25/02/2021
Indian Toy Fair Coming Soon.......
*भारतीय खेळणी जत्रा 2021*
*ITF 2021*
*प्रिय विद्यार्थी,पालक आणि शिक्षक मित्रहो,*
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस आणि अॅस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत आपल्या देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने *दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान *मा. श्री. नरेंद्र मोदी* यांच्या हस्ते दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थी यांना भारतीय खेळणी जत्रा २०२१ यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी *https://theindiatoyfair.in/* यावर General visitor म्हणून नोंदणी करावी. देशातून 1000 पेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा🙏
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*