31/12/2025
सहकार विद्या मंदिर मोताळा येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा
मोताळा : बुलडाणा अर्बन द्वारा संचलित सहकार विद्या मंदिर, मोताळा येथे नेहमीप्रमाणे आदरणीय भाईजी राधेश्यामजी चांडक संस्थापक अध्यक्ष बुलडाणा अर्बन, बुलडाणा अर्बनचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेशनी झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी च्या अध्यक्षा कोमलता झंवर यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनात क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोराखडी पोलीस स्टेशनचे पीआय सिताराम मेहेत्रे , तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर छाया महाजन , डॉक्टर तेजल काळे , भीकमचंदजी झंवर , गणेश मनोहर पाटील(नगरसेवक), गणेश जवरे (केंद्रप्रमुख) तसेच विष्णु शिराळ (वार्ताहर, पुण्यनगरी), गणेश पाटील (वार्ताहर,आपला गुजरात), प्रवीण घोडेस्वार (लेखा विभाग प्रमुख, बुलढाणा अर्बन चरिटेबल सोसायटी) व कृष्णा पाटील (शाखा व्यवस्थापक, बुलढाणा अर्बन सोसायटी), डॉक्टर शरद काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
क्रीडा सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सर्व विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजवून सांगण्यासाठी ठाणेदार मेहत्रे सरांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असून शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील आणि युवराज जुनारे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश तायडे यांनी केले. बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले क्रीडा शिक्षक उमेश माळी, दिलीप सातव, आकाश जाधव, समाधान आवटे यांचे विशेष सहकार्य लाभले .