Renuka secondary &Higher secondary school Manur tq.shirur -ka Dist.Beed

  • Home
  • India
  • Manur
  • Renuka secondary &Higher secondary school Manur tq.shirur -ka Dist.Beed

Renuka secondary &Higher secondary school  Manur tq.shirur -ka Dist.Beed नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर
शाखा
रेणुका मा .व उच्च मा. विद्यालय मानूर ता. शिरूर का.जिं .बीड

16/08/2026
15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष  #गुरुशिवाचार्य म...
16/08/2026

15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष #गुरुशिवाचार्य महाराज मानूरकर व रेणुका माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य #श्रीपाखरे सर कार्यक्रमाचे काही क्षणचित्र

उद्या दिनांक 15  #ऑगस्ट 2026 रोजी आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त खालील प्रमाणे रूपरेषा आहे.
14/08/2026

उद्या दिनांक 15 #ऑगस्ट 2026 रोजी आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त खालील प्रमाणे रूपरेषा आहे.

आज शाळेतील अनाथ मुलांना गणवेश मु. अ. व शिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
14/08/2026

आज शाळेतील अनाथ मुलांना गणवेश मु. अ. व शिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

आज दिनांक 13/08/2026 रोजी तिरंगा रॅली  उत्साहात काढण्यात आली त्यानिमित्ताने काही छायाचित्र
13/08/2026

आज दिनांक 13/08/2026 रोजी तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली त्यानिमित्ताने काही छायाचित्र

🌹 *पंढरीवारी व्रत* 🌹आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानूर आषाढी एकादशीनिमित्त दिंडी...
25/07/2026

🌹 *पंढरीवारी व्रत* 🌹

आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानूर आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने काही छायाचित्र व एकादशीचे महात्म्य खालील प्रमाणे आहे
---------------------------------------------------
---------------------------------------------------

पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शु. एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शु. एकादशीस करतात., आणि पंढरपूर हे वारकर्‍यांच्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्य पीठ आहे. त्यामुळे आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात. या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.

*पंढरीचे अनादित्व -*

*'जेव्हा नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ।*
*जेव्हां नव्हती गोदागंगा । तेव्हां होती चंद्रभागा ।'*

पुंडलीकाची मातृपितृभक्ती पाहून भीमेच्या काठी लोहखंडक्षेत्री (पंढरपुरात रुक्मिणीसह श्रीकृष्ण आले, याचा उल्लेख 'पद्मपुराणा'त आढळतो तो असा-

*'ततो निवृत्त आयातः पश्यन् भीमरथीतटे ।*
*द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भक्तिमुक्तिप्रदायकम् ।'*

स्कंदपुराणात -

*'श्रीगुरुं विठ्ठलानंदं परात्परजगत्प्रभुम् ।'*

श्रीरामचंद्र पंढरपुरात आले होते असे वर्णन असून;

*'पांडुरंग नमस्कृत्य चंद्रभागां विगाह्य च।'*

त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान केले असा 'आनंदरामायणा'त निर्देश आहे.

*'तत्र श्रीविठ्ठलं देवं प्रियाभ्यां सहशोभितम् ।'*

असे 'करवीर महात्म्या'त स्पष्ट म्हटले आहे. म्हणून पंढरपुरास भूलोकीचे वैकुंठ व दक्षिणेची काशी असे म्हणतात. तेव्हा पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनास वारीच्या रूपाने जाणे कलियुगातील महातेजस्वी, प्रभावी व मोक्षदायक आहे. यासाठी पंढरीची वारी करतात. फल-मोक्षप्राप्ती.
पंढरीची वारी वार्षिक, सहामाही, दरमहिन्याची, पंधरवड्याची, दररोजची, जशी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली असेल तशी, करतात. ही वारी पायीच केली पाहिजे. त्यामुळे शाररिक तप घडते, अशी समजूत असल्याने पायी वारीस अधिक महत्व आहे.
वारीची प्रथा - दर महिन्याच्या वारीस येणार्‍यांचे नित्यनेम कार्यक्रम :
दर महिन्याच्या शु. दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून' कालाप्रसाद ' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.
निष्ठावंत वारकर्‍यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्‌गीता, काहींच्याबरोबर तुळशीवृंदावन ही असतात.

*'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।'* असे वारकर्‍याचे ब्रीद आहे.

*'रामकृष्ण हरि '* हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्‍यांची बोधचिन्हे होत. वारी करणार्‍यांना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते. गुरू माळ देताना शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम :-

(१) खरे बोलणे,

(२) परस्त्री मातेसमान मानणे,

(३) काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना करणे,

(४) मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,

(५) दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,

(६) वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,

(७) नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,

(८) नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्‍वरीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि

(९) प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार पाडणे.

१०) कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक समजतात.
🌹 *वास्तू निक्षेप* 🌹

---------------------------------------------------
---------------------------------------------------

महाराष्ट्रात जे वास्तु शांती विषयक ग्रंथ आहेत त्या सर्वांमध्ये आग्नेय दिशा सांगितलेली आहे . परंतु मूळ वास्तू ग्रंथ किंवा विश्वकर्माच्या ग्रंथामध्ये वास्तुशांती करताना निक्षेप मुखाची दिशा कुठे असावी ते सांगितलेले आहे .

*भाद्राश्वयुजकार्तिकेषु पूर्वशीर्षा प्रकीर्तिता।*
*मार्गपौषमाघमासेषु दक्षिणाशिरसा स्थिता॥*
*फाल्गुनचैत्रवैशाखेषु पश्चिमाशिरसा स्थिता।*
*ज्येष्ठाषाढश्रावणेषु उत्तराशिरसा स्मृता॥*

भाद्रपद, आश्विन, कार्तिक या महिन्यांत वास्तुपुरुषाचे शिर पूर्वेला असते.
मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यांत दक्षिणेला असते.
फाल्गुन, चैत्र, वैशाख या महिन्यांत पश्चिमेला असते.
ज्येष्ठ, आषाढ, श्रावण या महिन्यांत उत्तरेला असते 🌹 *श्री विठ्ठल* 🌹

*भाग ६*

---------------------------------------------------
---------------------------------------------------

पंढरपुरात विठोबा आणि रखुमाई वेगवेगळ्या देवळांत आहेत एकत्र नाहीत, रुक्मिणीचा रूसवा काढण्यासाठी कृष्ण पंढरपुरात आला, ही पंढरपुरातील विठ्ठल-प्रकटनाची कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आल्याचाही उल्लेख आला आहे. ही रुक्मिणी म्हणजेच पंढरपुरातल्या दिंडीरवनात जिचे मंदिरे आहे, ती लखूबाई होय, असेही समजतात. पद्मावतीचे वा पदूबाईचेही मंदिर पंढरपुरात आहे. पदूबाई आणि लखूबाई ह्या दोन्ही देवता तेथे तांदळ्यां च्या रूपांत पूजिल्या जात आहेत. त्या लोकदेवता आहेत. लखूबाई हे लक्ष्मीचे ग्रामीण मराठी रूप आहे. मेंढ्या आणि गुरे ह्यांच्या रूपाने येणाऱ्या श्रीमंतीची ती देवता आहे. ही देवी मेंढवाड्यात राहते अशी भावना असल्यामुळे तिथे वहाणा घालून जात नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड येथे दसऱ्याच्या सुमारास होणाऱ्या धनगरांच्या हुईकाचा (भविष्यकथनाचा) डॉ. प्रभाकर मांडे ह्यांनी एक विस्तृत वृत्तांत लिहिला असून त्यात त्यांनी हुईकापूर्वीच्या म्हटल्या जाणाऱ्या काही धनगरी ओव्याही दिल्या आहेत. त्यांत विठोबाचा उल्लेख असून ‘भक्त कुंडलिका’साठी (म्हणजेच पुंडलिकासाठी) विठोबा पंढरपुरी अठ्ठावीस युगे उभा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर देवाच्या धनगर-भक्तांचे जे उल्लेख आले आहेत त्यांत ‘राजोबा म्हाळोबा भक्त गेले होऊन’ असे म्हटले आहे. त्यांपैकी म्हाळोबा म्हणजेच म्हाळिंगराय वा महालिंगराय असल्याचे चटकन सुचित होते. म्हाळिंगराय पदूबाईच्या कथेत आलेला आहेच.
विठ्ठल हा गोपजनांचा देव आहे, असे मत विठ्ठलाच्या अभ्यासक्षेत्रात प्रथम दुर्गा भागवत ह्यांनी मांडले, डॉ, जी. ए. दलरी आणि ग्यंथर सोनथायमर ह्यांनी त्या दिशेने काम केले. डॉ. ढेरे ह्यांनी ह्याच दिशेने विपुल आणि सखोल संशोधन करून श्रीविठ्ठल : एक महासमन्वय (१९८४) हा आपला ग्रंथ लिहिला.

*विठोबाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण*

विठोबा हा मूळ एक लोकदेव असला, तरी अन्य अनेक लोकदैवतांप्रमाणे त्याची कीर्ती मर्यादित न राहता ती सतत वाढत गेली. इतकी, की समाजातल्या शास्त्री-पंडितांना त्याला शास्त्रप्रतिष्ठा देणे भाग पडले आणि त्या दृष्टीने विठ्ठलाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण घडवून आणण्यात आले. ही प्रक्रिया संतांच्या उदयापूर्वी सुरू झाली आणि आजही ती चालू आहे, असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या मते, पंढरपुरची स्थळपुराणे प्रसिद्ध असलेल्या तीन संस्कृत
पांडुरंगमाहात्म्यां ची रचना हा ह्या प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग होय. ही माहात्म्ये रचताना अनेक लोककथांना पुराणकथांचे रूप देण्यात आले.
श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृताचे आणि
चांगदेवपासष्टी चे संस्कृतात रूपांतर करण्यात आले. विठोबाला वैदिक वलय प्राप्त करून देण्यासाठी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ‘द्वे विरूपे चरतः . . .’ अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या पंचाण्णवाव्या सूक्ताचा अर्थ विठ्ठलपर लावण्याचाही प्रयत्न पंढरपूर येथील एक धर्मपंडित काशीनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये ह्यांच्या विठ्ठलऋङ्मंत्रसारमाष्य ह्या ग्रंथात करण्यात आलेला आहे. विठ्ठलशास्त्री धारूरकर ह्यांनी आपल्या पंढरीतत्त्वविवेक ह्या मराठी ग्रंथात ऋग्वेदाच्या उपर्युक्त पंचाण्णावाव्या सूक्तातील पाच ऋचांचा विठ्ठलपर अर्थ दिला आहे. आपला ग्रंथ लिहिताना त्यांनी विठ्ठल
ऋङ्मंत्रसारभाष्या चा आधार घेतला आहे. ‘द्वे विरुपे . . .’ ह्या ऋचेचा आशय मराठी अनुवादात असाः ‘भिन्न रूपांच्या दोघी (रात्री आणि उषा) आपापल्या कामाविषयी तप्तर होऊन भ्रमण करीत असतात. (त्या) एकमेकी एकमेकींच्या बाळांना स्तनात करवितात. एकीच्या जवळ पीतवर्णाचा (बालक) तेजस्वी होतो, दुसरीच्या जवळ निर्मळ कांतीचा (बालक) महातेजस्वी दिसू लागतो.
पंढरीतत्त्वसतविषेकात ह्या ऋचेच्या पदांच्या विठ्ठलपर अर्थ लावून दिलेला प्राकृतार्थ असा आहे: ‘सुस्वरूप अशा दोन भगवंताच्या मूर्ती आपल्या भक्तांस मोक्ष देण्याकरिता, पुंडरिकाचे आश्रमाचे ठायी संचार करितात आणि परस्परसंमुख होऊन आपला वत्स (जो पुंडरीक) त्यास सादर पाहतात. आता दोन मूर्तीपैकी हरी ही भक्तजनांच्या भावबंधनाचा नाश करणारी अशी तीर्थरूपाने आहे.(ह्या अभिप्रायास अनुसरून तुकाराम एका अभंगात म्हणतात : ‘ तुका म्हणे चंद्रभागा । स्वरूप तुझे पांडुरंग ’।।) व दुसरी शुक्रः (पांडुरंग) रूपाने राहिलेली आहे, जीस सर्व लोक पाहतात. ’
श्रीगोपाळाचार्य ह्या नावाच्या एका वैष्णव शास्त्र्यांनी श्रीमद्विठ्ठलभूषण ही सात पानांची पोथीस लिहिली आहे. तीत निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील विठ्ठलविषयक संदर्भ संग्रहीत आहेत. ‘द्वे विरूपे…’ हे ऋग्वेदातील सूक्त ह्या पोथीही विठ्ठलपर लावून दाखविलेले आहे. ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् लाति गृहणाति विठ्ठलः ’म्हणजे‘जो अज्ञ जनांचा ज्ञानाने स्वीकार करतो, तो विठ्ठल ’-अशी विठ्ठल ह्या नामाची निरूक्ती ह्या पोथीत दिलेली आहे. भगवद् गीते प्रमाणेच अठरा अध्याय, अठरा योग, तीन कांडे आणि सातशे श्लोक असलेली एक विठ्ठलगीताही रचण्यात आली आहे. ती संस्कृतात असून तीवर ओवीबद्ध मराठी विवरणही दिलेले आहे. तिचा कर्ता अज्ञात आहे पण ‘श्रीसिद्धानुसार’ असा त्याने स्वतःचा निर्देश दोन ठिकाणी केलेला दिसतो. गीता हा कृष्णार्जुनसंवाद आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलगीता हा विठ्ठल आणि तुल्येंद्र ह्यांच्यातील संवाद आहे.
विठ्ठलगीतेच्या पहिल्या अध्यायात विठ्ठल ह्या नावाच्या काही व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत. त्यांत ‘विदा ज्ञानेन….’ही आहेच. मात्र येथे ती ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् भक्तिहीनान् लाति गृहणातीति विठ्ठलः ’अशी दिलेली आहे. श्रीविठ्ठलप्रतिष्ठा हे नाव दिलेल्या एका हस्तलिखितात श्रीविठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी समंत्रक विधिविधान सांगितले आहे. विठ्ठलपंचरत्न ह्या नावाने पाच संस्कृत स्तोत्रांचा समुच्चय ओळखला जातो. विठ्ठल हा विष्णू असल्याची स्पष्ट जाणीव
श्रीविठ्ठप्रतिष्ठा आणि विठ्ठलपंचरत्नां पैकी
विठ्ठलकवच ह्या,तसेच विठ्ठलसहस्रनाम ह्या स्तोत्रांत दिसते. आद्य शंकराचार्यांच्या नावावर पांडुरंगाष्टक हे स्तोत्र मोडते .
श्रीपांडुरंगमंत्रजप ह्या हस्तलिखितात विठ्ठलास ‘यज्ञरूप’ आणि ‘यज्ञभोक्ता’ अशी विशेषणे लावलेली आहेत. श्रीविठ्ठलाच्या प्रसादासाठी महादेव यादवाचा मांडलिक असलेला कोणी केशव ह्याचा पुत्र भानू ह्याने पंढरपुरात आप्तोर्याम महायज्ञ केला, असे पंढरपुरातीलच एका कोरीव लेखावरून दिसून येते. पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या प्रीत्यार्थ आणखीही यज्ञ झाले आहेत. विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाल्यामुळे विष्णुयागही झाले आहेत.
परमविष्णुभक्त पुंडलिक ह्याच्यासाठी वैकुंठाचा देव विष्णू हा पंढरपुरी आला, असे मानले जाते. पंढरपुरात पुंडलिकाचे मंदिरही आहे तथापि पंढरपुरातील पुंडलिकमंदिर वार्षिक उत्सवही होतो. पुंडलिककथा इतिहासात सापडत नाही ती पुराणांत सापडते. पुंडलीक हा मुळात पुंडरीकेश्वर होता. संक्षेपाने त्याला पुंडरिक म्हटले जात होते आणि जाते. स्कंदपुराण ,
पद्मपुराण, नृसिंहपुराण अशा पुराणांतून विष्णुभक्त पुंडरिकाच्या कथा आलेल्या आहेत, परंतु पुराणांमधील पुंडरीक हा पंढरपूरचा पुंडरिक नाही. पुराणांताल पुंडरीक-कथांच्या प्रभावाच्या आधारे, विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत, पंढरपूर येथील पुंडलिकाची वा पुंडरिकाची कथा उभी करण्यात आली, असेडॉ. रा. चि. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. डिंडीरव वनातील (दिंडीरवनातील) डिंडीरवनामक दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुनाचे (शिवाचे) रूप घेतले, अशी कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे. पंढरपुरात मल्लिकार्जुनाचे पुरातन मंदिर आहेच. येथे मल्लिकार्जुनाचे शिवरूप आहे, असे सांगितले गेले. पंढरपूरच्या पूर्वेस नदीकाठी दिंडीरवनात लखूबाईचे मंदिर आहे. तिलाच कृष्णावर रूसून पंढरपुरी आलेली रूक्मिणी मानले जाते. पद्मावती तीर्थाची कथाही वर दिलेली आहे. विठ्ठलाचे वैष्णवीकरण करण्याच्या प्रक्रियेचाच हा भाग होय.
विठ्ठलाचे वैष्णवीकरण होण्यापूर्वी पंढरपूरचा विठ्ठल काही काळ शिवरूप झाला होता, असे डॉ. माणिकराव धनपलवार ह्यांचे मत आहे. पंढरपूर हे मुळात पुंडलिकपूर असून तिरूवारूर आणि चिदंबरम् ह्या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्रांचे पर्यायी नाव ‘पंडरीकपूर’असेच आहे, हे अन्य काही प्रमाणांसह ह्या संदर्भात निदर्शनास आणतात. तथापि पंढरपूर हे पुंडरीकेश्वरामुळे पुंडरीकपूर झाले, पंढरीचा तोच मूळ अधिष्ठाता देव होता. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तो विठ्ठलाच्या परिवारात समाविष्ट झाला परंतु पंढरपूरचा विठ्ठल हा मात्र शिव बनलेला नव्हता, असे डॉ. ढेरे ह्यांचे मत आहे. डॉ. ढेरे असेही दाखवून देतात, की विठोबाच्या उन्नयप्रक्रियेत प्रथम विठोबाचे शैवीकरण होते आणि नंतर वैष्णवीकरण होते, असा सार्वत्रिक नियम नाही. 🌹 *श्रीविठ्ठल* 🌹

*भाग ७*

---------------------------------------------------
---------------------------------------------------

*विठोबा आणि वेंकटेश*

पंढरपूरचा विठोबा आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील वेंकटेश ह्या दोन देवांमधील साम्य लक्षणीय आहे. विठोबाप्रमाणेच वेंकटेश हा हाती शस्त्र नसलेला आणि मौनी आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठोबाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. विठोबाच्या संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांप्रमाणेच वेंकटेशाशी संबंधित अशा तिरूमलाईचीही संस्कृत माहात्म्ये आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी विठोबा पंढरपूरला आला. त्याचप्रमाणे वेंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आला. तेथे त्याने पद्मतीर्थ खोदले व त्यातून पद्मावती (जी वेंकटेशाही पत्नी आहे) प्रगट झाली, अशी कथा सांगितली जाते. विठोबा आणि वेंकटेश ह्या दोन्ही देवांना कांबळे अत्यंत प्रिय आहे आणि दोन्ही देवांच्या पावित्र्यसंमारंभात चिंचेच्या झाडांना फार महत्त्व आहे. वेंकटेश हा वेंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाला, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते. वेंकटेश आणि विठोबा ह्यांच्यातील साम्य लक्षात घेता, हे दोन्ही देव एकाच लोकदेवाची (विठ्ठल-वीरप्पाची) दोन वेगवेगळी, पण एकमेकांशी लक्षणीय साम्यही राखून असलेली उन्नत रूपे असली पाहिजेत असे डॉ. ढेरे ह्यांच्यासारख्या अभ्यासकांना वाटते. विठ्ठल-वीरप्पा ह्या जोडदेवाचाही चिंचेच्या झाडाशी संबंध आहे. विठ्ठल-वीरप्पा हा जोडदेव पहिल्यांदा पट्टणकोडोलीला आला, तेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला, अशी धनगरांची श्रद्धा आहे. एका धनगरी कथेनुसार विठ्ठलाची पत्नी विठ्ठलावर रूसून वनात गेली आणि चिंचेच्या बुंध्यापाशी येऊन गतप्राण झाली. वेंकटेशाची उपासना आज श्रीनिवास किंवा विष्णू म्हणून केली जाते परंतु साडेसातशे वर्षांपूर्वी वेंकटेश हा वीरभद्र म्हणून पूजला जात होता, असा वीरशैष पंथां च्या अनुयायांचा दावा आहे . आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्रात वीरशैव पंथीयांमध्ये वीरभद्र उपासना केली जाते. वीरशैव पंथांचा प्रभाव वाढला, तेव्हा दक्षिण भारतातील गोपजन हे वीरशैव बनले व त्यांच्या प्रिय दैवताचे-वीरप्पाचे-वीरभद्रीकरण त्यांच्या मूळच्यादेवाला त्यांनी नव्याने स्वीकारलेल्या श्रद्धाविश्वात प्रतिष्ठित करण्यासाठी वीरशैवांनी घडवून आणले. असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे. अशी संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठोबाचे (रूक्मिणीसह वा तिच्यावाचून) चित्र दाखविलेले दिसते . *आषाढी एकादशी*
---------------------------------------------------

आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला उस्थापनी ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव व पशु यातील महत्त्वाचा फरक निती अनितीचे परिक्षण करणारी बुद्धि हाच म्हणावा लागेल. " परोपकाराय पुण्याय " हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे. याची कमीअधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते. आपणास प्रयत्नपुर्वक या सन्मार्गदायक महासुत्राचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वभाविक चंचलता कमी करुन सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे. उपनिषदांचे मत शरीर रथ, इन्द्रिय घोडे व मन लगाम आहे , त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल. दहा इन्द्रियांनंतर मनास अकरावे इन्द्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे, म्हणून एकादशीस ( अकराव्या तिथीस) भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती , सांसारीक सुख हा प्रामुख्याने हेतु असतो. व अशाप्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो. उदिष्ठपुर्तीसाठी दैवीउपासना हे त्यांचे लक्ष असते. मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणा-या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगिण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे.
आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते, जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते. एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरु करुन एकादशीस पूर्ण दिवस उपवास करुन व्दादशीस महानैवेद्य दाखवून उपास सोडावा.
प्रातःस्मरणीय तुकाराम महाराजांचे एकादशी संदर्भातील पुढील अभंग या संदर्भात प्रेरणादायी आहेत-
*एकादशीस अन्न पान। जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान। अधम जन तो एक॥*
*ऎका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन। ते समान विष्णूशी॥*
*अशुद्ध विटालशींचे खळ । विडा भक्षिंती तांबूल। सांपडे सबळ। काळाहातीं न सुटे॥*
*शेज बाज विलास भोग । करि कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग। जन्मव्याधी बळिवंत॥*
*आपण न वजे हरिकिर्तन। आणिकां वारी जातां जन। त्याच्या पापा जाणा। ठेंगणा महामेरु तो॥*
*तया दंडी यमदूत। झाले तयाचे अंकित। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलीया॥*
एकादशीचे व्रतमाहात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकिर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात.
श्रीविठ्ठला बद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठठलाचे प्रेमस्वरुप नाम ॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ येणा-या प्रत्येकावर समानभावाने प्रेमकरणारा व भवसिंधु तरुन जाण्यास तळमळीने साह्यभुत होणारा विठठल हाच सकालांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे, व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते. अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहजस्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अघमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत. कलीयुगात अशा ज्ञातअज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रभावानेच सन्मार्गाने जाणा-यांना अपयशाच्या महाद्वारात उभे राहूनही हरिनिष्ठ राहण्याचे अभेद्य बळ मिळत असते. यशापयशाच्या आलेखावरुन आपल्या भक्तिचे किंवा इश्वरीकृपेचे मुल्यांकन आपण करु शकत नाही. मनातील असंतुलीत आंदोलने, अनामिक भय, सर्वसाधनसंपत्तीने सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत असमाधानाचे बीजारोपण, या लक्षणांच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबवणे हे आपले उदिष्ठ असणे अगत्याचे आहे. 🌹 * आषाढी एकादशी* 🌹

*भाग ६*

--------------
---------------------------------------------------

*इतिहास*

‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.

*व्रत करण्याची पद्धत*

आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

*पंढरपूरची वारी*

हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.
चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते.
सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे..
*ज्यास मान्य एकादशी। तो जिताची मुक्तवासी।*
किंवा
*एकादशी, एकादशी। जया छंद अहर्निशी*
*व्रत करी जो नेमाने। तथ वैकुंठाचे पणे*
*नामस्मरण जाग्रण। वाचे गाय नारायण*
*तोचि भक्त सत्य याचा। एका जनार्दन म्हणे वाचा।*
पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे *अश्वेमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।*
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही म्हणजे ६ टक्के इतकेही महत्त्व नाही .आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे, तर एकादशीपासून लाभतरी नेमका कोणता होतो ? पद्मपुराणामध्ये पुढे म्हटलेले आहे
*स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी । सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी । न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।*
- पद्मपुराण आदिखंड
अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे . गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही . एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करतांना, व्रतारंभ करतांना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही, यावरून आपल्याला लक्षात आले असेल की, संकल्प न करतासुद्धा म्हणजे विधीवत् ईश्वराला न सांगतासुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्त पाणी व सुंठ-साखर घेतल्यास सर्वोत्तम होय. या दिवशी विष्णुपुजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसर्यां दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात.

*आषाढी एकादशी*

वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो . भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्तीग अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीतला ईश्वरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत.

*आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास*

पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे 🌹 * आषाढी एकादशी* 🌹

*भाग ७*

--------------
---------------------------------------------------

*लक्षप्रदक्षिणा व्रत*

आषाढ शु. एकादशी, द्वादशी, किंवा पौर्णिमा या दिवशी या व्रताचा आरंभ करतात. अग्नी, गाय, ब्राह्मण, औदुंबर, गुरुचरित्र, अश्‍वत्थ, तुळस किंवा मारूती यांना वेगवेगळ्या कारणासाठी लक्ष प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. व्रताचा संकल्प करून गुरूला व गणपतीला नमस्कार केल्यावर प्रथम अग्नीला प्रदक्षिणा घालाव्या. तो लक्ष पुरा झाल्यावर , गोलक्ष-प्रदक्षिणा पुर्‍या कराव्या. तदनंतर ब्राह्मण व मग हनुमंत यांच्या प्रत्येकी लक्ष प्रदक्षिणा पुर्‍या कराव्या. नंतर चारही प्रदक्षिणांचे उद्यापन एकदम करावे. उद्यापनाच्या वेळी चौघांच्याही सोन्याच्या प्रतिमा करून लिंगतोभद्रमंडलावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात त्यांची स्थापना करावी. नंतर पायसान्नाचे हवन करावे. प्रतिमा दान करुन यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करावी. पिंपळ वड, इ. वृक्षांनाही अशाच प्रकारे लक्ष प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे.
विष्णूलाही एक लक्ष प्रदक्षिंणा घालतात. या व्रताला आषाढ शु. एकादशीला प्रारंभ करुन कार्तिक शु. एकादशीला त्याची समाप्ती करतात. नित्य
*'कृष्णाय वासुदेवाय हर्ये परमांत्मने '*
किंवा
*'केशवाय नमः'*
या मंत्राचा उच्चार करीत प्रदक्षिणा घालायच्या असतात. ब्राह्मणभोजन घालून व्रताचे उद्यापन करतात. फल- पापनाश व सुखप्राप्ती.
-------------------

*शुक्लैकादशी*

या आषाढ शु. एकादशीचे नाव 'देवशयनी' या दिवशी उपवास करावा. सुवर्ण, चांदी, तांबे, पितळ यांच्या मूर्ती करून त्यांची यथाविधी पूजा करुन त्यास पीतांबर नेसवावा आणि शुभ्र वस्त्राने आच्छादित गादी आदींनी सुशोभित पलंगावर झोपवावे. त्या दिवसापासून चार महिनेपर्यंत आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करावा. उदा. मधुरस्वरासाठी 'गूळ' पुत्रपौत्रादी सुखासाठी 'तेल' शत्रुनाशासाठी 'कडू तेल' सौभाग्यवर्धनासाठी ' गोड तेल', वंशवृद्धीसाठी 'दूध' व सर्वपापाक्षयार्थ 'एकभुक्त, नक्त , अयाचित' व्रत किंवा उपवास करावा. जर या चार महिन्यांत दुसर्‍यांनी दिलेले पदार्थ भक्षण करण्याचा त्याग केला आणि वरीलपैकी एखादे जरी व्रत केले तरी महाफल मिळते. यास 🌹 *पंढरी महात्म्य* 🌹

*भाग १*

------------------------------------------------
------------------------------------------------

॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--
हें नव्हें आजिकालिचें ॥ युग अठठाविसांचे ॥ मन निर्ध्दारितां साचें ॥ हा मृत्यु लोकुचि नव्हे ॥ हाचि मानि रे निर्धारु ॥
यरु मांडि रे विचारु ॥ जरि तू पाहसी परात्परु ॥ तरि तूं जारे पंढरीय ॥१॥
बाप तीर्थ पंढरी ॥ भूवैकुंठ महीवरी ॥ भक्ता पुंडलिकाचे द्वारी ॥ कर कटावरी राहिला ॥धृ०॥
काशी आशी अयोध्याकांती ॥ मथुरा गया गोमति ॥ ऐसी तीर्थे इत्यादिक आहेती ॥ परि सरि नपवती पांडुरंगी ॥ हाचि मनी
रे विश्वासु ॥ यर सांडि रे हव्यासु ॥ जरि तूं पहासि वैकुंठवासु ॥ तरि तूं जाय पंढरीये ॥

मानूर (विशेष प्रतिनिधी):स्थानिक रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानूर येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे थोर नेते,...
23/07/2026

मानूर (विशेष प्रतिनिधी):
स्थानिक रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानूर येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे थोर नेते, 'भारतीय असंतोषाचे जनक' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक होते. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
​विद्यार्थ्यांचे भाषण व वक्तृत्व
​याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर विचार मांडले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या प्रसिद्ध सिंहगर्जनेची आठवण विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून ताजी केली. लोकमान्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती आणि ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे केलेली जनजागृती याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
​शिक्षकांचे मार्गदर्शन
​शाळेतील प्रमुख शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते एक थोर विचारवंत, पत्रकार आणि समाजसुधारक होते. आजच्या तरुण पिढीने त्यांच्यातील राष्ट्रभक्ती, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि अभ्यासू वृत्ती यांचा आदर्श घेतला पाहिजे.
​कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

*मानूर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न* युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारचे माय युवा भारत बीड व रे...
13/03/2026

*मानूर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न* युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारचे माय युवा भारत बीड व रेणुका माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय मानूर यांच्या संयुक्त विद्यमाने 1008 गुरु विरुविरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांच्या आशीर्वादाने,जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानूर तालुका शिरूर कासार येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कबड्डी, 100 मीटर धावणे,200 मीटर धावणे, गोळा फेक अशा मुला- मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या युवकांच्या मनात विविध खेळ खेळण्याची भावना जागृत व्हावी हा प्रमुख उद्देश प्रतियोगीतेचा होता. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पी.जी पाखरे, श्रीकृष्ण मुरकुटे, मानूर गावचे उपसरपंच ए. व्ही. बनसोडे एन के खेडकर, के डी जायभाये, नितीन कणके, बाळासाहेब दहिफळे, शिवनाथ देशमुख अक्षय उदावंत, पेशाकर ए.बी, जी व्ही गायकवाड,व्ही पी शिरसाठ, आर एल शिंदे, आर आर गायकवाड, काकडे सर, गुरुस्तुळकर रामराजा, पुराणिक स्वामी (कनिष्ठ लिपिक ) विकास पारखे, उद्धव खेडकर आदी सह क्रीडा स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विजेते स्पर्धक अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय गोळा फेक मुली 1. वैष्णवी पाखरे,2 उषा जाधव,3 आरती सरोदे मुले 1 संस्कार बडे,2 वेदांत शिरसाठ,3 समर्थ कदम 100 मीटर धावणे मुली 1 उषा जाधव,2 पूजा बडे, 3 श्रुती सरोदे 200 मीटर धावणे मुले 1 रोहित ढवळे,2 यश शिंदे,3 सार्थक ढवळे कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सहारा क्लब तर रस्सीखेच मध्ये प्रथम संघ रेणुका क्रीडा मंडळ यांनी मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

02/02/2026

Address

Manur

Telephone

+919420787022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renuka secondary &Higher secondary school Manur tq.shirur -ka Dist.Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category