26/06/2025
https://www.youtube.com/live/A_DR1KHt0e4?feature=shared
10 वी कौतुक सोहळा 2025
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Utkarsh Mandir - Shikshan Prasarak Mandal Malad, Campus Building, Mamletdar Wadi, Road No 2, Mumbai.
26/06/2025
https://www.youtube.com/live/A_DR1KHt0e4?feature=shared
10 वी कौतुक सोहळा 2025
14/04/2025
https://www.youtube.com/live/xetAPw_0VVY?feature=shared
उत्कर्ष वसंत व्याख्यानमाला, चौथे पुष्प मा. श्री. अमित अभ्यंकर आणि मा. श्री. विजय लेले
28/03/2025
आज उत्कर्ष मंदिर शाळेमध्ये गेली ३५ वर्षं शिक्षक व त्यातली काही वर्षं मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीम. प्रतिभा अडूरकर बाई यांचा सेवानिवृत्ती समारंभ..!
बाईंच्या पुढील आयुष्यासाठी उत्कर्ष परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...💐
बाईंच्या सहवासातील तुमच्या काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेयर करा.
19/03/2025
उर्मिलायन : डॉ. स्मिता दातार, उत्कर्ष मंदिर, मालाड.
सध्या सर्वच स्पर्धांमध्ये गाजत असलेल्या व पहिल्या क्रमांकात येणाऱ्या 'उर्मिलायन' ह्या अनेक पुरस्कारप्राप्त नाटकाच्या लेखिका डॉ. स्मिता दातार या आपल्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थीनी आहेत.
जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हे अतिशय सुंदर नाटक अवश्य पाहा व स्मिता दातार यांची 'उर्मिलायन' ही कादंबरीही अवश्य मिळवून वाचा.
डॉ. स्मिता दातार... उत्कर्ष परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशासाठी शुभेच्छा...💐
19/03/2025
उत्कर्ष वसंत व्याख्यानमाला २०२५
हार्दिक निमंत्रण...💐 प्रवेश विनामूल्य...!
16/02/2025
उत्कर्ष परिवार... मनःपूर्वक अभिनंदन...💐
13/02/2025
शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड या आपल्या संस्थेला भाजपा शिक्षक आघाडी, मुंबई या संघटनेतर्फे आदर्श शैक्षणिक संस्था हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
माननीय संस्थाचालक, संस्थेचे सर्व हितचिंतक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, पालक व समस्त विद्यार्थीवर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन...💐
08/02/2025
आज भाजपा शिक्षक आघाडीतर्फे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड या आपल्या संस्थेला उत्कृष्ट शैक्षणिक संस्था हा पुरस्कार देण्यात आला...💐
08/02/2025
उत्कर्ष परिवारासाठी आनंदाचा क्षण...!
उत्कर्ष मंदिर शाळेचे साहाय्यक शिक्षक श्री. संजय शिंदे सर यांच्या चार बालनाट्य या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार अंतर्गत
बालनाट्य विभाग - भा. रा. भागवत पुरस्कार
■ चार बालनाट्य : लेखक संजय शिंदे (अष्टगंध प्रकाशन)
(पुरस्काराचे स्वरूप : रुपये ५०,०००, मानपत्र, स्मृतिचिन्ह)
उत्कर्ष परिवारातर्फे श्री. संजय शिंदे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन...💐
08/02/2025
श्री. संजय शिंदे सर... आपले मनःपूर्वक अभिनंदन
"माझ्यातल्या बालनाट्य लेखक घडवणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित उत्कर्ष मंदिर, मालाड या शाळेला... कृतज्ञतापूर्वक"
- संजय शिंदे
अर्पण केलेल्या चार बालनाट्य या पुस्तकाला मिळालेले यश...
यश हे मेहनतीच्या प्रवासाचा सुवर्ण क्षण असतो, आणि आज तो क्षण आपल्या मित्राच्या वाटेला आलाय. त्याच्या "चार बालनाट्य" या पुस्तकास राज्यस्तरीय भा. रा. भागवत पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकताच मन भरून आलं. ही केवळ एक साहित्यिक उपलब्धी नाही, तर त्याच्या खडतर प्रवासाचा, अपार मेहनतीचा आणि प्रामाणिक निष्ठेचा सन्मान आहे.
खरं सांगू का, संजय सर तुम्ही नुसतच स्वप्न पाहणारे नाहीत तर ती सत्यात उतरवण्यासाठी झगडणारे आहात. बालसाहित्याची अनोखी दुनिया उभारण्याचा त्यांचा प्रयत्न मी जवळून पाहिला आहे. बालकांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी संवादशैली, आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या दुनियेत घेऊन जाण्याची ताकद यामुळेच त्यांच्या लेखणीला हा बहुमान मिळाला आहे.
लिहिणं हे सोपं नसतं. शब्दांना अर्थ देणं, त्यात भावना ओतणं आणि त्यातून वाचकांपर्यंत पोहोचणं – या सगळ्या टप्प्यांवर त्यांनी केलेली मेहनत मला ठाऊक आहे. त्यांनी अनेक रात्री जागून काढलेल्या, शब्दांशी केलेल्या संवादाच्या साक्ष मी आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा या यशाचा आनंद मला स्वतःच्या यशासारखा वाटतोय.
आणि शिंदे सर आपल्या *अष्टगंध प्रकाशनातर्फे* प्रकाशित झालेल्या बालकवीतचे पुस्तक *मोराच्या गावाला जाऊया : प्रशांत असनारे* याला ही बालकवी चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे यासाठीही आपले खूप खूप अभिनंदन...💐
शिंदे सर आपला हा प्रवास असाच सुरू राहो! आपल्या लेखणीतून अजूनही नवनवीन कथा उमलोत, बालविश्व अधिक रंगतदार बनो! या तुमच्या यशाचा मी अभिमान बाळगतो, आणि पुढच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.