच्या खिडकीतून बाटली बाहेर फेकायची.

मुलाला सांगायचं “सगळ्यांचा आदर कर,” आणि स्वतः घरात काम करणाऱ्या व्यक्तीशी अपमानाने बोलायचं.

मुलं आपली भाषणं ऐकून कमी, आणि आपलं वागणं पाहून जास्त शिकतात. म्हणून पुढची पिढी बदलायची असेल, तर आधी आपण स्वतः उदाहरण बनलं पाहिजे.

स्वातंत्र्याचा नेमका खरा अर्थ काय?
स्वातंत्र्य म्हणजे
मला बोलण्याचा अधिकार आहे, म्हणून मी दुसऱ्याची मुस्काटदाबी करणार nahi... मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे, म्हणून मी दुसऱ्याचा अपमान करणार नाही, त्यांना ट्रोल करणार नाही...मला माझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे, म्हणून मी दुसऱ्याच जगणं मुश्किल करणार नाही... मला जसे माझे अधिकार हवेत, अगदी तसेच माझ्या जबाबदाऱ्यांची सुद्धा जाणीव आहे मला... म्हणूनच माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसं जगणं नाही; विवेकाने, संयमाने, सद्सद्विवेक बुद्धीने आणि जबाबदारीने जगण्याची संधी आहे.

यावर्षी तिरंग्याला सलाम करताना स्वतःलाही काही प्रश्न जरूर विचारूया…
मी नियम फक्त दंडाच्या / शिक्षेच्या भीतीने पाळतो की नागरिक म्हणून माझी जबाबदारी म्हणून?**
मी देशावर प्रेम फक्त शब्दांत करतो की कृतीतूनही?
मी माझे अधिकार जाणतो… पण माझ्या जबाबदाऱ्याही तितक्याच प्रामाणिकपणे निभावतो का?
मी माझ्या मुलांना फक्त यशस्वी होण्याचे धडे देतोय की चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक होण्याचेही?

कारण देशाला फक्त मोठमोठ्या इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर, पद प्रतिष्ठा खुर्ची यांची गरज नसून खरी गरज चांगल्या जागरूक, जबाबदार, मानसिक अन् शारीरिक दृष्ट्या सक्षम अशा नागरिकांची आहे...

आणि आता त्याची सुरुवात कुठून होणार?

सरकारपासून ???? नाही.
शेजाऱ्यापासून ???? नाही.
समोरच्यापासून???? नाही.
तर?????
माझ्यापासून.
तुमच्यापासून.
आपल्या घरापासून.
आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींतून...

यावर्षी तिरंगा हातात घेताना एक संकल्प कराल का?
“माझ्या देशाने मला काय दिलं?” याआधी, “मी माझ्या देशाला काय देतोय?” हा प्रश्न स्वतःला विचारलं का?

कारण देश सुरक्षित राहण्यासाठी सीमारेषेवर सैनिकांनी उभे राहणे जितकं गरजेचं आहे तितकंच देशाच्या आत प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि जबाबदारीने वागणं ही तितकेच आवश्यक आहे..

🇮🇳 तिरंगा हातात घेणं अभिमानाची गोष्ट आहेच; पण तिरंग्याची शान आपल्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यात जपणं ही खरी देशभक्ती आहे. हा खरा देशाचा मान आहे.

चला तर मग स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया… पण स्वातंत्र्यासोबत आलेली जबाबदारीही पार पाडूयात..

कारण स्वतंत्र भारताची खरी ताकद फक्त त्याच्या स्वातंत्र्यात नाही तर त्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करणाऱ्या नागरिकांत आहे.

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो... 🫡

जय हिंद! 🇮🇳

प्रतिज्ञा 🙏

या दिव्यांच्या ज्योतीने जसा भोवतालचा अंधार दूर होऊन चहू दिशांना लख्ख प्रकाश पसरला आहे, अगदी तसाच आपल्या मनातील भीती, राग...
12/08/2026

या दिव्यांच्या ज्योतीने जसा भोवतालचा अंधार दूर होऊन चहू दिशांना लख्ख प्रकाश पसरला आहे, अगदी तसाच आपल्या मनातील भीती, राग, लोभ, मत्सर, गर्व, खोटेपणा आणि अशाच सर्व नकारात्मक भावनांचा अंधार दूर होवो. मनात आयुष्यात शांतता, प्रेम, समाधान, करुणा आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव तेवत राहो.

“तमसो मा ज्योतिर्गमय।” 🪔🪔

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥🙏🚩
25/07/2026

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥🙏🚩

प्रिय यामिनी विलास 🤗वृत्तनिवेदिका म्हणून आम्ही ज्या व्यक्तीला नेहमी अत्यंत तटस्थ आणि मोजक्याच भावनांमध्ये बातम्या सादर क...
22/05/2026

प्रिय यामिनी विलास 🤗

वृत्तनिवेदिका म्हणून आम्ही ज्या व्यक्तीला नेहमी अत्यंत तटस्थ आणि मोजक्याच भावनांमध्ये बातम्या सादर करताना पाहतो, ती व्यक्ती एक संवेदनशील कवयित्रीही असू शकते, याचं सुंदर आणि उत्तम उदाहरण आहेस तू यामिनी.😇

तुझा “काजळकाठ” हा सुंदर काव्यसंग्रह जो येत्या २४ मे २०२६ रोजी वाचकांच्या भेटीला येत आहे. या नव्या साहित्यप्रवासासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा!🎉

“कविता” हा शब्द ऐकताच आमच्या डोळ्यासमोर बहुतेक वेळा प्रेमकविता किंवा दुःख व्यक्त करणाऱ्या कविता उभ्या राहतात. मात्र, तुझ्या आजवर वाचलेल्या कविता या विविध भावविश्वांनी, अनुभवांनी आणि जीवनाच्या अनेक पैलूंनी नटलेल्या जाणवतात. म्हणूनच मला वाटतं, “काजळकाठ” हा केवळ प्रेमकवितांचा संग्रह नसेल. या संग्रहातून जीवनातील अनेक भावना, नात्यांचे रंग, वास्तवाचे स्पर्श, मनाचे संघर्ष आणि जगण्याचे विविध पैलू वाचकांना अनुभवायला मिळतील आणि जे मनाला पटतीलही आणि भावतीलही.💯

यामिनी, तुझ्या संवेदनशील लेखणीतून वास्तवाचं भान जागवणारे, मनाच्या गाभ्याला स्पर्श करणारे आणि जीवनाकडे नव्या नजरेतून पाहायला शिकवणारे असे अनेक सुंदर शब्दफुलांनी सजलेले काव्यसंग्रह जन्माला यावेत, हीच सदिच्छा…🧿

- प्रतिज्ञा ♥️

फोटो - AI कमाल 😊

उगाच कशाला त्या अध्यात्म आणि देवाच्या गप्पा हानता आई च्या पोटी जन्म घेता अन् देव कुठे आहे म्हणता...आई, मा, मम्मी... ♥️🧿♥...
10/05/2026

उगाच कशाला त्या अध्यात्म आणि देवाच्या गप्पा हानता
आई च्या पोटी जन्म घेता अन् देव कुठे आहे म्हणता...
आई, मा, मम्मी...
♥️🧿♥️

Speak like your words matter—because somewhere, someone is waiting to wake up because of them.... 💯🎯
18/04/2026

Speak like your words matter—because somewhere, someone is waiting to wake up because of them.... 💯🎯

प्रभु श्री रामांना  शोधायचे नसते, ते जगायचे असतात; ते फक्त पुजण्यासाठीचा विषय नाहीत, तर जगण्याचा एक उच्चतम standard आहेत...
26/03/2026

प्रभु श्री रामांना शोधायचे नसते, ते जगायचे असतात;
ते फक्त पुजण्यासाठीचा विषय नाहीत, तर जगण्याचा एक उच्चतम standard आहेत...🚩
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥
श्री रामनवमी च्या मंगलकारक शुभेच्छा ..🙏

जेव्हा तुमचं काम बोलतं....
23/03/2026

जेव्हा तुमचं काम बोलतं....

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mindsetalchemist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mindsetalchemist:

Shortcuts

Share

Category