Universal Public School & Junior College Mudkhed

Universal Public School & Junior College Mudkhed Best education in mudkhed state & CBSE syllabus experience teacher last 16 year best school in mudkhed 2013 inspire award winner school 100% result 3yr

*दिनांक 01. 03. 2026* रोजी *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड* येथे नांदेड जिल्ह्याचे *माननीय श्री सलगर स...
03/03/2026

*दिनांक 01. 03. 2026* रोजी *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड* येथे नांदेड जिल्ह्याचे *माननीय श्री सलगर साहेब शिक्षणअधिकारी माध्यमिक व माननीय श्री दिलीप बनसोडे साहेब शिक्षणाधिकारी योजना* यांनी *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड या शाळेला* भेट दिली व शाळेची तपासणी करून शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून व शाळेचे सुसज्ज क्लासरूम डिजिटल क्लासेसची पाहणी करून शाळेच्या गुणवत्ता वाढीबद्दल सूचना केल्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग कसा घेतला पाहिजे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले पाहिजे असे सूचना केले व *आपल्या शाळेतील विद्यार्थी अबॅकस मध्ये पंधरा विद्यार्थी स्टेट लेवलला पात्र झाले याबद्दल शाळेच्या प्राचार्य हार्दिक अभिनंदन केले* व शाळेचे सुसज्जत वर्ग खोल्या विद्यार्थ्यांच्या व सांस्कृतिक सभागृह टॉयलेट बाथरूम व ग्राउंड सी.सी.टि.व्हि सर्व सुविधा पाण्याचे फिल्टर हे सर्व पाहून एकदम समाधान व्यक्त केले व मागील दहा वर्षापासून चा वर्ग दहावीचा शंभर टक्के निकाल व 2017 पासून वर्ग 12वी चा शंभर टक्के निकाल पाहून समाधान व्यक्त केले असेच प्रगती व्हावी आणि आपल्या शाळेचे मुदखेड तालुक्यातच नाही चार तालुक्यात नाव आहे हाळदे मैडम यांची शाळा म्हणून नाव लौकीक आहे आपल्या शाळेचे खूप मोठे नाव आहे हे नाव टिकून ठेवण्यासाठी सतत परिश्रम शील शिक्षक वर्ग कार्य करत आहेत व सर्व शिक्षकांच्या भेटी विद्यार्थ्यांना भेटून समाधान व्यक्त केले शाळेच्या प्राचार्य मॅडम यांना पूर्ण शाळेच्या 25 वर्षातील सर्व चढ-उतार याबद्दल विशेष चौकशी केली आहे व मॅडमचे कौतुक केले ही एक महिला खंबीर उभा टाकून जसा आपला संसार योग्य करते तसा शाळा सुद्धा तुम्ही उभा केली आहे व मुदखेड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली शाळा उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मॅडमचे सलगर साहेब वर दिली बनसोडे साहेबांनी खूप कौतुक केले व असेच प्रगती करत राहो अशी कामना व्यक्त केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन शिक्षणाधिकारी माध्यमिक व योजना शिक्षणाधिकारी यांनी शाळेतून निरोप घेते वेळी
सर्व शिक्षकाचे अभिनंदन केले शाळेच्या *उप प्राचार्या यांचे शिस्तबद्ध नियोजनबद्ध कार्या बद्दल श्री. सलगर साहेब व श्री. बनसोडे साहेब यांनी समाधान व्यक्त केले वर्षा चन्द्रे, उप प्राचार्या, स्कुल इन्चार्ज बालाजी कुसुमवाड, स्कुल एच.ओ.डी. सुनिल जाधव परिक्षा एच. ओ.डी. शिल्पा जाधव, प्रायमरी इन्चार्ज, विद्या गायकवाड, ज्योती दर्शनवाड, प्रेरणा कंधारे, रूतुझा खाण्डरे, आरती उन्हाळे, राणी तेलंगे, मीना भुरे, गंगाधर निदानपुरे, अनिकेत लामगे, शुमम हुडे, या सर्व स्टाफ यांनी शाळेच्या प्रगती बद्दल दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान सर्व कार्य योग्य संपन्न केले* यांच्या कामाबद्दल दोन्ही ही शिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले

 #प्रिय   *सौ.पार्वती राजाराम हाळदे*🌹🌹🎂🎂🌹🌹 #लक्ष्मीच्या_पावलांनी तु अलीस आणि  #माझे_अवघे_विश्व_बदलून_गेले, आपल्या  #संसा...
02/02/2026

#प्रिय *सौ.पार्वती राजाराम हाळदे*
🌹🌹🎂🎂🌹🌹
#लक्ष्मीच्या_पावलांनी तु अलीस आणि #माझे_अवघे_विश्व_बदलून_गेले, आपल्या #संसाराची_30_वर्षे कशी पूर्ण झाली हे उमगलच नाही, मनसोक्त भांडण, रुसवे- फुगवे यातून नेहमीच संभाळून घेतलस मला, आणि #अथांग_सागरासारखे_तुझे_प्रेम, माया दिलीस. 7 ती फक्त #तुझ्यामुळेच, तुझ्यासारखी प्रेमळ, शांत, समजूतदार, माझ्यातच तुझ सर्वस्व शोधणारी पत्नी, म्हणून मला मिळाली हे माझं सौभाग्य, #सुखा-दुखात_माझी पत्नी, म्हणजे_अर्धांगिनी_असं_समजलं जातं पण तू #माझं_पूर्णत्व_आहेस. तुझ्यामुळे मी अपूर्ण नव्हे तर मी काहीच नाही, #कारण_माझा_अर्धवर्तुळ_तु_ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. #एखाद्या_वेलीच_सौंदर्य_पानांशिवाय_कळी-फुलांशिवाय किंवा फळांशिवाय ूर्ण तसंच #तुझ्याशिवाय_माझं_आयुष्य_अपुर्णच, म्हणूनच कि काय माझ्या अत्यंत पडक्या काळापासून तू मला सांभाळून घेतलं #माझ्यावर_नितांत_भरभरून_प्रेम_केलं, माया दिलीस त्याबद्दल तुझे करावे तितके कौतुक कमीच, ेश्वराला_एकच_मागणं_मागेन की, हे परमेश्वरा #जन्मोजन्मी_मला_तुझ्यासारखी_नको तर तूच #पत्नी_म्हणून_लाभो....
#वाढदिवसाच्या_अनेक अनेक हार्दिक - खूप_खूप_शुभेच्छा.. 🌹🌹🎂🎂🌹🌹

आज माझ्या लाडकी मुलगी *संगीता हाळदे* जन्म होणं ही भाग्याची गोष्ट माझे जिवन सफल झाले. कारण मुलीच्या माध्यमातून *प्रत्यक्ष...
02/02/2026

आज माझ्या लाडकी मुलगी *संगीता हाळदे* जन्म होणं ही भाग्याची गोष्ट माझे जिवन सफल झाले. कारण मुलीच्या माध्यमातून *प्रत्यक्ष लक्ष्मीमाताच माझ्या घरी आली* त्यामुळे मुलीवर आईवडीलांचं जास्त प्रेम असतं. *आवळून जेव्हा तू बोट धरतेस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो*
माझी लाडकी मुलगी *संगिता हाळदे* वाढदिवस म्हणजे वर्षातील एक खास समारंभ असतो. आपल्या मुलीला दीर्घायुष्य लाभावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो *झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा, ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा… संगीत तुला वाढदिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🎂🌹🌹*

आज *दिनांक 09.01.2026 रोजी युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड* शाळेतील विद्यार्थ्यांनी *लोकमत समूहातर्फे म...
09/01/2026

आज *दिनांक 09.01.2026 रोजी युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड* शाळेतील विद्यार्थ्यांनी *लोकमत समूहातर्फे माझे गुरु* या विषयावर प्रश्नमंजुषा प्रवेशिकाचे बक्षीस जाहीर केले आहे *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* या शाळेतील सात विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे *श्रावणी शिवानंद कदम, सुशमा भगवान चव्हाण, विरसिंह पुरोषत्तम चाडंक, आर्यन बाळासाहेब देशमुख, अनुश्री गुरूराज तुपतेवार ,* या विद्यार्थ्यांना लोकमत समूहातर्फे आज *बगाटे साहेब, शाळेत उपस्थित होते* विद्यार्थ्यांना त्यांचे *आहे प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले त्यावेळेस लोकमत समूहाचे प्रतिनिधी बगाटे सर हे उपस्थित होते व शाळेच्या प्राचार्या सहपार्वती हळदी मॅडम व उपप्राचार्य सौ वर्षा चन्द्रे व शाळेतील सर्व विद्यार्थी व स्टाफ उपस्थित होता *विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक पालकाने आवर्जून प्रतिसाद दिला पाहिजे* जेणेकरून विद्यार्थ्यांना जागतिक लेव्हलची प्रश्नमंजुषा घेतली जाते चिटकवून प्रवेशिका दाखल करण्याची व प्रश्नांची उत्तरे सोडवण्याची सवय लागते विद्यार्थ्यांच्या जीवनात या सोडवलेल्या प्रश्नांचे उत्तरेही हमेशा त्यांच्या कामे पडतात हे जे झालेले मागे कॉम्पिटिशन आहे ते *माझे गुरु* याच्यावर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे योग्य उत्तरे दिले आहेत अशा विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देण्यात आली *युनिव्हर्सल मध्ये सतत विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी अनेक विषयावर अनेक परीक्षा जसे स्कॉलरशिप, एम टि.एस, (महाराष्ट्र टैलेन्ट सर्च), एन.टि.एस. (नैशनल टैलेन्ट सर्च), परिक्षा आहे नवोदय विद्यालय परीक्षा, व अबॅकस, व वैदिक मैर परीक्षा, आहेत* असे सतत कॉम्पिटिशन ठेवले जातात पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे विद्यार्थी आपले अभ्यासाची सवय लागते व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो मुदखेड तालुक्यातील एकमेव प्रसिद्ध शाळा युनिव्हर्सल शाळा ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा आहे या बद्दल सर्व पालक समाधान व्यक्त केले

*केंद्रिय प्रशिक्षण महाविद्यालय, केन्द्रिय रिजर्व पुलिस बल, मुदखेड येथील पुलिस महानिरीक्षक, मा. श्री. के. सजाऊद्दिन साहे...
18/08/2025

*केंद्रिय प्रशिक्षण महाविद्यालय, केन्द्रिय रिजर्व पुलिस बल, मुदखेड येथील पुलिस महानिरीक्षक, मा. श्री. के. सजाऊद्दिन साहेब* यांनी *मुदखेड येथील माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले होते यावेळी सी. आर.पी.एफ. कॅम्प चे कमांडेन्ट श्री त्रिपाठी साहेब उपस्थित होते,* मुदखेड येथे माझी सैनिक संघटनेकडून सामाजिक कार्य चांगल्याप्रकारे संघटनेचे पदाधिकारी कार्य करतात व पुढे सामाजिक कार्यात कोणत्याही प्रकारे मदद लागली तर आम्ही आपल्या सोबत आहोत व या वेळी *सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष मुदखेड श्री. लक्ष्मण देवदे, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल कॉलेजचे संचालक अध्यक्ष श्री. राजाराम हळदे, माजी सैनिक संघटनेचे मार्गदर्शक श्री. प्रभू घोंगडे, माजी सैनिक संघटना सचीव श्री. शशिकांत मोडवान* यांनी *श्री सजाउद्दिन साहेब, पुलिस महानिरीक्षक, के. रि. पु. बल.* यांची भेट घेतली वरील भेटी वेळी *संघटनेचे मुदखेड शहरात माजी सैनिकांच्या टीमच्या कार्याचे कौतुक केले आहे, भविष्यात माजी सैनिकासाठी येणाऱ्या अडचणी बाबत सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे,* माजी सैनिक संघटना मुदखेडच्या वतीने सत्कार करण्यात आला

*युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* येथे शाळेत आज *दिनांक 13.03.2025 रोजी गुरूवारी* विद्यार्थ्यांनी *धुली...
14/03/2025

*युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* येथे शाळेत आज *दिनांक 13.03.2025 रोजी गुरूवारी* विद्यार्थ्यांनी *धुलीवंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांनी धुलीवंदनाचा आनंद घेतला वार्षिक सन सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मनमोकळेपणाने खेळला शिक्षणा सोबत विद्यार्थ्यांना *सामाजिक सांस्कृतिक त्यौहारांची जाणीव करून दिली पाहिजे* या निमित्ताने शाळेच्या प्राचार्या सौ.हाळदे मैडम यांनी आनंद घेऊन विद्यार्थ्यांसोबत डान्स पण केले शाळेचे शिक्षक विद्यार्थी बणुन खेळतात अभ्यासा सोबत हा क्षण विद्यार्थी जिवनात एक महत्त्वाचे आहे अश्या अनेक कला गुणांना युनिव्हर्सल मध्ये वाव दिला जातो या बद्दल मुदखेड तालुक्यातील सर्व पालक समाधान व्यक्त करत आहेत

*आदेशानुसार*
*प्राचार्या*
*युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व* *ज्युनियर कॉलेज मुदखेड*

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर  कॉलेज मुदखेड या शाळेचे अध्यक्ष  श्री.प्रकाक्ष हामद डोणगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
10/02/2025

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड या शाळेचे अध्यक्ष श्री.प्रकाक्ष हामद डोणगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🙏🙏

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड जिल्हा नांदेड या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम लाईव पाहु शकता...
09/02/2025

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुदखेड जिल्हा नांदेड या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम लाईव पाहु शकता

22nd Annual Day Celebration.

आज *दिनांक 26.01.2025* वार गुरूवारी *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड,**पालक मेळावा* घेण्यात आला या मेळा...
30/01/2025

आज *दिनांक 26.01.2025* वार गुरूवारी *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड,*
*पालक मेळावा* घेण्यात आला या मेळाव्यात *प्रथम सत्र परिक्षा, व 3 री माहे परिक्षा या दोन्ही परिक्षा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे* व *अबैकस व वेदिक मैथ* मे विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले व प्रथम सत्र परिक्षा मध्ये *प्रथम, द्वितीय,तृतीय* स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मैडल देण्यात आले व आज शाळेत महिला साठी *हळदी कुंकू* कार्यक्रम आयोजित करण्यात आला व आज शाळेत महिला शालेय समिती *पदाधिकारी सौ. ज्योती प्रकाश हामद, अध्यक्ष, सौ. पचलिंग, उपाध्यक्ष, सौ. पार्वती राजाराम हाळदे, सचिव, सौ. खाण्डरे, सदस्य, सौ. भिसे, सदस्य, सौ. वाघमारे, सदस्य, सौ. टाकळे, सदस्य, सौ. शीतल राम चन्द्रे, सदस्य, सौ. पुय्यड, सदस्य,* हे सर्व महिला सदस्या याच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना या सर्व महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आज या पालक मेळाव्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणारी *मुदखेड तालुक्यातील प्रसिद्ध सौ. हाळदे मैडम ची युनिव्हर्सल अशी ओळख निर्माण केली आहे* व येणाऱ्या *2 फेब्रुवारी ला स्टेट लेवल अबैकस व वेदिक मैथ परिक्षा हैद्राबाद मध्ये शाळेचे 9 विद्यार्थी भाग घेणार आहेत* शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळा आहे या बद्दल सर्व पालकांनी मेळाव्यात समाधान व्यक्त केले व हा पालक मेळावा आयोजन खूप सुंदर नियोजन केले असे महिला सदस्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या *सौ. वर्षा चन्द्रे, उप प्राचार्या, सौ. पुष्पा भालेराव, सौ. विद्या गायकवाड, सौ. शिल्पा जाधव, सौ. ज्योती दर्शनवाड, सौ. नंदनी जाधव, बालाजी कुसुमवाड, अंकुश बट्टेवाड, ताडेराव एच. टी., रमा कांबळे, मारूती तेलगें* या सर्व कर्मचाऱ्यांनी या पालक मेळाव्याचे नियोजन खुप छान केले होते या बद्दल महिला आध्याक्षानी व सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले आभार व्यक्त सौ. हाळदे प्राचार्या मैडम यांनी व्यक्त केले सर्व पालकांना व प्रमुख पाहुणे यांची मने जिंकली पालक आई वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पालकांनी समाधान व्यक्त केली

23/01/2025
*युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* सर्व पालकांना कळविण्यात येते की *अबैकस व वेदिक मैथ* जिल्हा लेवल परीक्...
19/01/2025

*युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* सर्व पालकांना कळविण्यात येते की *अबैकस व वेदिक मैथ* जिल्हा लेवल परीक्षा -2025 *कैबरिज माध्यमिक विद्यालय शिवाजी नगर नांदेड* संपन्न झाली व युनिव्हर्सल मुदखेड या शाळेतील जिल्ह्यातील 20 शाळेतील विद्यार्थ्या मध्ये प्रावीण्य प्राप्त केले युनिव्हर्सल च्या विद्यार्थ्याचा दबदबा कायम या हि वर्षी कायम ठेवला आहे शाळेचे 11 विद्यार्थी जिल्हा लेवल मध्ये विषेश प्रावीण्य प्राप्त झाले व नॅशनल लेवल साठी 7 विद्यार्थी सिलेक्ट झाले या कैम्पीटिशन मध्ये विद्यार्थ्यांनी 2.23 दोन मिनट तेविस शेकंदात मुलांनी 50 गणित सोडवले आहे या मध्ये शाळेच्या *प्राचार्या सौ. हाळदे मैडम यांचे नियोजन उप प्राचार्य वर्षा चन्द्रे मैडम, बालाजी कुसुमवाड, विद्या गायकवाड, शिल्पा जाधव, नंदिनी जाधव, पुष्पा भालेराव, अंकुश बट्टेवाड, दराडे सर, ज्योती दर्शनवाड या सर्व शिक्षकांनी मेहनती मुळे जिल्ह्यातुन सर्वात जास्त विद्यार्थी रैक होल्डर* झाले आहेत *स्टार ज्युनियर,लेवल-1, 2, 3 व वेदिक मैथ* मध्ये सर्वात जास्त विद्यार्थी युनिव्हर्सल मुदखेडच्या विद्यार्थी चमकले आहेत मुदखेड तालुक्यातील सर्व पालक या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास बद्दल समाधानी आहेत *आज या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, बनसोडे साहेब अध्यक्ष स्थानी होते व महाराष्ट्र ईंग्लिश राज्य संघटना जिल्हा अध्यक्ष शिवाजी उमाटे, जिल्हा सचिव राजीव घोडके, व जितेंद्र सिंह पाहडिया* व *विश्वम एज्युकेशन जोनल सि. ई. ओ. नाईक सर व त्याची टिम यांची प्रमुख उपस्थितीत होती* अध्यक्षांनी आपल्या भाषणात अबैकस व वेदिक मैथ कैम्पिटिशन साठी अचुक पद्धत विद्यार्थ्याना अवगत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अबैकस वेदिक मैथ साठी आई वडिलांनी अशा प्रतियोग्य मध्ये भाग घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले आज युनिव्हर्सल च्या 85 विद्यार्थ्यानी भाग घेतला होता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले

Address

Swami Vivekananda Education Campus, Mudkhed To Umari Road
Mudkhed
431806

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Public School & Junior College Mudkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Universal Public School & Junior College Mudkhed:

Shortcuts

Share

Category