23/07/2026
शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी
मोर्शी : श्री. शिवाजी ऑडिटोरियम हॉल पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती येथे नॅशनल अबॅकस स्पर्धा 2026 पार पडली.
या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत आव्हानात्मक असून सहा मिनिटांमध्ये 100 गणिती उदाहरणे सोडवायची होती. विद्यार्थ्यांनी आपल्या गणिती कौशल्याची छाप पाडत घवघवीत यश मिळवले व यशाची परंपरा कायम ठेवली.
अवघ्या चार ते पाच मिनिटात 100 गणिते सोडवले .अत्यंत वेगवान मानसिक गणित कौशल्य अचूकता आणि एकाग्रता विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली
या स्पर्धेमध्ये शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, मोर्शी मधील सव्वीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला व आपल्या गणिती कौशल्याची छाप पाडली.
यामधे प्रथम क्रमांक जीनियस लेवल मध्ये दुसरा वर्ग अर्णवी नितीन जाणे, प्रथम क्रमांक तिसरा वर्ग आरुष पंकज गायकी, प्रथम क्रमांक तिसरा वर्ग विशुद्धी नंदकिशोर फंदे, फर्स्ट लेवल प्रथम क्रमांक श्रीरंग शिवाजी जाणे आणि इशिता विद्यानंद जुवारे, दुसरा क्रमांक सानवी नितेश राणे तसेच सेकंड लेव्हल मधून प्रथम क्रमांक धनश्री प्रवीण माटे, दुसरा क्रमांक सानवी सुनील इसळ, तिसरा क्रमांक अनुश्री ओमप्रकाश पांडे, चौथा क्रमांक सुखदा मुरलीधर खंडारकर, पाचवा क्रमांक आनंदी पंकज राऊत.
त्याचप्रमाणे नुरेन खान फिरोज खान, महेश्वर राहुल कुंभारे, श्रीजीत बबन खैरकर, अन्वेया महेंद्र ढोक, आराध्या अजय राऊत, अबोली मिलिंद गडलिंग, रुद्र मंगेश गौरखेडे, आदित्य पंकज राऊत, आराध्य मंगेश रोडगे, अनुश्री राहुल कुंभारे, प्रसन्न बबन खैरकर, त्रितांश राहुल पडोळे, शिवन्या शैलेंद्र सोमवंशी, श्रेयशी योगेश सोळके, परिदि पंकज जयस्वाल, समृद्धी अरविंद बोरकर, हे सर्व विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल चौधरी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले, विद्यार्थ्यांकडून सातत्यपूर्ण सराव करून घेऊन अबॅकस शिक्षिका अर्चना गुल्हाने मॅम यांनी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल चौधरी सर, उपमुख्याध्यापिका प्रीती राऊतकर मॅम, पर्यवेक्षिका ज्योती लाडविकर मॅम, कार्यप्रभारी दीपिका चौधरी मॅम व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.