24/12/2019
*राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर समारोप...!*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय व के.बी.एच. महाविद्यालय निमगाव राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी शिबिर,
गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय सेवा योजना स्थापन होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे "सुवर्णमहोत्सवी वर्ष" म्हणून श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध समाज प्रबोधनाचे विषय घेऊन निमगाव ग्रामस्थांचे पथनाट्य,वासुदेव फेरी,नाटक,भारुड,गीत, श्रमदान, यांच्या माध्यमातून प्रबोधन केले. आजचा शेवटचा दिवस समारोपाचा होता. शिबिर स्थळी म्हणजेच के. बी. एच. महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. व समारोप कार्यक्रम सुरू झाला. या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक हिरे साहेब तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एफ.शिरोडे हे उपस्थित होते. डॉ. सुभाष निकम यांनी त्यांच्या मनोगतातून स्वयंसेवकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सी. डी.राजपूत व आभार प्रा. स्नेहल मराठे यांनी मानले,व सूत्रसंचालन दिपाली देवरे हिने केले, शिबिरातील सर्वात महत्वाचे म्हणजे सात दिवस एकत्र काम केल्यानंतर त्यामध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक काढला जातो. त्यामध्ये दिपक पवार व पायल अमिपरा यांची आदर्श स्वयंसेवक म्हणून निवड केली तसेच उत्कृष्ट ग्रुप हा पुरस्कार तानाजी मालुसरे या ग्रुप ला मिळाला व सर्वोत्कृष्ट गट नेता म्हणून निकिता चौधरी ला पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट सांस्कृतिक दिपक पाटील व उत्कृष्ट मिरवणूक वेशभूषा सादरीकरण करणारा ग्रुप म्हणून मावळे शिवा काशिद या ग्रुप ची निवड करण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजपूत सर, प्रा. एस. बी. पाटील व प्रा.स्नेहल मराठे विद्यापीठ प्रतिनिधी गणेश हलवर, शिबिर व्यवस्थापक कामेश गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक दाणी, विद्यार्थिनी
प्रतिनिधी शुभांगी अहिरे, सिस्टम प्रमुख गोकुळ बच्छाव सांस्कृतिक प्रमुख ज्ञानेश्वर देवरे,महेश वेताळ साहित्य प्रमुख सचिन गवळी, मीडिया प्रमुख विलास देवरे, सागर कट्यारे, या सर्वांनी शिबिर संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अतिशय सुंदर पद्धतीने शिबिर पार पडले.