28/02/2022
*उदयसिंह मोहिते- पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा....*
चंद्रशेखर वेंकट रमण यांचा ऐतिहासिक शोध 'रमण प्रभाव' या संशोधनाच्या
स्मरणार्थ 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' दर वर्षी प्रमाणे या वर्षी *शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज संचलित उदयसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा* येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थी अतिशय उत्साहात सहभागी झाले. यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विज्ञानाशी संबंधित रांगोळी, वक्तृत्व अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे प्रदर्शन केले व स्पष्टीकरणे देऊन प्रयोग सादर केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. यामध्ये 98 प्रयोग विद्यार्थ्याकडून सादर करण्यात आले. सर्वांचाच उस्फुर्त सहभाग होता
या कार्यक्रमासाठी
मा.डॉ.सिद्धेश्वर ज्ञानेश्वर जाधव (असिस्टंट प्रोफेसर, रसायनशास्त्र, विलिंग्डन कॉलेज, सांगली) व मा.डॉ. अरविंद कुंभार (प्राचार्य- मदन सिंह मोहिते- पाटील विज्ञान महाविद्यालय ) उपस्थित होते. डॉ.जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले 'मोबाईल वापरताय पण त्याचा तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी उपयोग करा', शहरातील मुलांपेक्षा आपल्या खेड्यातील मुले झगडून अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचतात, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा'.या शब्दात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमासाठी शाळेचे पालक संचालक मा. डाॅ.विश्वनाथ आवड सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. विजय बुरकुल सर , मा. प्राचार्य सुधीर पवार सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले .