Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao

Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao

Share

Primary / Secondary school

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 21/10/2025

वार्षिक हिवाळी शिबिर २०२५

डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालय दवर्ली तर्फे श्री विजयादुर्गा मंदिर, केरी येथे आयोजित तीन दिवसीय हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्साह, शिस्त, साहस आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवला. 🏕️

शिबिरात आयोजित प्रार्थना, व्यायाम, खेळ, समूहगीत, प्रबोधनपर सत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, संघभावना आणि अनुशासन ही मूल्ये आत्मसात केली.

शिक्षणाच्या पलीकडचं शिक्षण — व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास!

#हिवाळीशिबिर२०२५

05/09/2025

🌟 A Proud Moment 🌟

It is indeed a proud moment for the Hedgewar Family and for all Goan teachers as Shri Vilas Ramnath Satarkar Sir has been honoured with the National Teachers’ Award 2025, receiving the award from the Hon’ble President of India on the occasion of Teachers’ Day. 🎉👏

Your dedication, passion for teaching, and commitment to shaping young minds have brought great pride not only to our institution but to the entire state of Goa.

Heartfelt congratulations, Sir! 🙏✨
Your achievement inspires us all.

27/08/2025

We extend our heartfelt congratulations to Shri Vilas Ramnath Satarkar Sir , Headmaster Of Dr. K. B. Hedgewar High School, Cujira - Bambolim, Goa on being honored with the prestigious National Teachers’ Award. This remarkable achievement is a testament to your dedication, hard work, and unwavering commitment to shaping young minds and building a brighter future for the nation.

Your passion for teaching and your inspiring guidance have left a lasting impact on countless students, motivating them to strive for excellence. This recognition is not only a proud moment for you but also for all of us who have been fortunate to learn from your wisdom and values.

We wish you continued success, good health, and the strength to keep enlightening many more generations of learners.

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 17/08/2025

डॉ. के ब. हेडगेवार विद्यालय दवर्ली मडगाव तर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे

दवर्ली येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय मडगाव येथे रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग व्यवस्था प्रमुख श्री चंदन फातर्पेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीचे श्री. दिनेश गवंडी, माध्यमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. सर्विष्ठा मोरगावकर व उपाध्यक्ष श्री. उदय घुलवणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनु मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मुलांना आपल्या सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून दिली व हे संस्कार मुलांमध्ये लहान वयातच रुजविले पाहिजे असे मत व्यक्त केले. 'बंधुत्वाचे स्वप्न साकार करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. स्नेहाने आपण सर्वांना जोडले पाहिजे,कितीही संकटे आली तरीही आपले कर्तव्य बजावायला मागे पडू नये' असे उद्गार त्यांनी ह्यावेळी बोलताना काढले.
इयत्ता सातवीची कुमारी लुमेश्वरी वडुले हिने सर्वांना 'जनसेवा ही ईश्वरभक्ती' हे गीत शिकविले. मनामनात बंधुत्वाचे बीज रोवीत सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकमेकांना राख्या बांधल्या.
तद्नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत मडगाव येथील पोलीस स्थानक, पोस्ट ऑफिस, वीज खाते, नगरपालिका इत्यादी कार्यालयांना भेट देत तेथील सर्वांना राख्या बांधल्या. यातून समाजातील विविध स्तरांपर्यंत समतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा अविस्मरणीय क्षण मुलांसाठी आनंददायी होता. मुले ओवाळणी करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. मुलांतर्फे भेट देण्यात आलेल्या कार्यालयांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे, मुख्याध्यापकांचे आणि मुलांचे तोंड भरून कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास शाळेच्या पालक शिक्षक संघाचे विशेष सहकार्य लाभले.

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 17/08/2025

डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय मडगाव येथे गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा

दवर्ली येथील डॉ.के.ब. हेडगेवार विद्यालयात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुगाळी येथील श्रीपाद श्री वल्लभ मंदिराच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अनु मोडक, प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री प्रशांत गुरव, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुलांनी राधाकृष्णाच्या वेषात डॉ. के. ब. हेडगेवार प्राथमिक विद्यालय नेसाय ते मुगाळी येथील श्रीपाद श्री वल्लभ मंदिर पर्यंत आयोजित केलेल्या मिरवणुकीत सहभाग घेतला.

पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुलांसाठी पुस्तक हंडीचेही आयोजन येथे करण्यात आले.

गोपाळकाल्याचे औचित्य साधून इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. के. ब. विद्यालय प्राथमिक विद्यालय नेसाय येथील मैदानावर दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी जल्लोषात दहीहंडी फोडली व कृष्णनामात दंग होऊन गेले.
या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे विशेष सहकार्य लाभले.

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 17/08/2025

डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय दवर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दवर्ली येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त व्यासपीठावर श्री. चिराग नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापक श्री. ब्रिजेश मणेरीकर, डॉ. के. ब. हेडगेवार विदयालय दवर्ली व्यवस्थापन समितीचे श्री. दिनेश गवंडी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनु मोडक, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. सर्विष्ठा मोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथींनी मुलांना स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती दिली. 'मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आपल्याच हातात आहे. स्वातंत्र्यवीरांना व त्यांच्या बलिदानाला नेहमी स्मरावे' असे उद्गार प्रमुख पाहुण्यांनी याप्रसंगी बोलताना काढले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये मुलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला व आपली कला सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
शिक्षिका दिक्षा घाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शिक्षक संकेत सिनाई पावसो यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 17/08/2025

डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय दवर्ली तर्फे मशाल मिरवणूक उत्साहात

दवर्ली येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय तर्फे स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे मशाल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणूकीत इयत्ता ४थी ते इयत्ता ९वी च्या मुलांनी, पालकवर्ग, शिक्षकवर्गाने भाग घेतला.

पथकाने मडगाव येथील हरी मंदिरकडून लोहिया मैदानकडे कुूच केले. भारतमातेच्या जयजयकाराने संपूर्ण मडगाव परिसर दणाणून गेला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भाजप पक्ष गोवाचे अध्यक्ष माननीय दामू नाईक उपस्थित होते. तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक श्री. ब्रिजेश मणेरीकर, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, दवर्लीचे श्री. दिनेश गवंडी, मुख्याध्यापिका अनु मोडक शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. सर्विष्ठा मोरगावकर, प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत गुरव उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांनी अखंड भारताची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. 'एक दिया वीरों के लिए' या योजनेत अंतर्गत मुलांनी पालकांसोबत स्मारकाजवळ पणत्या प्रज्वलित केल्या. संपूर्ण वंदे मातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Photos from Dr K B Hedgewar Vidyalaya, Margao's post 16/08/2025

कृष्ण-राधा वेशभूषेत लहानग्यांची मिरवणूक नेसायमध्ये रंगली

डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, नेसाय येथे जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतून श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, रामनगरी येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्राथमिक व पूर्वप्राथमिक विभागातील लहानग्यांनी कृष्ण-राधा यांच्या देखण्या वेशभूषेत सहभाग नोंदवून सर्वांचे मन मोहून टाकले. मोठ्या संख्येने पालकांनीही मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मिरवणूक श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानाच्या आवारात संपन्न झाली. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी "पुस्तक हंडी" हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली.

09/08/2025

Dr. K B Hedgewar High School, Davorli won 1st Consultation Prize in Patriotic Group Singing Competition organised by Bal Bhavan Campal - Goa.

Want your school to be the top-listed School/college in MARGAO?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Zariwadda, Dhavorlim
Margao
403601

Opening Hours

Monday 8am - 1:30pm
Tuesday 8am - 1:30pm
Wednesday 8am - 1:30pm
Thursday 8am - 1:30pm
Friday 8am - 1:30pm
Saturday 8am - 12pm