Dadar mumbai दादर मुंबई

Dadar mumbai दादर मुंबई

Share

Dadar mumbai

'Shivaji Park Lighting' on Diwali | छत्रपती शिवाजी महाराज पार्क दिवाळी | Mumbai Dadar | @vedhare 12/11/2023

https://youtu.be/U1oZ4jyCMxE?si=JcVtHE624-p18_dD

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दिवाळी निमित्त केलेल्या lighting ची व्हिडिओ आहे यात या मैदानातील मुख्य lighting तसेच मैदानातील आकर्षक रोषणाईच्या जागांची यात माहीती देण्यात आली आहे video नक्की पाहा आणि कमेंट करुन कळवा.

'Shivaji Park Lighting' on Diwali | छत्रपती शिवाजी महाराज पार्क दिवाळी | Mumbai Dadar | @vedhare 'Shivaji Park Lighting' on the auspicious Diwali | छत्रपती शिवाजी महाराज पार्क दिवाळी | Mumbai DadarMumbai chi Diwali ...

13/02/2020

कसा वाटला नजारा
सिद्धिविनायक मंदिराचा एक क्लिक

10/02/2020

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐

'तिची' मृत्यूशी झुंज अपयशी, वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज (१० फेब्रुवारी) सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (०९ फेब्रुवारी) रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

10/02/2020

प्रकाशवाटा


Jabardastphotography

06/02/2020

महिलांनो सहन करू नका ....🙏

माटुंगा रेल्वे स्थानकावर दिवसाढवळ्या विनयभंग आणि हस्तमैथून, महिला तक्रार करत नसल्याने पोलीस हतबल

महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका.करावी लागली आहे

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका झाली आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला.
पोलिसांनी यानंतर सापळा रचत याला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र त्याच्याविरोधात एकाही महिलेने तक्रार दाखल केली नसल्याने पोलीस लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करु शकले नाहीत. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येऊन एफआयआर दाखल करण्याचं आवाहन केलं आहे.

"अनेकदा लोकांच्या भीतीने महिला पुढे येऊन एफआयआर दाखल करत नाहीत. पण जर कोणी तक्रार दाखल केली तर आम्ही पूर्ण तपास करुन आरोपीविरोधात कडक कारवाई करु. महिलांनी कायद्याला घाबरण्याची गरज नाही. त्यांची ओळख उघड केली जाणार नाही. पण एफआयआर दाखल झाला तरच त्याच्याविरोधात भक्कम केस उभी राहू शकते. यानंतर तो पुन्हा कधी महिलांना त्रास देणार नाही," असं एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
#दादारमुंबई

04/02/2020

सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन !

कोंढाणा युद्धाची ३५० वर्षपुर्ती,गड आला पण सिंह गेला नरवीर तानाजी मालुसरे यांनी गड वाचवण्यासाठी बलिदान दिले पण आज महाराष्ट्रात शासन गड किल्ले वाचवण्यासाठी कमी पडते!

नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा किल्ला सर केला. स्वत:च्या अतूलनिय शौर्याने स्वराज्याचा रणसंग्राम अजरामर केला. आज मंगळवार, ४ फेब्रुवारी, कोंढाणा म्हणजेच आजच्या सिंहगडावरील रणसंग्रामाला व सातारा जिल्ह्यातील भुमिपुत्र तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पुर्ण होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा किल्ल्याची मोहिम बालसवंगडी तान्हाजीवर सोपवली. स्वत:च्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत नरवीर तान्हाजी मालुसरे सैन्यानिशी गुंजवणी नदी पार करत कोंढाणाच्या (सिंहगड) पायथ्याला येऊन पोचले. आजच्या दिवशी, ४ फेब्रुवारी १६७० रोजी मुठभर मावळ्यांनीशी अभेद्य असा कोंढाणा किल्ला अत्यंत अवघड अशा द्रोणगिरी कड्याच्या बाजुने अंधा-या रात्री चढले.

उदयभान राठोड व त्याच्या सुमारे १५०० हशमांच्या फौजेला अवघ्या ५०० मराठ्यांनी अतूलनीय पराक्रम गाजवून धूळ चारली. शत्रूशी बेभान होऊन लढताना या रणसंग्रामात हातातील ढाल पडल्यानंतरही शेला गुंडाळून लढणा-य‍ा नरवीर‍ांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी तान्हाजींचे बलिदान सार्थकी ठरवत किल्ला काबीज केला. गवताच्या गंज्या पेटवून राजांना राजगडावरती कोंढाणा स्वराज्यात आणल्याचा संदेश दिला गेला होता.

मराठी साहित्यविश्वात 'आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे' व 'गड आला पण सिंह गेला' हे दोन वाक्यप्रचार नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या अलौकीक कामगिरीमुळे अजरामर झाले. मालुसरे यांचे गाव असलेल्या गोडवलीचे ग्रामस्थ आज साडेतीनशे वर्षांनंतरही स्वराज्य‍ाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृती हृदयात जपून आहेत.

Photos 04/02/2020



Place - shree siddhi vinayak mandir

Pic credit -



04/02/2020

आज
म्हणजेच जागतिक कर्करोग दिवस. कर्करोगाला समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी या उद्देशाने जगभरात आज जागतिक कर्करोग दिवसानिमित्त जागरूकतेचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
कर्करोगासोबत लढणाऱ्या त्या प्रत्येकास कडक सॅल्यूट!

02/02/2020

वीकेंड संपला... पण पुढच्या चा प्लॅन फिक्स आहे. लक्षात आहे ना. चा फेव्हरेट आर्ट फेस्टिव्हल 🙌
. 📸

#दादर #दादारमुंबई #मुंबई

Photos from Dadar mumbai दादर मुंबई's post 02/02/2020

जिजामाता उद्यान (राणी बाग)
रौप्य महोत्सवी उद्यान प्रदर्शन
२५ हजार रोपट्यांचा सहभाग..

#राणीचीबाग #राणीबाग #मुंबई

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Dadar
Mumbai
400014