20/12/2025
आज दिनांक *20/12/2025* वार *शनिवारला* *ध.शि.स.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धरणगाव* येथे माननीय *श्री.विलासभाऊ पाटील यांचा 76 वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा* माजी प्राचार्य ज्ञा.के.इंगळे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.आमदार एकनाथरावजी खडसे ( माजी विरोधी पक्षनेता), श्री ह.द पाटील ( माजी शिक्षक लि.भो. चांडक विद्यालय) श्री संजयभाऊ काजळे ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर) माननीय सचिन तायडे साहेब (उपकार्यकारी अधिकारी सा.बा.वि खामगाव) मा.श्री.नागोजी राणे (उपाध्यक्ष कृ.उ.बा.समिती) , मा.,श्री.योगेश पाटील, श्री अरुण अग्रवाल श्री मनीष भाऊ लखानी श्री राजूभाऊ कोचर ,, मा. बंडूभाऊ चवरे, श्री संतोष बोंबटकर, डॉक्टर पटणी,, श्री.अरविंद पाटील,श्री.भगवान पाटील, अॕड. अशांतभाई वानखेडे( संस्थापक समतेचे निळे वादळ मलकापूर), अॅड.श्री प्रभाकर म्हैसागर मा.श्री.अनंत पाटील( सचिव), राजूभाऊ खराडे,दिलीप भाऊ,मा.श्री.विजुभाऊ साठे शिवसेना,श्री.कुंदन पाटील,,सौ.कविता कुंदन पाटील (उपाध्यक्ष),सौ.उज्वला पाटील (सदस्य), यशोदा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कोथळकर मॅडम , माजी प्राचार्य बा.वा.फिरके सर ,माजी प्राचार्य, श्री.वि.अ.जाधव सर, माजी प्राचार्य श्री अ.गो. सावकारे सर. श्री प्र.व.पाटील सर, शिंपी सर व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक . प्राचार्या सौ.हे.अ.कोलते मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षांचे स्वागत अ.ह. नारखेडे यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन केले, इतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. ध.शि.स. नवनिर्वाचित संचालक मंडळातील अध्यक्ष विलास भाऊ पाटील, उपाध्यक्ष सौ कविता कुंदन पाटील, सचिव श्री अनंत मधुकर पाटील ,इतर मान्यवर सदस्य, स्वीकृत सदस्य ,स्वीकृत सल्लागार सदस्य, शिक्षक प्रतिनिधी, पदसिद्ध सचिव या सर्वांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला .माननीय विलास भाऊचा सत्कार सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. ज्ञा. की. इंगळे सर यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन केला, प्रा.सौ कोलते मॅडम यांनी मा. विलास भाऊंचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला.तसेच धरणगाव शिक्षण समिती तर्फे श्री गो.नि उन्हाळे, श्री अनंत पाटील, सौ कविता कुंदन पाटील, सौ. उज्वला पाटील,वि.अ.जाधव सर,श्री दिनकर पाचपोळ सर, यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.मा.प्राचार्य श्री.जाधव सरांनी माननीय विलास भाऊंना शाल, श्रीफळ , बुके व भेटवस्तू देऊन सत्कार केला, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाब पुष्पहार घालून सत्कार केला.तसेच सर्व मान्यवरांनी बुके देऊन विलास भाऊचा सत्कार केला , यशोदा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कोथळकर मॅडम यांनी शाल श्रीफळ व देऊन विलास भाऊंना वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या. यशोदा इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांसोबत केक कापण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांना अध्यक्ष ,प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती विलासभाऊ पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचेवाटप करण्यात आले .अभिष्टचिंतन पर भाषणामध्ये माननीय ह.द. पाटील सर,मा. अशांतभाई वानखेडे, माजी प्राचार्य हरणखेडकर सर, बंडूभाऊ चवरे, मनीष भाऊ लखानी, मा.यश संचेती यांनी भाऊंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात मा. ज्ञा के. इंगळे सरांनी विलास भाऊ बद्दल गौरव उद्गार काढले .सत्काराला उत्तर देताना मा.श्री.विलास भाऊंनी सर्वांचे आभार मानले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजेश सुरळकर सरांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना व आभार प्रदर्शन श्री.खराटे सर यांनी मांडली.अनुमोदन श्री.दाबेकर सरांनी केले. वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. व इतर सर्व प्रमुख अतिथी, मान्यवर ,आप्तेष्ट नातेवाईक, मित्र मंडळ यांच्यासाठी मि. भाजी कार्यक्रम ठेवण्यात आला. अशाप्रकारे आनंदात व हर्षोऊल्हासात माननीय विलासभाऊ पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
वार्ताहार - श्री.रा.शा.सुरळकर सर व श्री.आ.अ.दाबेकर सर