14/08/2024
भारत सरकारच्या हर-घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत, आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जी.एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा, रायगड येथे भारतीय ध्वज फडकवण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. आपल्या भारताचा ध्वज फडकवण्यासाठी निवडले जाणे हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सन्मान आहे, आणि या अनमोल संधीसाठी मी गोपीनाथ महादेव प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मा. डॉ. नंदकुमार वेदक साहेब आणि मा. उन्मेषजी वेदक साहेब तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. डॉ. नानासाहेब यादव व रायगड भूषण मा. पुरुषोत्तम मुळे सर,यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
तसेच माझ्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
प्रा. जयदीप व्ही. देवरे
प्रभारी प्राचार्य,
विभाग प्रमुख, रसायनशास्त्र
जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा-रायगड