29/11/2025
*काबरा महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरा*
मालेगाव — येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.बी.जी.काबरा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.उमेश देवरे यांची निवड करण्यात आली.शिक्षकीय भाषणात प्रा.हर्षादा निकम यांनी मनोगत व्यक्त केले व अध्यक्षीय मनोगतात प्रा. उमेश देवरे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्राचार्य राहुल घरटे,उपप्राचार्या प्रियांका शर्मा,प्रा.सुमित सावकार, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.सागर शेवाळे यांनी कार्येक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. वैशाली भवर यांनी आभार मानले.