04/08/2025
काबरा महाविद्यालयात वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
मालेगाव - राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि कै.बी.जी. काबरा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन महिला कॉलेज, मालेगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वैजयंती रामावत (राठी) उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख पूजा रौदळ मॅडम होत्या. याप्रसंगी विद्यालयातील प्रा.वैभव जैन यांनी वाणिज्य विषया बद्दल मनोगत व्यक्त केले. त्या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.वैजयंती रामावत यांनी वाणिज्य विभागाचे महत्व तसेच दैनंदिन जीवनात वाणिज्य विषयाचे महत्व, वाणिज्य शाखेत विविध करिअर च्या वाटा व या सर्वात ए.आय.चा वापर कसा करून घेता येऊ शकतो या विषयीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमांस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राहुल घरटे, तसेच उप-प्राचार्या डॉ. प्रियंका शर्मा, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुमित सावकार, सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती जाधव यांनी केले तर प्रा.भावना छिपा यांनी आभार मानले.काबरा महाविद्यालयात वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
मालेगाव - राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि कै.बी.जी. काबरा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन महिला कॉलेज, मालेगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वैजयंती रामावत (राठी) उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख पूजा रौदळ मॅडम होत्या. याप्रसंगी विद्यालयातील प्रा.वैभव जैन यांनी वाणिज्य विषया बद्दल मनोगत व्यक्त केले. त्या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.वैजयंती रामावत यांनी वाणिज्य विभागाचे महत्व तसेच दैनंदिन जीवनात वाणिज्य विषयाचे महत्व, वाणिज्य शाखेत विविध करिअर च्या वाटा व या सर्वात ए.आय.चा वापर कसा करून घेता येऊ शकतो या विषयीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमांस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राहुल घरटे, तसेच उप-प्राचार्या डॉ. प्रियंका शर्मा, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुमित सावकार, सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती जाधव यांनी केले तर प्रा.भावना छिपा यांनी आभार मानले.