Department of Zoology Shri Shivaji Science college Motala

  • Home
  • India
  • Motala
  • Department of Zoology Shri Shivaji Science college Motala

Department of Zoology Shri Shivaji Science college Motala Shri Shivaji college Motala

22/04/2022
02/02/2022
*श्री शिवाजी महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रकल्पाचे उदघाटन* स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्...
14/08/2021

*श्री शिवाजी महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रकल्पाचे उदघाटन*

स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्र विभागाअंतर्गत मधुमक्षिका पालन प्रकल्पाचे १२/०८/२०२१ रोज गुरुवारला प्राचार्य डॉ सुनील पांडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.मधमाशी पालन हा शेतीवर आधारित कृषी पुरक उपक्रम आहे. शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग शेतीला पूरक जोडधंदा म्हणून करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध, पोलन, बी व्हेनम, प्रोपोलिस, रॉयल जेली आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची उत्पादने आहेत. विदयार्थी दशेपासूनच शेतीशी निगडित, या व्यवसायाचे महत्व महाविद्यालयातील प्राचार्य डॉ .सुनील पांडे सरानी विद्यार्थाना समजावून सांगितले व मधुमक्षिका पालन करण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच या प्रकल्पाची महत्वपूर्ण माहिती तसेच प्रात्याक्षिके करण्यासबंधीची माहिती श्री विष्णूकुमार जंगले, सचिव, हनी बी केअर क्लस्टर जळगाव व गजानन तिरुमल यांनी महाविद्यालयात देण्यात आली. अशा प्रकारचे विद्यार्थी केंद्रित विविध प्रकल्प महाविद्यालयात प्राणिशास्र विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकारच्या प्रकल्पामुळे विद्यार्थाना प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती मिळते व स्वतःच्या पायावर भविष्यात उभे राहण्यासाठी मार्ग मिळतो. महाविद्यालयातील आशा प्रकारच्या आभ्यासपूरक उपक्रमामुळे विध्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व स्वयंरोजगार भावना विकसित होण्यास मदत होत आहे. सदर कार्यक्रमाला प्राणिशास्र विभाग प्रमुख डॉ. अभय ठाकूर, डॉ. अरुण गवारे, डॉ. चित्रा मोरे, डॉ. प्रवीण ठेंग, डॉ. राहुल उके, प्रा. शुभम साखरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Address

Motala

Telephone

+919922309123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Department of Zoology Shri Shivaji Science college Motala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Department of Zoology Shri Shivaji Science college Motala:

Shortcuts

Share

Category